मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६२ वा

काशीखंड - अध्याय ६२ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति म्हणे शिव नंदना ॥ तूं  माझिया वियोगत मासी ब्रघ्ना ॥ लीं त्रिकाळीं चिया निजस्मरणा ॥ कृपानिघि तूं ॥१॥
मज त्रिकाळस्नानची सिद्धी ॥ मज तुझेंचि स्मरण मंत्र विधी ॥ मग त्या भक्तिकाजें स्फुरे सिद्धी ॥ ते तुमची स्वामी ॥२॥
माझिया वियोगवात धूळीसी ॥ निक्षे पावया तूं पर्जन्य होसी ॥ शिव नामा मृतें वृष्टि करिसी ॥ तेणें शांत होतसें ॥३॥
पर्जन्य शांत करावया धुळी ॥ माझ्या वियोगाची प्रदीप्त ज्वाळी ॥ स्वाळी ॥ स्वामी ते शांत करावया कोणे काळीं ॥ अधिकचि प्रवाह करीं ॥४॥
जैसें महाद्र्व्यें हवितां अध्वरा ॥ सर्पि दुग्ध चंद ना गुरु शर्करा ॥ मग त्या अधिकारें अंगारा ॥ कवणें स्पर्धा कीजे ॥५॥
तैसा माझा वियोग अंगार ॥ तो शांत नव्हे जी अति क्रूर ॥ तेथें शिव कथेचे तुषार ॥ प्रदीप्त करिताती ॥६॥
कीं माझा वियोग नव्हे कलेवर प्रेत ॥ तेथें स्त्रवतां हें कथा मृत ॥ तेणें तत्काळ होय सचेत ॥ मज पीडा करा वया ॥७॥
एकुण तिसाव्या द्वापाराचा अंत ॥ मज प्राप्त होईल कैं गभस्त ॥ काशी मध्यें आला उमाकांत ॥ त्याचे चरण पाहीन मी ॥८॥
शिवा पुढें गेले ऋषी ॥ मी अप्राप्त जाहालों शिव चरणांसी ॥ मज मुक्त कां नव्हे वाराणसी ॥ कैंसें कर्मसूत्र माझें ॥९॥
मज काशी कथा निरूपितां श्रवणीं ॥ जैसी दर्दुरा जवळी पद्मिणी ॥ तैसी ते शिवाची निज धामिनी ॥ अप्राप्त काशी मज ॥१०॥
नातरी जैसा शशि प्रकाशें चकोर ॥ तो क्रीडानंदें दीर्घार्णवीं थोर ॥ परी तो व्योमीं असे अमृतकर ॥ साध्य नाहीं यासी ॥११॥
तैसी शिव कथा माझे श्रवणीं ॥ अमृतवल्ली स्त्रवे तुझ्या आननीं ॥ परी तो वृष भवाहनी ॥ केव्हां द्दश्य होईल ॥१२॥
तंव स्वामी म्हणे गा महामुनी ॥ तूंचि एक श्रोता पाहा मेदिनीं ॥ तूं दीर्घा नंदकर्ता माझे मनीं ॥ मित्रा वरुणसुता ॥१३॥
तुजा ऐसें पात्र नाहीं त्रिलोकीं ॥ जैसा वरुण वृष्टि करी उंच टेंकीं ॥ परी तें अंबु स्थिर होय सर्व लोकीं ॥ पात्र विशेष जाणोनी ॥१४॥
जैसा पौर्णिमे दिवशींचा अत्रिनंदन ॥ चकोरां प्राप्त करी अमृतपान ॥ परी तृप्त न करी वांय़ सांलागुन ॥ अपात्र म्हनोनी ॥१५॥
तोचि पौर्णिमादिनीं अत्रि सुत ॥ सोम कांतासी अमृत स्त्रवत ॥ परी आणिका पाषाणीं नाहीं प्राप्त ॥ अपात्र म्हणोनी ॥१६॥
तैसा तूं शुद्ध पात्र गा अगस्ती ॥ शिव कथाधर्म जे आगमयुक्ती ॥ ते प्रश्न निरूपावे तुज प्रती ॥ बहुत साक्षेपें ॥१७॥
तरी तुझा प्रश्न जो मनोदय ॥ तो मनो मळासी करी क्षय ॥ आतां प्रश्न विलंबसमय ॥ परित्याग करीं ॥१८॥
तंव अगस्ति म्हणे जी ब्रह्मचारी ॥ किती ब्राह्मण गेले शिव बिढारीं ॥ तरीं ते राहिले होते काशीपुरीं ॥ कवण कवण्या तीर्था ॥१९॥
षण्मुख म्हणे गा अगस्ति मुनी ॥ आश्विन मास शुक्ल पक्ष क्रमोनी ॥ मग सूर्य प्रति प्रतिपदा दिनीं ॥ उदय पावला पूर्वेसी ॥२०॥
ऊर्ज शुक्ल प्रतिपदा दिन ॥ बुधानुराधा होती पूर्ण ॥ तैं काशी प्रवेश पंचानन ॥ आरंभिता जाहाला ॥२१॥
कनकपरि येळीं ज्योति प्रदीप्ता ॥ संख्या शत लक्ष जी गणिता ॥ अष्टगंधें चर्चूनि अक्षता ॥ हेममय गोदंड करीं ॥२२॥
त्या अविमुक्ती चिया सुंदरा ॥ पूर्ण मंडित षोड शश्रृं गारा ॥ अक्षय वायनें करूनि शंकरा ॥ आलिया गंगा तीरा ॥२३॥
त्यांसी दक्षिण पाणीनें नाभीकार ॥ देत दाक्षायणी-विश्वंभर ॥ तंव जाहाला दीर्घ ध्वनींचा गजर ॥ आशी र्वचनें ऋषींचीं ॥२४॥
आशी र्वचनें मुखीं वेद ध्वनी ॥ अंजुळी संपुट उभय पाणी ॥ षडंगरुद्र जय जय स्मणीं ॥ स्तविती शिवा ॥२५॥
द्विज आले शत सहस्त्र फौजा ॥ साष्टांगें वंदिती वृषभ ध्वजा ॥ ते किमर्थ कोठूनि गा कुंभजा ॥ आलेती ब्राह्मण ॥२६॥
तंव शिवासी प्रार्थी नारायण ॥ तुम्हीं मंदरा चलासी केलें गमन ॥ त्या काळा पासोनि हे ब्राह्मण ॥ असती तुमच्याचि स्मरणीं ॥२७॥
कोणी एक वेद निर्घोष करीत ॥ कोणी षड्‍राग जपत ॥ कोणी विश्वंभरचि स्मरत ॥ राहिले काशी वासीं ॥२८॥
शिव  काशी मध्यें यावया कारणें ॥ कोणी साधिते जाहाले गोरांजनें  ॥ एक साधिते जाहाले धूम्र पानें ॥ महाऋषी ते ॥२९॥
एक शिव ध्यानीं राहिले आत्मसाक्षी ॥ एक राहूनि मुद्रा खेचरी लक्षी ॥ एक शिव लक्षिती ज्ञानचक्षीं ॥ सर्वही काळ ॥३०॥
एक ते दर्भाग्रें तोय पान ॥ एक करिती गलित पत्र भक्षण ॥ एक ते राहिले जी साधून ॥ पवन आहार ॥३१॥
ऐसे आपुलाले भाव पूर्वक ॥ अहो रात्र स्मरती त्रिपुरां तक ॥ तरी तृप्त न होती द्विज नायक ॥ शिवा तुम चिये भक्तीं ॥३२॥
मेघश्याम वदे जी शूल पाणी ॥ हे राहिले होते तीर्थ सेवनीं ॥ आतां सफळ जाहालीं जी पारणीं ॥ शिव दर्शन जाहा लिया ॥३३॥
ऐसे ते महा मुनिवर ॥ जे जे सुफळ कर्ते महा अध्वर ॥ ते शिव दर्शना आले साचार ॥ दंडकारण्य तीर्था हुनी ॥३४॥
मंदाकिनी पासाव सत्पात्रें ॥ जे दानें अधिकारिती विधि मंत्रें ॥ तेथें क्रमीत होते शिव सूत्रें ॥ ते आले एक लक्ष ॥३५॥
आणिक पंच सहस्त्र महामुनी ॥ स्मरत होते मंत्र महा ध्वनी ॥ ते आले वैतरणी पासूनी ॥ शिव दर्शना ॥३६॥
एक लक्ष तीस सहस्त्र ब्रह्मवृंदें ॥ शिवस्मरणा नव्हेचि भेदें ॥ ते शिवयात्रेसी दीर्घा नंदें ॥ आले हंस तीर्था हुनी ॥३७॥
दुर्वा सतीर्थी दुर्वा सेश्वर ॥ तेथें शत एक होते द्विजवर ॥ ते शिवदास्यीं आस्तिक थोर ॥ आले एक मतें ॥३८॥
पैल मत्स्योदर तीर्था पासुनी ॥ आले षोडश सहस्त्र मुनी ॥ त्यांहीं साष्टांगें वंदिला बद्ध पाणी ॥ विश्वंभर तो ॥३९॥
कपाल मोचन तीर्थ जेथें ॥ सप्त शत ब्राह्मण होते तेथें ॥ त्यांची साष्टांगें समर्थें ॥ दाखविली विष्णूनें शिवासी ॥४०॥
ऋणे श्वरलिंग प्रसिद्ध पुराणा ॥ तेथें पूजा विधि कीजे पंचानना ॥ तरी तत्काळ मुक्त होय जाणा ॥ पितृऋणा वेगळा ॥४१॥
ऐसें तीर्थ ऋणमोचन ॥ जेथें फिटे मातृ पितृऋण ॥ तेथोनि द्वाद्श शतें ब्राह्मण ॥ आले शिवयात्रेसी ॥४२॥
पृथ्वीनें लिंग स्थापिलें पृथ्वीश्वर ॥ तेथें पूजाविधि करी जो नर ॥ तरी सामर्थ्य प्राप्त होय अपार ॥ पृथ्वी एवढें ॥४३॥
त्या पृथ्वी महा तीर्था हुनी ॥ एक सह्स्त्र आणि त्रिशत मुनी ॥ ते अभिवंदा वया शूलपाणी ॥ आले सद्‍बुद्धी ॥४४॥
अप्सरा लोकीं चिया अष्टनायिका ॥ रंभा उर्वशी मंजु घोषा ॥ घृताची तिलोत्तमा मेनका ॥ सुकेशी आणि लीलावती ॥४५॥
त्य देवलोकीं चिया देवांगना ॥ आतां भूमंडळीं चिया कवणा ॥ कार्तिक म्हणे मैत्रा वरुणा ॥ परियेसीं आतां ॥४६॥
चित्ररेखा आणि मधुरा ॥ सुप्रभा आणि भूचरा अचरा ॥ शेषरत्नी सम मुनि सुंदरा ॥ आणि पिंगला ते ॥४७॥
एवं षोडश अप्सरा मिळोनी ॥ अप्सरेश्वर स्थापिला शूलपाणी ॥ त्या अप्सरा कुंडा पासुनी ॥ मुनी आले बारा शतें ॥४८॥
उर्वशीनें स्थापिलें भवानीकांता ॥ तेथें प्राप्त जाहाली ते सुंदरता ॥ ते समूळ कथा महाश्रोतां ॥ पुढें करूं निरूपण ॥४९॥
त्य उर्वशीकुंडीं षट्‍किर्मिक ॥ आले सहस्त्र शत एक ॥ नमस्कारावया त्र्यंबक ॥ दाक्षायणीवर ॥५०॥
नंदिकेश्वराचे चरणीं उत्पत्ती ॥ तो चतुर्दंत जन्मला ऐरावती ॥ ऐरावतेश्वर स्थापिला प्रसिद्धकीर्ती ॥ केलें ऐरावतकुंड ॥५१॥
त्या ऐरावतकुंडा पासाव मुनी ॥ शिव स्मरत होते दर्भासनीं ॥ ते सांबासी दावीतसे चक्रपाणी ॥ त्रिशत बाह्मण ॥५२॥
गंधर्वीं स्थापिला गंधर्वेश्वर ॥ त्यासी विद्या प्राप्त करी शंकर ॥ त्या गंधर्वतीर्थींहून द्विजवर ॥ आले नवशतें ॥५३॥
अगस्तीश्वर पूजी कुंभज ॥ तो देवां वंद्या जाहाला द्विजपूज्य ॥ मग तो मित्रा वरुणाचा आत्मज ॥ स्थापी अगस्तिकुंड ॥५४॥
त्या कुंडापासाव षट्‍कर्मिक ॥ नवसहस्त्र त्रिशतें यज्ञकारक ॥ त्यांचीं साष्टांगें वैकुंठनायक ॥ दाखवी त्र्यंबका ॥५५॥
आणिक पिशाचमोचन तीर्थ ॥ भूत ब्रह्मग्रह नाशी समर्थ ॥ त्या तीर्थींचे ऋषि परमार्थ ॥ ऐसे नसती आणिक ॥५६॥
तेथूनि आले सप्त सहस्त्र द्विज ॥ त्यांहीं साष्टांगें वंदिला वृषभ ध्वज ॥ तयांसी दक्षिण पाणी गरुड ध्वज ॥ दावीतसे शिवा ॥५७॥
आणिक सहस्त्र एक ब्राह्मण ॥ आले पितृकुंडा पासून ॥ त्यांहीं वंदिला भाललोचन ॥ त्रिपुरहंता ॥५८॥
सप्त शत आले ध्रुवकुंडा पासूनी ॥ त्रिशत आले मानस सरोवरा हूनि ॥ ते दाख विताहे चक्रपाणी ॥ शंकरासी पैं ॥५९॥
कद्रु-कश्यपांचा जो कुमर ॥ वासुकी नामा महावीर ॥ तेणें प्रसन्न करोनि शंकर ॥ राहिला शिवकंठीं ॥६०॥
ऐसा तो महाफणी प्रचंड ॥ तेणें स्थापिलें वासुकीकुंड ॥ तेथूनि अकरा शतें मुंड मुंड ॥ आले असती ब्राह्मण ॥६१॥
राम अंगना जनकदुहिता ॥ तिनें स्थापिलें भवानीकांता ॥ त्या जानकीकुंडा पासाव आतां ॥ अष्टशत द्विज आले ॥६२॥
गौतमें स्थापिला गौतमेश्वर ॥ तें लिंग कर्मकाष्ठाचा अंगार ॥ गौत मकुंड निर्मी ऋषीश्वर ॥ महापापनाशन ॥६३॥
त्रिशत द्विज आले तेथूनी ॥ अकरा शत दुर्गाकुंडा पासूनी ॥ एक लक्ष आले प्रयाग संगमाहूनी ॥ आणि सहस्त्र एक ॥६४॥
ऐसे त्या कुंडतीर्थींचे द्विजवर ॥ त्यांहीं वंदिला उमाशंकर ॥ शिवासी संख्या सांगे श्रीधर ॥ पुरुषोत्तम तो ॥६५॥
मग त्यांसी तुष्टला त्रिपुरारी ॥ प्रसन्नमनें उदार वदे वैखरी ॥ ज्या ज्या तीर्थींचे ऋषि ब्रह्मचारी ॥ स्थापिले तयां त्या तीर्थीं ॥६६॥
तुम्हीं सर्वकाळ विद्या पढणें ॥ करावीं वेदांचीं अध्ययनें ॥ शिवशास्त्रें पुराणें सदैव पढविणें ॥ महाश्रीमंतांसी ॥६७॥
अधमाचें दान न अंगीकारिजे ॥ नीतिधर्में करूनि वर्तिजे ॥ षट्‍कर्में नित्य साधिजे ॥ षट्‍कर्मिक हो तुम्ही ॥६८॥
माध्यान्हीं मणिकर्णिकेचें स्नान ॥ गंगातोयें कीजे शिवस्नपन ॥ या अविमुक्तीचे ठायीं असोन ॥ धेइजे क्षेत्रसंन्यास तुम्हीं ॥६९॥
मग जय जय कारें दीर्घ ध्वनीं ॥ द्विज वदते जाहाले दाक्षायणीं ॥ मग ते नाभीकार दक्षनंदिनी ॥ वदती जाहाली द्विजांसी ॥७०॥
तुम्ही गंगातीरीं नित्य असतां ॥ भक्ष्यभोज्यांची न कीजे चिंता ॥ या वाराणसीचे ठायीं भुक्तिदात्री ॥ तत्त्वतां ॥ ते भवानी असे ॥७१॥
ऐसा नाभीकार दिधला समर्थे ॥ निर्भय स्थापिलीं दीनअनाथें ॥ मग क्रमिते जाहाले आपुलालीं तीर्थे ॥ सर्वांपरींचीं ॥७२॥
स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती ॥ ऐसा हर प्रवेशला अविमुक्तीं ॥ मग दिवोदासाची पूर्वकृती ॥ पालट केली कैसी ॥७३॥
दिवोदासीची कृति आच्छा दिली ॥ दिव्य रचना काशीची आंरभिली ॥ ते विश्वकर्म्यानें रचना केली ॥ हेमबंध पंचक्रोशी ॥७४॥
त्या विश्वकर्म्याची मूळउत्पत्ती ॥ ते तुज श्रवण करूं गा अगस्ती ॥ त्रिलोचनी राहिला पशुपती ॥ मग कैसें वर्तलें ॥७५॥
अगस्ति वदे शिवकुमरा ॥ ब्रह्मचार्‍यांमाजी श्रेष्ठवरा ॥ कामना पूर्ण कीजे जी दातारा ॥ कृपानिधि स्वामिया ॥७६॥
तुम चिया षट्‍वक्रांची स्थिती ॥ सप्तसमुद्रांची तुळिजे युक्ती ॥ त्या सिंधुगर्भीं दिव्य शुक्ती ॥ तुमचीं अधरपुटें ॥७७॥
त्य अधरपुटींचे दिव्य मणी ॥ कीं त्या दिव्य पंक्ती तुमच्या आननीं ॥ तेथें उद्भवे प्रकाशाची खाणी ॥ शिवकथानामांची ॥७८॥
तेथें तारूं प्रेरिलें माझें शरीर ॥ परी शिवकथामणिभार ॥ तेणें ते तृप्त जी समर ॥ नव्हेचि कोणे काळीं ॥७९॥
मग तृप्त करावया आशा ॥ हा तुम्हांसी आहे पूर्ण भरंवसा ॥ मी काशी वियोगें जाहालों जी पिसा ॥ न कळे स्मरू ॥८०॥
जंव स्वस्थ आहे हें शरीर ॥ तंव सर्वकाळ पाहिजे हर ॥ षडर्कवरी पारणें तरी थोर ॥ पीडा हें ॥८१॥
तैसें तुम्हीं शिवनामामृत ॥ मज देऊनि सर्व काळ कीजे तृप्त ॥ स्वन्पही जाऊं न दीजे अकर्मांत ॥ स्वामिया तुम्हीं ॥८२॥
जैसा तो पर्जन्य वृष्टि करितां ॥ सरिता संगमीं होती पूर्ण भरिता ॥ मग ओहोट जाहा लिया मागुता ॥ दिसे न्यून पदार्थ ॥८३॥
जैसा शुक्ल पक्षींचा शीतकर ॥ नित्य नित्य प्रकाश करी थोर ॥ मग तो कृष्णपक्षी रोहिणीवर ॥ दिसे न्य़ून पदार्थ ॥८४॥
तैसी मज शिवकथा निरूपितां ॥ ओहोट न कीजे शिवसुता ॥ त्रिपंच दिन पय न देतां ॥ केवीं स्वस्थ अपत्य ॥८५॥
परी त्या अपत्याचें ऐसें प्रमाण ॥ माता तृप्त करी स्तनपानें पूर्ण ॥ परी आळ घेतसे धीरत्वगुण ॥ न प्रवर्तती त्यासी ॥८६॥
तरी स्वामी आतां पृच्छेचा योग ॥ काशी मध्यें विश्वकर्मेश्वरलिंग ॥ कैसी तयाची पूर्वस्थिति हा प्रसंग ॥ निरूपावा मज ॥८७॥
विश्वकर्मा हा कवणाचा कवण ॥ येणें कैसा पूजिला पंचानन ॥ काशीरचना केली हा सामर्थ्यगुण ॥ कैसा प्राप्त जाहाला यासी ॥८८॥
स्वामी म्हणे गा ऋषि महासुशींळा ॥ तूं पृच्छावल्लीं चिया द्रोणाचळा ॥ तुवां निर्व्याधि केलें देवजनां ॥ आलासी उपयोगा ॥८९॥
नातरी न कळे द्दष्टांतांची कुसरी ॥ अगस्तीची तृष्णा न तुळे गिरी ॥ तो समुद्रीं टाकिला हा असुरीं ॥ आच्छादिला दधीनें ॥९०॥
तो अगस्तीनें प्राशिला सागर ॥ तो स्पर्धेसी तुळे केवीं गिरिवर ॥ जयाच्या यागीं पूर्णाहुती भास्कर ॥ तो सृष्टिकरातुल्य ॥९१॥
ऐसा तूं अनुपम श्रोता ॥ परियेसीं प्रश्निला प्रश्न आतां ॥ जे दोष दग्धूनि नाइकिजे वार्ता ॥ योनिमार्गाची ॥९२॥
तरी परियेसीं गा मित्रा वरुणसुता ॥ जो सत्यलोकवासी सृष्टिकर्ता ॥ तो चर्तुमुख विरिंचि विधाता ॥ सकळांचा पिता ॥९३॥
त्या विरिंचिनाथाचा जो कुमर ॥ विश्वकर्मा नामें बाळ सुंदर ॥ तो विद्यापठनासी निरंतर ॥ होत गूरूच्या मंदिरीं ॥९४॥
ऐसा तो बाळरूपी पठन करितां ॥ विद्या अभ्यासिल्या समस्ता ॥ मग तो आपुलियाचि मता ॥ विचारिता झाला ॥९५॥
म्हणे गुरुभक्ति केली शुद्धमनें ॥ तेणें सर्व विद्या आल्या पठणें ॥ आतां नमस्कारावया गुरुचरणें ॥ जाइजे स्वभावेंसीं ॥९६॥
म्हणोनि वेगें आला गुरूपासीं ॥ अभिवंदन केलें गुरुचरणांसी ॥ मग उभा ठाकला गुरुसेवेसी ॥ संतुष्ट मनें ॥९७॥
बाळ म्हणे जी अनाथबंधू ॥ तूं सर्व विद्यांचा पूर्णसिंधू ॥ योगेश्वरांमाजीं तूं साधू ॥ गुरुस्वामिया ॥९८॥
तुझिया स्पर्धे तुळिजे उपमा ॥ ऐसा कवणा न दीजे महिमा ॥ जरी समता कीजे कल्पद्रुमा ॥ तरी तो न्य़ून दिसे ॥९९॥
तुमचें उत्तीर्ण व्हावया कारण ॥ जीवें शरीर कीजे समर्पण ॥ तें सत्यचि स्फटिक चिंतामणी समान ॥ साठी केली पैं ॥१००॥
श्रीगुरू चिया गुरुत्वासी ॥ स्वर्धें तुळिजे सुवर्णाचलासी ॥ समता कीजे धैर्यमहत्त्वासी ॥ समुद्र व्योमां ॥१०१॥
न धरी परिसाचा संबंध ॥ तो एक लोष्टराशी करी भेद ॥ परी तो अवघ्या घातूंसी स्वबोध ॥ न करीचि सर्वथा ॥१०२॥
करितां मनोमुद्रेचें मोहन ॥ तुम्हांसी व्यक्त अंतकाळ साधन ॥ जेणें पराभवे अयागमन ॥ जितांचि मारिजे ॥१०३॥
परब्रह्म वस्तूचा द्दश्याकारू ॥ तो तूं लभ्य करिता जी श्रीगुरू ॥ येरवीं इक्षुदंडा ऐसी रसधारू ॥ नदी तो पोखर ॥१०४॥
अकस्मात जी विद्या होय प्राप्त ॥ तरी संदेहें कां कीजे तप व्रत ॥ जे पंचत्वेंचि होय मुक्त ॥ तरी गुरु किमर्थ करावा ॥१०५॥
इच्छाफळें मतेंचि कल्तिपां ॥ स्त्रवती ब्रह्मवृक्षा चिया लता ॥ तरी त्या कल्पद्रुमाची महिमता ॥ किमर्थ कीजे ॥१०६॥
नातरी ग्रामसरितां चिया युक्तीं ॥ जरी अविंध मुक्तें प्रसवती ॥ तरी समुद्राची कथाख्याती ॥ किमर्थ कीजे ॥१०७॥
शीतकरा चिया पूर्णत्वपणा ॥ जरी जीवन प्रसवे पाषाणा ॥ तरी त्या सोमकांता चिया गुणा ॥ किमर्थ कीजे ॥१०८॥
जंबुका होय शक्तिसंपूर्णता ॥ तो दोर्दंडें भंगी गजा मदोन्मत्ता ॥ तरी त्या केसरीची अपूर्वता ॥ किमर्थ वाखाणिजे ॥१०९॥
म्हणोनि वृथा रे लक्षकोटी शशी ॥ किमर्थ कीजे प्रमाण ग्रामदीपांसी ॥ जंव अरुणोदय नाहीं पूर्वेंसी ॥ तंव न सरती हे ॥११०॥
आतां असो हे द्दष्टांतयुक्ती ॥ शुद्ध श्रीगुरूविण कैंचीं मुक्ती ॥ तरी असाध्य अविमुक्ती ॥ सेविजे वाराणसी ॥१११॥
ऐसा तो विश्वकर्मा विधिकुमरू ॥ तेणें स्वमतें प्रार्थिला श्रीगुरू ॥ मी प्राप्त जाहालों जी पूर्ण वरू ॥ नाना विद्यांचा पैं ॥११२॥
आतां हेंचि संकल्पितां आम्ही ॥ श्रीगुरु दक्षिणा निरूपिजे तुम्हीं ॥ तूं विद्यांचा दाता गुरु स्वामी ॥ अनुपम कीं ॥११३॥
गुरु तुमचे कृपेवांचून ॥ केवीं भासे पूर्ण ज्ञान ॥ तत्पदार्थीं समरस होणें ॥ त्वंपदार्थासी ॥११४॥
म्हणोनि शुद्धगुरूचा जो शिष्य ॥ तो जाणावा तप्तदार्थाचा अंश ॥ ऐसें जो ओळखी तयासी प्रयास ॥ नाहीं परमार्थाचा ॥११५॥
म्हणोनि मुक्तहारि यांची गती ॥ ते प्राप्त नव्हे वायसांप्रती ॥ तैसी काशीविण अलभ्य मुक्ती ॥ आणिका स्थळीं ॥११६॥
तंव वदता जाहाला कृपानिधी ॥ म्हणे गा विश्वकर्मिया सर्वसिद्धी ॥ तुज प्राप्त जाहाली सर्व मंत्र सिद्धी ॥ गुरुकृपेंकरूनियां ॥११७॥
आतां तूं जाहालासी महदाधिप ॥ ज्ञानें विभांडीं प्रपंचरज्जुसर्प ॥ गुरुदक्षिणा द्यावयाचा संकल्प ॥ योजिला मानसीं तुवां ॥११८॥
तरी आमुचाही संकल्प परियेसीं ॥ आम्हांसी मठ कीजे राहावयासी ॥ बरविया पर्णशाला युक्तीसी ॥ निपजवीं शिष्या ॥११९॥
बहु क्सरीच्या सुंदर निर्मळा ॥ आणि पर्जन्यकाळीं अति सोज्ज्वळा ॥ रविदीप्तिपरीस तेजाळा ॥ पूर्णकळसीं पैं ॥१२०॥
शिष्य म्हणे बरवें जी पूर्ण भरिता ॥ तंव वद्ती जाहाली गुरूची कांता ॥ म्हणे विश्वकर्मया विद्यावंता ॥ परियेसीं प्रत्युत्तर माझें ॥१२१॥
आमुचें काम कीजे भावपूर्वक ॥ तरी माझी प्रतिज्ञा असे जी एक ॥ मज उत्तम कीजे जी कंचुक ॥ शुद्ध वक्ललाची ॥१२२॥
शिष्य म्हणे बरवें गुरुकामिनी ॥ मग बोलती जाहाली गुरु नंदिनी ॥ म्हणे विश्वकर्म्या मज तूं आणीं ॥ बाळ खेळ खेळावया ॥१२३॥
उखळ मुसळ आणि काष्ठचक्र ॥ सुंदर सुलक्षण सुरंगचक्र ॥ तरी तुज मानवेल शक्र ॥ अमरावतीचा अधीश ॥१२४॥
विश्वकर्मा म्हणे गुरुकुमरी ॥ मी संतोषलों तुझिया प्रश्रोत्तरीं ॥ तंव गुरुपुत्र आज्ञा करी ॥ विश्वकर्मियासी ॥१२५॥
गुरुपुत्र म्हणे गा महाविद्यका ॥ मज आणाव्या सुरम्या पादुका ॥ त्या प्रयोजनीं पाहिजेती मृदलिका ॥ अलिप्त धूळीं उदकीं ॥१२६॥
ऐसें जें जें रुचे जया मानसीं ॥ ते ते आज्ञा करिती शिष्यासी ॥ तेणें सर्वांची प्रतिज्ञा प्रेमेंसीं ॥ अंगीकारिली मस्तकीं ॥१२७॥
मग चिंतातुर जाहाला तो मनीं ॥ उचित मागितलें समस्त जनीं ॥ तरी हे करावया सर्वही करणी ॥ कैंचा मी समर्थ ॥१२८॥
मग तो उद्वेगें विद्ध जाहाला ॥ चिंतासरितेसी प्रवाह आला ॥ सर्व विद्येसी असध्य जाहाला ॥ अप्राप्त ज्ञान उगम ॥१२९॥
म्हणे हीं उचितें कैंचीं म्यां द्यावीं ॥ ऐसी विद्या प्राप्त कैंची असावी ॥ मग त्रासोनियां महार्णवीं ॥ संचरला विश्वकर्मा ॥१३०॥
मग पुरुषार्थ धरोनियां मनें ॥ म्हणे हें न दीजे जरी गुरूचें उसनें ॥ तरी प्राप्त होतील भुवनें ॥ कृताताचीं ॥१३१॥
आतां स्वामिऋणातीत होइजे ॥ तरी ते विद्या कवणें स्थळीं पाविजे ॥ ऐसा कवण देव आराधिजे ॥ जो सफळ करी मनोरथ ॥१३२॥
फेडावया श्रीगुरूचें उसन ॥ ऐसा मी समर्थ कैसा होईन ॥ जरी न कीजे गुरुचें वचन ॥ तरी प्राप्त अधःपात ॥१३३॥
सर्व विद्या साध्य करी गुरू ॥ आणि गुरु दक्षिणेचा न करी अंगीकारू ॥ तो सत्य अघोरी नरू ॥ शत एक जन्म ॥१३४॥
स्वामी म्हणे ऋषि उत्तमा ॥ ऐसा चिंतातुर झाला विश्वकर्मा ॥ श्रोत यांसी प्रार्थी शिवदास गोमा ॥ कथा सादर परिसा पुढें ॥१३५॥
इति श्रीस्कं० काशीखंडे शिवकाशीप्रवेशकथने विश्वकर्मवर्णनं नाम द्विषष्टितमाध्यायः ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP