मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ६९ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ६९ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ६९ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ आतां अगस्तीनें स्वामी प्रार्थिला ॥ म्हणे शिव कैसा कोपारूढ जाहाला ॥ आणि वीरभद्र कैसा उद्भवला ॥ तें निरूपा मज ॥१॥यागीं दग्धली उसा जाणुनी ॥ तंव आनंदला तो नारदमुनी ॥ मग त्वरावंत कैलास भुवनीं ॥ नंदीपुढें गेला पैं ॥२॥लवडसवडी दक्षाचेनि रागें ॥ नंदी भूतें टाकूनियां मागें ॥ मंदिरी धुंडीतसे मनोवेगें ॥ तंव तेथें शिव नाहीं ॥३॥मग तो क्रमिता जाहाला तेथुनी ॥ तंव शिव होता निरंजनवनीं ॥ नारद पाहे तंव तो आसनीं ॥ ध्यानस्थ असे ॥४॥मग विचारी तो विधिनंदन ॥ म्हणे पहा याचें कैसें ध्यान ॥ याचें लक्षण कळे कैसें कवण ॥ मंत्र जप साधी ॥५॥आतां म्यां असावें जी उगे ॥ तरी हा ध्यानी क्रमील युगें ॥ मग नारद ओसरला मागें ॥ षोडशपद ॥६॥मग वामकर त्राहाटिला वदनीं ॥ ते स्वरें उद्भवली महा ध्वनी ॥ मग शंकर विसर्जी ध्यान ते क्षणीं ॥ तया दीर्घ शब्दें ॥७॥ध्यान विसर्जूनि उमाकांत ॥ शब्द ऐकिला महाद्भुत ॥ देखिला विरिंचिनाथाचा सुत ॥ नारदमुनी ॥८॥ मग जवळी पाचारिला शंकरें ॥ नारद आश्वासिला दशकरें ॥ मग प्रश्निता जाहाला प्रत्युत्तरें ॥ त्रिपुरांतक तो ॥९॥म्हणे कवणें गांजिलें गा मुनी ॥ स्वार्गीं कीं पाताळीं मृत्यु भुवनी ॥ तंव तो आक्रंदे दीर्घ ध्वनीं ॥ न बोले शिवासीं ॥१०॥समीर कोंदलासे घ्राणस्वरी ॥ चक्षु प्रवाहती पूर्ण नीरीं ॥ क्षणक्षणां पुसे त्रिपुरारी ॥ कवणें गांजिले सांग पैं ॥११॥मग नारद म्हणे गा भस्मधारी ॥ तूं नागवलासी असतीं मंदिरी ॥ दाक्षायणीं दग्घली अध्वरीं ॥ प्रजापती चिया ॥१२॥भवानी गेली दक्षयागासी ॥ कोणी सन्मान न करीचि तियेसी ॥ दक्षें निर्भर्त्सिली ते कैसी ॥ महा ऋषीं देखतां ॥१३॥तिच्या ह्रदयीं तुमचें नाम स्मरण ॥ यागीं न देखे रुद्र भाग गदान ॥ दक्षें हरिला तिचा मान ॥ मग त्यागिलें शरीर ॥१४॥विभूति जोग वटा उरलासी शिवा ॥ आतां क्रमा वया मोकळा आघवा ॥ भिकारी जाहलासी रे महा देवा ॥ दैवें दवडिलें गिरिजाधन ॥१५॥ऐसी नारद मुनीचीं प्रत्युत्तरें ॥ एकाग्र परिसिलीं शंकरें ॥ मग जाणोनि प्रळयींचा वैश्वानर निकरें ॥ आवाहन केला पैं ॥१६॥प्रकटली क्रोधाची महाचळाळी ॥ कीं विष होतें शेषाचे कंठनाठीं ॥ तो प्रळयांतीं फुंकोनि पाताळीं ॥ दग्धी जैसीं सप्तपाताळें ॥१७॥कीं सृष्टि संहारावया गभस्त ॥ प्रलयीं होतसे द्वादशादित्य ॥ सप्तद्वी पवती खंडें पर्वत ॥ संहारी निमिषांत ॥१८॥कीं एकवीस स्वर्ग मंडळें ॥ दग्धी तो चक्षू चिया महाज्वाळें ॥ ऐसा तो तमो गुण जाश्वनीळें ॥ अंगीकारिला पैं ॥१९॥शेषकंष्ठींचा जो अग्न ॥ आव्हानितां करी विघ्वंसन ॥ आपण साक्षित्वें त्रिनयन ॥ गार्हपत्याग्नि बोलिजे ॥२०॥ऐसें त्रय अग्नीचें होय आवाहन ॥ तें निमिषमात्रें दग्धी त्रिभुवन ॥ विश्वंभर त्याहूनि कोटिगुण ॥ क्रोधायमान जाहाला ॥२१॥तिजा नेत्र उघडिला तत्काळीं ॥ तेणें शीतकर पोळ्ला जी भाळीं ॥ ते अद्यापि साक्ष शशि मंडळीं ॥ कलंक म्हणती ॥२२॥दक्षाचा शाप होता जी चंद्रासी ॥ तेणें झोंबला नेत्रदीप्तीसी ॥ रोहिणी त्यजूनि कृत्तिकेसीं ॥ प्रीति केली होती तेणें ॥२३॥इतुका वृत्तान्त तेथें वर्तला ॥ तंव नंदी भूतांसहित आला ॥ अवघा सैन्यभार शिवें देखिला ॥ त्याचि क्रोधा माजीं ॥२४॥देखे एक दांचि सर्वांगेम पोळलीं ॥ एख तीं शस्त्रें जर्जर झालां ॥ शिवाजवळी न येती राहिलीं ॥ शिव भुवनीं ॥२५॥ऐसा कोप उद्भवला शंकरा ॥ रागें विखुरला भस्मरा ॥ जोगवटा तोडोनि व्याघ्रांबरा ॥ फाडिलें गजाबर तें ॥२६॥डमरू हाणी तला मुष्टि घातीं ॥ तेणें दुमदुमिली वसुमती ॥ धाकें एकवट होऊं पाहाती ॥ सप्तही वरुणालय ॥२७॥पाषाण गडबडले गिरिवरी ॥ आसनीं स्थिर नोहे त्रिपुरारी ॥ मातृका चेव लिया पृथ्वी वरी ॥ स्वर्गीं चिया पैं ॥२८॥दश भुजीं धरिला जटा भारू ॥ त्राणें हाणी क्षितितळीं शंकरू ॥ भय भीत झाला मेरू ॥ गळालें सत्त्ववीर्य ॥२९॥तया मेरूची कामिनी पतिव्रता ॥ जे धरा नामें जंगमस्था वरता ॥ तिनें वीर्य झेलिलें गलित होतां ॥ महामेरूचें ॥३०॥तोचि गर्भ राहिला वसुमती ॥ मग ते जन्मली मेन कावती ॥ तिच्या कुक्षीं जन्मेल हैमवती ॥ तेंचि विचारिलें शिवें ॥३१॥शिवासी क्रोध याव याचा भाव ॥ तोचि भवानीनें विचारिला ठाव ॥ धाकें पळाला मुनिराव ॥ नारद पैं ॥३२॥जटा आसुडिली जगन्नथें ॥ ते क्रमिती झाली व्योमपंथें ॥ मग आवाहन केलें मन्मथमथें ॥ क्षितिजटा शिखरीं ॥३३॥शिवें जटा त्राहाटिलीसे मेदिनीं ॥ ते कडाडली महादीर्घध्वनीं ॥ कीं प्रळयमेघां चिया दामिनी ॥ उद्भवल्या शत कोटी ॥३४॥ध्वनी मध्यें तृतीय नेत्रींचा ॥ आहवनीय मिश्रित जाहाला तेजाचा ॥ उद्भवला पुतळा क्रोधाचा ॥ शंक्रा तुल्या जो ॥३५॥मुखेम शिव नाम उच्चार ॥ चतुर्भुज महाक्रूर वीर ॥ विशाळ विकट महाधीर ॥ वीरभद्र तो ॥३६॥जैसा तो शंकर सर्वा भरणेंसीं ॥ तैसाचि उद्भवला सर्व आयुधेंसी ॥ बिरूदें पढतसे शिवासी ॥ आपुले मुख वमनीं ॥३७॥व्याघ्रांबर त्रिशूळ डमरू ॥ विरूपाक्ष भाळीं अमृतकरू ॥ भूषण मिरवीतसे महीधरु ॥ वासुकी तो ॥३८॥मुकुटीं शोभायमान ग्रहतारा ॥ सर्व गात्रीं लेपिला भस्मरा ॥ श्रवणीं कुंडलें ज्योति प्रभाकरा ॥ मार्तंडातुल्य पैं ॥३९॥अधरीं जैसी वैदूर्याची शोभा ॥ दशनीं मिरविताती गंधर्वगर्भा ॥ स्तंभ दिसे पडतया नभा ॥ ऐसा ब्रह्म गोळ तो ॥४०॥चरणीं मिरवत बिरुदांचा तोडर ॥ चक्षु लोहित जैसें रक्तांबर ॥ दक्षिण ह्स्तीं विद्युल्लताकार ॥ शोभलें खङ्ग ॥४१॥वाम भुजीं मिरवे त्रिशूळ ॥ दक्षिण करीं परशु विशाळ ॥ तीक्ष्ण जैसा वडवानळ ॥ सूर्ययागींचा पैं ॥४२॥खेटक गदा चक्र महासधन ॥ सांवळा मुद्रर धनुष्य बाण ॥ क्रूरकांतिया सेलीचंद्रबाण ॥ सहस्त्र अस्त्रें मंत्रविधी ॥४३॥ऐसा सर्वशस्त्रा विद्याभरित ॥ भस्मधुळी दिसे जैसी उन्नत ॥ मग करसंपुट जोडूनि प्रार्थीत ॥ विश्वंभरासी ॥४४॥अंजली जोडोनियां चरणां ॥ म्हणे जय जयाजी भाललोचना ॥ जी हांकरिलें किमर्थ ॥ मज भृत्यासी ॥४५॥ऐसें वीरभद्रें प्रश्निलें गौरवें ॥ मग शंकर निरूपी सात्त्विकभावें ॥ वीर भद्रासी आज्ञा केली शिवें ॥ शांत शब्दें ॥४६॥तंव स्वामीसी वदे अगस्तिमुनी ॥ अति कृपावंत जाहाला शूळपाणी ॥ वीर भद्रासी मधुरवाणी ॥ वदता झाला काय तो ॥४७॥तंव षण्मुख म्हणे गा महाप्राश्निका ॥ मित्रावरुणां चिया कुलतिलका ॥ शांति गुण प्रकटला त्र्यंबका ॥ तो कैसा आतां ॥४८॥त्रय अग्निक्रोध आटिला कैसा ॥ ध्वनि शंकराची जे यंत्रमुसा ॥ तेथें क्रोधाग्नीचा ओतला ठसा ॥ वीर भद्र ॥४९॥वीर भद्र क्रोधाचा ओतिला ॥ मग तो शिव शांतरूप जाहाला ॥ वीर भद्राप्रती वदला ॥ ते कवण आज्ञा ॥५०॥आतां तूं माझी आज्ञा स्वीकारीं ॥ वहिला जाईं दक्षाचे अध्वरीं ॥ त्या यागीं तूं पूर्णाहुति करीं ॥ दक्षशिराची पैं ॥५१॥तेथें जे रुद्र भागा विरहित ॥ अवदानें भक्षेनि झालें तृप्त ॥ त्यांचें वमवूनि काढावें आंत ॥ ऊर्ध्वपाद अघो मुखें ॥५२॥यागीं वळंघावें अधो वदन ॥ जैसे योगी साधिती धूम्र वान ॥ शिवनिंदा ज्यांहीं केली जाण ॥ ते करावे विदेही ॥५३॥भवानी दग्धली शरीरेंसीं ॥ तिनें देह हुत केला यागासी ॥ ते तुम्हीं मागावी प्रजाप्रतीसीं ॥ शक्ति आमुची ॥५४॥तो नेदी अत्यंत बरवें ॥ तुम्हीं वेदवाक्य सत्य करावें ॥ दक्ष शिर कापूनि होमावें ॥ समस्तांप्रती साक्षीसी ॥५५॥ऐसी आज्ञा करूनि त्रिशूळधर ॥ मग जवळी पाचारिला वीर ॥ मस्तकीं ठेविला अभय कर ॥ दिधला पूर्ण मंत्र ॥५६॥विद्या निरू पिल्या अपारा ॥ ज्या जारणमारणी वीरां अगोचर ॥ मग वीर भद्र बृह स्पतिपुरा ॥ निघता जाहाला कैसा ॥५७॥सवें दिधले महादूभुत गण ॥ जे जे अद्भुत शक्तीचे दारुण ॥ निघालें अपार शिवाचें सैन्य ॥ तें कवण कैसें आतां ॥५८॥शाख विशाख गोकर्ण शैलादु ॥ भृंगी रिटी मणिमंत मंदु ॥ मुत्युं जय कीर्ति मुख स्कंदु ॥ लंबोदर तो ॥५९॥घंटाकर्ण विरुपाक्ष त्रिलोचन ॥ मणिमल्ल मयूराक्ष बाण ॥ कुर्कुट नैगम वीर दारुण ॥ अद्भुतशक्तीचे ॥६०॥ऐसे आठ कोटी गण गण प्रौढीचे ॥ जे जे अद्भुतशक्ति श्रेष्ठ नामांचे ॥ अत्यंत प्रीतिवंत शंकराचे ॥ गणचि होती ॥६१॥आणिक अष्ट कोटी महाबळ ॥ भैरवादिक हे पंच अढळ ॥ ब्रह्म ग्रह महाभूत विशाळ ॥ औट कोटी ॥६२॥ऐसा चौसष्ट कोटी गणांचा भार ॥ मध्यें दळाधिपती लबोदर ॥ मुख्य नायक अति क्रूर ॥ वीरभद्र तो ॥६३॥होतसे वाद्यतुरांचा ताळबंद ॥ गर्जती भेरी-मृदंगांचे शब्द ॥ भूतें यक्षिणी करिती आनंद ॥ सैन्य न्याहाळी शिव ॥६४॥ऐसे निर्घोष गर्जती अपार ॥ उतरले मेरूचे दक्षिण पार ॥ नैमिषारण्यीं बहस्पतिपुर ॥ देखते जाहाले ॥६५॥तेथें क्षिप्रागंगेच्या उत्तर पारीं ॥ शिव सैन्य स्थिरा वलें मेळिकारीं ॥ धूम्र दाटला देखती अंबरीं ॥ दक्षयागाचा पैं ॥६६॥मग वीर भद्र विचारी तये क्षणीं ॥ आलोच स्थापिला जी सर्व गणीं ॥ मग बोलता जाहाला गजाननी ॥ वीर भद्रासी ॥६७॥वीर भद्रासी वदे गजानन ॥ शिष्ट पाठविजे महा प्राज्ञ ॥ अकस्मात विंध्व सितां यज्ञ ॥ हा अनीति विचार ॥६८॥तेथें भृगु असे महा विंदानी ॥ म्हणेल मागी तली नाहीं भवानी ॥ मंत्र शक्तीं काढितों हवनीं ॥ शिवांगनेतें ॥६९॥अत्रि वसिष्ठादि स्वाक्षरी ॥ मंत्रसिद्ध बैसले त्या अध्वरीं ॥ म्हणती शिवा विरहित क्षण भरी ॥ न धरूं धैर्य सर्वथा ॥७०॥तो विश्वभराचा वरद कुमर ॥ इतुकें अनुवादला लंबोदर ॥ शिष्ट पाठवूनि पूर्ण विचार ॥ कळविजे तयांसी ॥७१॥मग वदता जाहाला शैलादु ॥ बरवा आरंभिला निबंधु ॥ येरवीं बहुत प्राप्त होतो खेदु ॥ शिष्टें विरहित ॥७२॥तरी त्या मंत्र्यां मधीं ॥ बोलीं जाणे जो सर्वही विधी ॥ ऐसा प्राज्ञ साध्य साधी ॥ पाठविजे शिष्ट ॥७३॥मग वदला ओत विरूपाक्ष धीर ॥ ऐसा मज भासतसे चंड वीर ॥ जो शिवा चिये प्रतिशब्दाचा निर्घार ॥ बोलों जाणतां ॥७४॥जैसा उडुगणी अत्रिबाळ ॥ कीं कुलाचलां मध्यें सुवर्णाचळ ॥ कीं चतु र्दश रत्नांत तेजाळ ॥ कौस्तुभ जैसा ॥७५॥कीं स्त्रीरत्नां माजीं गुणविशाळ ॥ लक्ष्मी शोभ तसे अळुमाळ ॥ कीं कवीं माजीं बृहस्पति कुशळ ॥ तैसा हा निश्चित जाणता ॥७६॥सवें साक्षी दीजे जी वेदां ॥ कीं वाचां मध्यें प्रमाणिजे नादा ॥ तो चंडवीर पाठविजे शैलादा ॥ न भासे आन चित्तीं ॥७७॥मग चंडीश निघे तत्क्षणीं ॥ पावला दक्षा चिया याग स्थानीं ॥ तंव देखतसे महावेदध्वनी ॥ गर्जती ऋषी ॥७८॥त्यांहीं तो येतां देखिला दुरोनी ॥ त्यासीं न बोलती कोणीचि सन्मानीं ॥ मग तो धीरत्वें जैसा पूर्णपणीं ॥ अचळ क्षीरार्णव ॥७९॥चंडवीर म्हणे गा प्रजापती ॥ केवीं त्वां आरंभिली याग स्थिती ॥ हवनीं दग्धिली शिवाची शक्ती ॥ हा तुमचा कोण भाव ॥८०॥सर्व ऋषी बैसले महाज्ञानी ॥ गर्जती वेदाची महा ध्वनी ॥ आणिक रुद्र भाग ही वंचुनी ॥ मानिला संतोष ॥८१॥कल्प द्रुम इच्छा पूर्ण करी फळीं ॥ वन्हि लाविजे तयाचे मूळीं ॥ हा उपकार त्रैलोक्य मंडळीं ॥ कैसा मिरविजे ॥८२॥तुम्ही सर्व देव शंकरा धीन ॥ तुम्हांसी ऐश्वर्य जें संपूर्ण ॥ तो सर्वही शंकरचि प्रसन्न ॥ कैवल्यदानी ॥८३॥जया चिया स्मरण मात्रें ॥ परा भवती मनोमळता पत्रें ॥ त्या दाक्षायणीवरें त्रिनेत्रें ॥ काय जी पीडिलें तुम्हां ॥८४॥दक्ष वदे जी चंडवीरा स्वामी ॥ आम्ही स्वस्थ कां नसों आपुले धामीं ॥ शिवे पीडिलें म्हणोनि होमीं ॥ शरीर घातलें भवानीनें ॥८५॥सर्व कन्या देखितां मनोहरा ॥ आणि भावानीसी पाहिजे भस्मरा ॥ म्हणोनि तृप्त केलें अध्वरा ॥ करी शरीराहुतीतें ॥८६॥चंडवीर विज्ञापी सर्व नीती ॥ परी न मानीचि तो दक्ष प्रजापती ॥ चंडवीराचे शब्द सुगंध जाती ॥ न रुचती दक्षवायसा ॥८७॥तेव्हां दक्ष वदे त्या शिव गणा ॥ म्हणे परिसें गा चंडवीरा सुज्ञाना ॥ तुम्हां दिगंबरांसी ॥ कुलांगना ॥ सहाजचि न पाहिजे ॥८८॥तुम्ही रुद्राक्षमालिका लेऊनी ॥ सर्वांगीं भस्म धूळीं लावुनी ॥ राजधामें त्यागोनि स्मशानीं ॥ अत्यंत प्रीति असे तुम्हां ॥८९॥दिव्य रथ वाजी प्रहरूनी ॥ आरूढ होतां वृष भासनीं ॥ आलेति पिसाटांचे भार घेऊनी ॥ तरी माघारे जा आतां ॥९०॥जो शिवाचे भाल चक्षीं वन्ही ॥ तेणेंचि दग्धिली दाक्षा यणी ॥ आम्हांसीं मागों आलेति भवानी ॥ ऐसे कपटी तुम्ही ॥९१॥आतां आलेति तरी स्वभावें ॥ सैन्यासह कैला सासी जावें ॥ युद्ध कराल तरी विशेष बरवे ॥ न होईल तुम्हां ॥९२॥चंडवीराचीं जीं नीतिवचनें ॥ तीं दक्षें मानिलीं तृणा समानें ॥ जैसीं विंध्वसिलीं सुमनें ॥ मातंगें सरोवरींण ॥९३॥मग चंडवीर म्हणे गा प्रजा पती ॥ या अध्वराची नव्हतां पूर्णाहुती ॥ तो षीडा करील गृह स्थांप्रती ॥ ऐसें वेदवाक्य ॥९४॥तरी न देतां शिवाची सुंदरा ॥ क्षय झाला जाण तुझिया शिरा ॥ पीडा आरंभिली गा द्विजवरां ॥ महाहविकांसी ॥९५॥वीर भद्र आला वीररावो ॥ दक्षा तो फेडील रे तुझा ठावो ॥ पुनरपि स्मरसील महादेवो ॥ हें भविष्य माझें ॥९६॥ऐसें बोलोनि गेला चंडवीर ॥ वीर भद्रासी विज्ञा पिला विचार ॥ आतां संग्राम मांडेल थोर ॥ तो मज वर्णवे ॥९७॥मेळिकारें आले दक्षाचे वीर ॥ जे जे नामाचे प्रौढीनें थोर ॥ जयंत आणि भग्नवीर ॥ आले युद्धासी ॥९८॥भृगु जाणतसे बहु मतें ॥ जेणें कोलितीं जाळिलीं भूतें ॥ आकांत केला शिववीरांतें ॥ क्षणैक तें काळीं ॥९९॥आतां युद्ध सांगतां सविस्तर ॥ तरी न सरे तो क्षत्रियाचार ॥ पुढें विलंब होतसे थोर ॥ शिव कथेसी ॥१००॥ बहुत शस्त्रांचे वर्णा वर्ण ॥ बहुत प्रौढीचे वीर दारुण ॥ निर्वाण युद्ध झालें पूर्ण ॥ वीरा वीरासंसीं ॥१०१॥तें संकलितचि परिसिजे श्रोतां ॥ परी पाहिजे युद्धाची महिमता ॥ शिव सैन्येंसीं दिक्पती झुंजतां ॥ झाला प्रलय आकांत ॥१०२॥वीर भद्रें पाचारिले जोशी ॥ घात पाहिला दक्ष रायासी ॥ शनि केतु आहेति जी धुरेसी ॥ तरी दक्ष सांपडेल ॥१०३॥जोशियें मुहुर्त दिधला पूर्ण ॥ त्रयो दश घटिका असे प्रमाण ॥ मग उठावलें शिव सैन्य ॥ सुमुहू र्तेंसी ॥१०४॥तंव दक्षें पाचारिले पुरो हित ॥ आम्ही संपादूं यागाचें कृत्य ॥ तंव पुरवा वीर महा द्भुत ॥ झुंझावया अग्रगण ॥१०५॥सवें सर्व ही जाताती दिक्पती ॥ यम वरुण मारुत सुरपती ॥ नैॠत कृशान आणि गभस्ती ॥ महावीर भृगु तो ॥१०६॥दक्ष सैन्याच्या मध्य प्रदेशी ॥ अशुभ वाणी माध्यान्ह दिवसी ॥ आणि चैत्य वृक्ष त्या ठायासी ॥ बोभाट केला ॥१०७॥तंव भरली मुहूर्ताची घटिका ॥ अष्टादश पळें षोडश मातृका ॥ मग सैन्य उठावलें झाला धोका ॥ वाद्यध्वनींचा ॥१०८॥तंव बोलता झाला नंदिकेश्वर ॥ युध्दी जिंकिके पर सैन्या भार ॥ परी दुख विजे ना लोकेश्वर ॥ समस्त वीर हो ॥१०९॥ऐसें उठावले शिव सैन्य ॥ धुरोळयानें कोंदलें गगन ॥ तेणें आद्दश्य झाला तो दिन ॥ पर्जन्य जैसा अंबरी ॥११०॥तंव वाद्यें ऐकिलीं द्विजवरीं ॥ मग समस्त उठावले मेळिकारीं ॥ शस्त्र सामुग्री रथकुंजरीं ॥ उठावले तेही ॥१११॥शिव वीर गर्जती दीर्घ स्वरीं ॥ कीं जैसे कल्पांतींचे मेघ अंबरीं ॥ महा शस्त्रवृष्टि दक्ष वीरांवरी ॥ वर्षते जाहाले ॥११२॥तेणें लोटले अशुद्धाचे ओघ ॥ वाहावले अश्व रथ मातंग ॥ तंव दक्ष वीरी केला महा वेग ॥ उठावले शिव सैन्यावरी ॥११३॥तिंही शिव सैन्यावरी केला मार ॥ वीर उठावले सर्व ही क्रूर ॥ ऐसें देखोनि नंदिकेश्वरी ॥ ठाकला रणीं ॥११४॥जो त्रिपुरांतकाचें निज वहन ॥ जो त्रिविधाकार शक्ति संपूर्ण ॥ शिववीरां मध्यें तो श्रेष्ठ गण सर्व प्रकारें ॥११५॥तं दक्ष वीर उठावला भग कोपून ॥ तेणें पाचारिला शिवाचा वहन ॥ त्यासी वदता जाहाला अति निपुण ॥ त्या रण स्थानीं पैं ॥११६॥भग वदे रे नंदी तृणचरा ॥ तुवां पृष्ठीं भार वाहिजे ढोरा ॥ क्षात्रधर्मा चिया नीति विचारा ॥ काय जाणसी तूं ॥११७॥नंदिकेश्वर कोपला भगावरी जाणा ॥ नासा पुटीं केली महा गर्जना ॥ कंप सुटला द्क्ष सैन्या ॥ चालिला भगावरी ॥११८॥तेणें धडकें पाडिले भद्र जाती ॥ श्रृंगें विदारिले अश्व हस्ती ॥ रथ चॄर्ण कारू नियां क्षितीं ॥ दाटिले महावीरां सहित ॥११९॥त्या भगें नंदिकेश्वरातें ॥ त्राणें हाणी तला गदा घातें ॥ तो प्रहार जैसें तरुपर्ण वातें ॥ उडविला नंदीनें ॥१२०॥मग धांविन्नला नंदिकेश्वर ॥ झडें हाणी तला भगाचा रहंवर ॥ रथचक्रांचा केला सहस्त्रचूर ॥ दाटिला क्षिती मध्यें ॥१२१॥आतां असो हे युद्धाची पद्धती ॥ भगवीर जिंकिला रणक्षितीं ॥ नंदीनें बांधिला मागिले हस्तीं ॥ नेला वीर भद्रा जवळी ॥१२२॥मग जय जयकार केला शिव गणीं ॥ भग वीर जिंकिला रणीं ॥ गर्जती वाद्यतुरां चिया ध्वनी ॥ करिती पुष्प वृष्टी ॥१२३॥तंव दक्ष सैन्य़ीं जाहाला हाहाकार ॥ शिव दूतीं नेला रे भग वीर ॥ दक्ष वीर जाहाले चिंतातुर ॥ तंव पूषा उठावला ॥१२४॥पूषावीर उठावला ते काळीं ॥ कीं तो महागिरि जैसा क्षितितळीं ॥ अर्ध सैन्य सवें महाबळी ॥ थोर थोर ॥१२५॥मग शिव सैन्य देखिलें नयनीं ॥ दक्ष वीर गर्जती महा ध्वनीं ॥ पूषा वीर आला म्हणोनी ॥ कैसे जाल आतां ॥१२६॥तव ठाकला वीर भद्र रणकर्कश ॥ त्यासी प्रार्थिता जाहाला चंडीश ॥ मी शांत करीन पूषाचा आवेश ॥ शांत व्हावें तुम्हीं ॥१२७॥चंडवीरें घेतले शिव गण ॥ मग पाचारिला पूषा वीर दारुण ॥ दोघांसी जाहालें निर्वाण ॥ शस्त्रास्त्रीं पैं ॥१२८॥त्राणें हाणिती सैन्या सबळा ॥ धड मुंडें पाडिती क्षितितळा ॥ भूर्तें वरपडा जाहाली सुकाळा ॥ रक्तमांसां चिया ॥१२९॥त्रिशूळचक्रें हाणिती महात्वरें ॥ अश्वगजांचीं कापिती शिरें ॥ निर्घोष होतसे वाद्य जगरें ॥ दोळींचा ॥१३०॥आतां असो हा युद्ध प्रकार ॥ पुढें ठाकला पूषावीर ॥ तेणें रगडिला परिवार ॥ शिववीरांचा ॥१३१॥लोटिले शोणिताचे कल्लोळ ॥ जैसे प्रातःकाळींचें रवि मंडळ ॥ तैसे रक्तांबर वीर सकळ ॥ खोंचले घायीं ॥१३२॥तंव चंडवीर पूषवरी चालिला ॥ जैसा गजावरी केसरी कोपला ॥ पूषापतंग वरपडला ॥ चंडदी पावरी ॥१३३॥पूषावरी येतां महाबळा ॥ चंडें पाश घातला त्याचे गळां ॥ आसडूनि आणिला शितितळा ॥ बांधिला हस्तीं मागुता ॥१३४॥शिव सैन्यीं झाला जय जय कार ॥ प्राणें स्वस्थ धरिला पूषावरी ॥ हरुषें आलिंगिती शिव कुमर ॥ शिव गणांतें ॥१३५॥तंव याग स्थानीं गेले दक्षदूत ॥ प्रजापतीसी जाण विती मात ॥ पूषवीर केला जी स्वस्थ ॥ झुंजतां चंडवीरें ॥१३६॥मग दक्ष जाहाला विचारिता ॥ पूषावीर नेला जी स्वस्थता ॥ तरी याग कार्य राहिलें आतां ॥ जाणें लागेल आम्हां ॥१३७॥आतां धरणें लागेल शौर्य ॥ केवीं त्या पिसाटांसी द्यावा जय ॥ मग शांत केलें कार्य ॥ यागा दिक जें ॥१३८॥यागासी करू नियां नमस्कार ॥ दीक्षा विसर्जी दक्ष वीर ॥ मग आरंभिला बुद्धि विचार ॥ युद्ध कार्याचा ॥१३९॥जामात पाचारिले दिक्पती ॥ त्यांसी आज्ञा करिता जाहाला प्रजापती ॥ तुम्हीं यागीं भक्षिल्या आहुती ॥ ते प्रतीति दाखवां आतां ॥१४०॥महा वीर आले रे शिव गण ॥ शिव विरहित भक्षिलें भाग दान ॥ तो पुरुषार्थ दाखवा नाहीं तरी वमन ॥ करविती तुम्हां ॥१४१॥क्षत्रिय म्हणवी आपणांसी ॥ तो पाहुणा जाय परदेशासी । अवसर जाहा लिया वंची युद्धासी ॥ त्यासी भोग निर याचा ॥१४२॥भग आणि पूषा नेले शिव गणीं ॥ ते शक्ति बळें आणूं सोडवुनी ॥ तंव ऐकिली वाद्य ध्वनी ॥ शिव वीरांची ॥१४३॥दक्ष शिव वीरांचे दळीं ॥ तंव छत्र देखे वीर भद्राचे मौळीं ॥ तेथें दिव्य कोदंड छत्रा तळीं ॥ जाण विती दूत ॥१४४॥देखती विशाल सुंदर त्रिनेत्री ॥ भस्म लेपिलें सर्व गात्रीं ॥ दक्षें देखिला वीर महाक्षत्री ॥ त्या रणांगणीं ॥१४५॥पवाडे मल्ल मिरविती त्या दळीं ॥ शिव नामें गर्जताती कल्लोळीं ॥ प्रति शब्द उद्भवती भूमंडळीं ॥ व्योमकुटीं पैं ॥१४६॥ऐसें देखे दक्ष प्रजा पती ॥ होते वीर महाद्भुत शक्ती ॥ शेष सैन्येंसीं आला रणक्षितीं ॥ दक्षराज तो ॥१४७॥तेथें दक्षरायाचे मेळिकारीं ॥ भृगु केलासे दळाधिकारी ॥ तो दक्ष बंधु जाणतसे कुसरी ॥ युद्धरचनेची ॥१४८॥दक्षराजा पुढें तो भृगुवीर ॥ मंत्रें चेतविला रणीं अंगार ॥ तेणें दग्धिला भूतांचा भार ॥ न धरिती ॥१४९॥मग विचारिलें शिव वीरीं ॥ जंव भृगु असे दक्ष दळाचा अधिकारी ॥ तंववरी प्रजापतीसी हारी ॥ सर्वथा नाहीं ॥१५०॥मग तो शिवाचा प्रीतिदूत ॥ तो भृगू वरी आला मणिमंत ॥ उठावला महा द्भुत ॥ जैसा वज्र धर गिरीवरी ॥१५१॥तो भृगूनें देखिला अद्भुत शक्तीचा ॥ तेणें स्त्रुवा प्रेरिला हस्तींचा ॥ दंत मोडिला मणिमंताचा ॥ प्रहारें तेणें ॥१५२॥मग क्रोधें खवळला मणि भद्र ॥ जैसा पंचबाणावरी कोपला रुद्र ॥ कीं कल्पांतीं उचंबळला समुद्र ॥ तैसा मणिभद्र कोपला ॥१५३॥तेणें कर्म केलें दुर्धर मग ॥ जैसा शुंडा प्रहारें हाणी मातंग ॥ तैसा दळपति भृगूसी भंग ॥ केला मणिमंतवीरें ॥१५४॥शिव नामें गर्जे रण मंडळी ॥ दोघांचें महा युद्ध झालें समफळीं ॥ तेथें भृगूसी जिंकिलें तत्कालीं ॥ मणिमंतें तेणें ॥१५५॥मागुती ह्स्त केले बंधन ॥ बांधिला ऊर्ध्वपाद अधोवदन ॥ मुष्टि प्रहारें ताडिती शिव गण ॥ आणिला वीर भद्रा जवळी ॥१५६॥मग त्या रण स्थानीं होता प्रजापती ॥ तयासी मात जाण विली दूतीं ॥ भृगु नेला जी अद् भुत शक्तीं ॥ शिव वीरीं पैं ॥१५७॥मग त्या भृगू चिया कैवारा ॥ दक्ष उठावला जी त्वरा ॥ त्यासी देखो नियां शिव कुमरा ॥ न सांवरे हर्ष ते काळीं ॥१५८॥तंव दक्ष उठावला जी बळें ॥ म्हणे हीं जिंकीन पिसाटदळें ॥ जैसा वायूनें पर्जन्य उधळे ॥ निक्षेपीं वहिला ॥१५९॥तंव सुमति नामें पुरो हित ॥ तेणें दक्षाचा धरिला हात ॥ म्हणे परियेसा जी माझी मात ॥ दक्ष राजा तुम्ही ॥१६०॥सुमति म्हणे गा महा दानी ॥ ऐसी नोहे राज नीतीची वाणी ॥ भूत्य असतां न झुंजिजे रणीं ॥ स्वामियें तेणें ॥१६१॥परचक्र आलिया संपूर्ण ॥ तैं क्षत्रि यींचि झूंज विजे आपण ॥ आपण दीजे गौरव गुण ॥ सेवकांसी रणीं ॥१६२॥ऐसें अरीनें आटिलें सर्व दळ ॥ तरी द्र्व्य दीजे आणिक शैल ॥ यापरी शांत वोनि परदळ ॥ राखिजे आपणां ॥१६३॥जरी स्वस्थ असेल शरीर ॥ तरी बहुसाल होती कन्या कुमर ॥ लक्ष्मी-कलत्र-भृत्य-गिरिवर ॥ होतील राया ॥१६४॥भृत्य असतां स्वामी जवळी ॥ तुम्हांसी अधिकार नाही रण मंडळी ॥ आम्ही पडलिया क्षितितळीं ॥ मग कीजे मनोदयो ॥१६५॥स्वामीसी पडलिया नष्ट काळ ॥ तेथें भृत्य चुके झुंजतां वेळ ॥ तो सत्यचि भोगी निरय अमंगळ ॥ पडे चौर्यायशीं लक्षीं ॥१६६॥दक्ष म्हणे गा पुरो हिता सुमती ॥ हे सत्यचि निरू पिली राजनीती ॥ परी हे शिव वीर आले असती ॥ निर्वाण युद्धासी ॥१६७॥आतां हा चि गा विचार ॥ आम्हां झुंजणें लागेल निर्धार ॥ मग तो प्रसूतिकांत अप्रतिम वीर ॥ काय करिता जाहाला ॥१६८॥म्हणोनि दक्ष उठावला महात्वरें ॥ सवें सैन्य घेतलें अपारें ॥ तंव गर्जना केली शिव कुमरें ॥ वीर भद्रें पैं ॥१६९॥ती ध्वनि ऐकिली प्रजापतीनें ॥ मग रथीं घातलीं शस्त्रा भरणें ॥ निगुती सज्जूनियां शरासनें ॥ बैसला रथीं ॥१७०॥दोघे जाहाले समद्दश्याकारें ॥ दोहीं दळीं लागलीं वाद्यें तुरें ॥ मग एकमेकांसी प्रत्युत्तरें ॥ वदते जाहाले ॥१७१॥वीर भद्र म्हणे यज्ञकारका ॥ आतां साहें रे दक्षा शिव निंदका ॥ तृप्त करीन हे रण भूमिका ॥ तुझिया शोणितें ॥१७२॥जैसें त्या वनचरा जंबुका ॥ धुंडी तसे मृगेश अरण्य भूमिका ॥ तैसा आलों रे यज्ञकारका ॥ तुज पहा वया या नगरीं ॥१७३॥ तंव तूं सांपडलासी या नगरी ॥ आतां न जासी ब्रह्मांडा बाहेरी ॥ तुज प्राणान्त प्रयश्चित्त देईन तीरीं ॥ या क्षिप्रागंगेच्या पैं॥१७४॥तुवां दग्धिली शिवाची शक्ती ॥ परी न जाहाली यागाची पूर्ती ॥ आतां त्यासी देईन पूर्णाहुती ॥ तुझिया शरीराची ॥१७५॥ऐसीं वीर भद्राची प्रत्युत्तरें ॥ दक्षें परिसिलीं अतिक्रूरें ॥ मग उठावला एक सरें ॥ बोलत वीर भद्रासी ॥१७६॥म्हणे रे शिव सुता पुरंदरा ॥ घेऊनि आलासी भूतां चिया भारा ॥ परी न तुळती व्योमीं चिया तारा ॥ मार्तंडासीं पैं ॥१७७॥मग प्रवर्तला युद्धा कारण ॥ मंत्र विधि आव्हा निला संपूर्ण ॥ मग सज्जिते जाहाले शरा सन ॥ उभय वर्ग ते ॥१७८॥धनुष्यें झणत्कारिलीं वज्र मुष्टीं ॥ मोकलिती महा शस्त्रांच्या कोटी ॥ पृथ्वी आकाशीं जाहाली बाण वृष्टी ॥ व्यापलें दंग्मंडळ ॥१७९॥एक तो विरिंचिनाथाचा कुमर ॥ दुसरा शिव सुत पुरंदर ॥ दोघां जाहाला क्षत्रियाचार ॥ तो मज न वर्णवे ॥१८०॥क्रोधें खवळला तो प्रजापती ॥ बाण मोकलिले अपरिमिती ॥ ऐसा उठावला करीत शांती ॥ सर्व सैन्याची तो ॥१८१॥ऐसें देखोनि तो पुरंदर ॥ कोपला वीर भद्र शिव कुमार ॥ जैसा तृणावरी चेते अंगार ॥ महा शैलीं पैं ॥१८२॥दक्षिण हस्तीं प्रज्वलितखङ्गें ॥ छेदीत दक्षवीरांचीं मुंडें ॥ क्षितितळीं पाडीतसे रुंडें ॥ गिरि जैसे उत्पाटुनी ॥१८३॥दोघांचीं सरलीं अस्त्रें बाण ॥ दोघे असाध्य एकमेकांकारण ॥ अगम्य झालें दक्षाचें मरण ॥ वार भद्रासी पैं ॥१८४॥ऐसे नाना शस्त्रें झुंजिन्नले ॥ मग थोर खेडें क्षीण जाहाले ॥ एकमेकांसीं अंगें आदळले ॥ मल्लयुद्धीं परियेसीं ॥१८५॥मग शस्त्रें टाकूनि क्षितीसी ॥ वीर भद्र झटकला अंगेंसीं ॥ तेणें दक्ष धरिला मुक्त केशीं ॥ बहुतां आवेशें ॥१८६॥दोघांचें मल्लयुद्ध हातो फळीं ॥ दुमदुमली अवघी महीतळी ॥ प्रति शब्द उद्भवती नभोमंडळीं ॥ थरारले शेष-कूर्म ॥१८७॥वीर भद्रें दक्ष धरिला मौळीं ॥ पाणिप्रहारें हाणीतला वक्षःस्थळीं ॥ ऊर्ध्व मुख पाडिला क्षितितळीं ॥ शिव कुमारें तो ॥१८८॥शस्त्रें छेदूं पाहे तत्क्षणीं ॥ तंव बोलिली गगनवाणी ॥ दक्ष अमरकंद असे त्रिभुवनीं ॥ हा वरद विष्णूचा असे ॥१८९॥मग वीरभद्र विचारी मनीं ॥ जेथें कोटिवीर संहारिलें चक्रपाणीं ॥ किमर्थ वदली हे गगनवाणी ॥ असत्य आम्हांसी ॥१९०॥ब्रह्म कल्पीं क्षय विरिंचिनाथासी ॥ महाकल्पांतीं नाश होय विष्णूसी ॥ मग तयांचे प्रसन्न तेसी ॥ कैचा जयो ॥१९१॥म्हणोनि कोपला वीरभद्र ॥ जैसा कल्पांतीं उचंबळे समुद्र ॥ मग ह्रदयीं देखता जाहाला छिद्र ॥ दक्षमृत्यूचें ॥१९२॥वक्षःस्थळीं दडपिलें चरणें ॥ मुष्टीं मौळीं धरिलें दाटीनें ॥ कंठनाळ मोडिलें शिवनंदनें ॥ परी प्राणें स्वस्थ असे ॥१९३॥शस्त्र न शिरे दक्षाचे शरीरीं ॥ शिर न तुटे कवण्याही परी ॥ मग तो वीरभद्र काय करी ॥ ते काळीं परियेसा ॥१९४॥धरोनियां महा प्रौढीसरिसें ॥ शिर मोडीतसे महा आवेशें ॥ तंव तें भ्रमे कुलालचक्र जैसें ॥ गरगरां चक्राकार ॥१९५॥बाहेरी पडिलीं चक्षुबुबुळें ॥ त्राणें त्राहाटिलीं विशाळें ॥ जेवीं मंद दिसती चंद्रमंडळें ॥ वेधिली ग्रहणीं ॥१९६॥वक्षःस्थळ दडपिलें वामचरणीं ॥ शिर तोडिलें जी उभयपाणीं ॥ उद्भवली प्रलयमेघांची ध्वनी ॥ तेणें थरारलें व्योम ॥१९७॥दक्षदंड पडलें क्षितितळीं ॥ निघाली शोणिताची उकळी ॥ चमत्कार जाहाला रणमंडळीं ॥ तो परिसिजे श्रोतीं ॥१९८॥जवळी होता दक्षजामात ॥ जो वरुणनामा कर्दमसुत ॥ तो धांविन्नला जी अकस्मात ॥ विष्णू चिये आज्ञेनें ॥१९९॥तेथें दक्षाचें पडलें होतें शोणित ॥ तें वरुणें नेलें समस्त ॥ मग तें बहुकाळ पर्यंत ॥ होतें वरुणाजवळी ॥२००॥असो ही कथा सांगों पुढारी ॥ दक्षाचें शिर घातलें अध्वरीं ॥ पूर्णाहुति केली त्या अवसरीं ॥ स्वहस्तें वीरभद्रें ॥२०१॥मग आज्ञा केली शिवगणांसी ॥ ते वीर धांविन्नलें वेगेंसीं ॥ त्यांहीं धरूनि बांधिले महाऋषी ॥ यागकार जे ॥२०२॥गण धांविन्नलें सैरावैरा ॥ त्यांनीं पळतां धरिलें द्विजवरां ॥ तेथें एकासी आरंभिलें मारा ॥ यागपात्रेंवरी ॥२०३॥एक ते ऊर्ध्वपाद अधोवधनीं ॥ वृक्षीं वळंघविले शिवगणीं ॥ म्हणती यज्ञभाग भक्षिला हवनीं ॥ शिवाविरहित तुम्हीं ॥२०४॥शिवाविरहित भक्षिलीं अवदानें ॥ तेणें तुम्हां कृपथ्यें जाहालीं अजीर्णें ॥ म्हणोनि मात्रा देतों संपूर्णें ॥ वमकेश्वरा चिया ॥२०५॥मग एकाचें उदर दाटिती ॥ एक ते भडभडां हव्यें वमिती ॥ ऐसी ब्राह्मणांवी केली विपत्ती ॥ शिवगणीं तेथें ॥२०६॥आतां असोत हीं विनोदछिद्रें ॥ दक्षशिर हविलें वीरभद्रें ॥ मग काय केलें महारुद्रें ॥ त्या रणमंडळीं ॥२०७॥वीरश्रियें दाटलासे शिवकुमरू ॥ तेणें त्राणें जर्जविला डमरू ॥ मग शिवमंत्राचा केला उच्चारू ॥ फुंकिली विभूती ॥२०८॥रण पडिलें होतें जें स्थानीं ॥ तेथें विभूति केली संजीवनी ॥ पवाडमल्ल नाम जाहालें म्हणोनी वीरभद्रासी पैं ॥२०९॥तेथें शिरें जडिलीं हो प्रेतीं ॥ वीर उठावले करीत शिवस्तुती ॥ ते शुद्ध केले प्रायश्चितीं ॥ वीरभद्रखङ्गधारीं ॥२१०॥तेथे शिवनिंदकांचा खंड केला ॥ शिवपूजकांसी नाभीकार दिधला ॥ दक्ष वधोनियां जयवंत जहाला ॥ वीर महाद्भुत तो ॥२११॥भृगु भग धरिले होते गणी ॥ ते सोडिले दीर्घ पीडा करूनी ॥ मग ते प्रवर्तले शिवस्तवनीं ॥ हा भाव विभूतीचा ॥२१२॥भृगूचे ओष्ठरोम तोडून ॥ भग अंध केला नेत्रांहून ॥ पूषावीर केला दशनविहीन ॥ पाडिल्या तयाच्या द्विजपंक्ती ॥२१३॥ मग धरूनि आणिले दिक्पती ॥ मागुती बांधिले हस्तीं ॥ वीरभद्र म्हणे तयांप्रती ॥ ऐका उत्तर माझें ॥२१४॥जरी तुम्हां जीविताची आशा पूर्ण ॥ तरी आहुति करा रे वमन ॥ रुद्राविरहित अवदान ॥ भक्षिलें तुम्हीं ॥२१५॥मागतसें मी यज्ञकारकां ॥ आणि दिक्पाळादिक रक्षकां ॥ यज्ञीं दग्धिली आमुची अंबिका ॥ तुम्हांदेखतां ॥२१६॥जेथें शिवासी नाहीं यज्ञ भाग ॥ तेथें तुम्ही सिद्ध केवीं करितां याग ॥ जेवीं दीपघटेसी पतंग ॥ उल्हासे देखोनि ॥२१७॥म्हणोनि इंद्रादिक जे दिक्पती ॥ वृक्षीं वळंघिले तेव्हां शिवभक्तीं ॥ भक्षिलीं अवदानें वमविती ॥ शिवगण ते ॥२१८॥ऐसी पीडा करूनि दिक्पाळां ॥ वीरभद्र आला यागा जवळा ॥ मग आज्ञा केली भूतां सकळां ॥ विझवा रे हा याग ॥२१९॥द्विजांचे मस्तकीं घट देऊनी ॥ याग शांत करावया आणविती पाणी ॥ एक ते भूतें लघुशंका करूनि ॥ शांत केलें हवन ॥२२०॥कुरंगरूपें पळाला अंगार ॥ मग तेणें सेविलें गिरीपाठार ॥ जयवंत जाहाला शिवकुमार ॥ दक्ष वधोनियां ॥२२१॥मग लागल्या वाद्यध्वनी ॥ वीरभद्र निघाला शिव भुवनीं ॥ समस्त सैन्य पुढें करूनी ॥ पावले कैलासा ॥२२२॥तंव अगस्ति वदे स्वामी ॥ दक्षाचें प्रेत पडलें रण भूमीं ॥ मग शिव गण उमपले व्योमीं ॥ कैलासंपथें ॥२२३॥मग दक्षरा याची कांता ॥ ते स्वयंभूननूची दुहिता ॥ प्रसूतानामें महापतिव्रता ॥ आली रण भूमीसी ॥२२४॥तेथें सर्वही उठविले देखे वीर ॥ परी पडिलें दक्षाचें शिर ॥ मग ते पतिव्रता सुंदर ॥ काय करिती जाहाली ॥२२५॥दक्षाचें रुंड त्या रण मंडळीं ॥ तें धरोनि राहिली वक्षःस्थळीं ॥ तिचिया सत्त्वास्तव चंद्र मौळी ॥ करील कृपा ॥२२६॥आतां अगस्ति प्रश्नील स्वामीसी ॥ पुढारी द्क्षकथा ते कैसी ॥ शिवदास गोमा प्रार्थी श्रोतयांसी ॥ ते कथा परिसा आतां ॥२२७॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दक्षचरित्रे वीरभद्रविजयवर्णनं नाम एकोनसप्ततितमाद्यायः ॥६९॥॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP