मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६७ वा

काशीखंड - अध्याय ६७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी षड्‍वक्रा ॥ तुम्हां शरण जी अष्टादशनेत्रा ॥ जैसा सृष्टिकार्यासी आनंदे धात्रा ॥ तैसा तूं मज स्वामी ॥१॥
स्वामी तुम चिया उपकारा ॥ उत्तीर्ण नव्हें जी शिव कुमरा ॥ स्वामी क्षुधातुरा चिया सागरा ॥ क्षीरार्णव तूं ॥२॥
तूं मज अशक्ताची कामधेनु ॥ मज चिंता तुराचा चिंतामणू ॥ तूं माझिया कल्पनेचा संपूर्णू ॥ कल्पद्रुम होसी ॥३॥
माझें तपसा मध्यें जी थोरकडें ॥ तुम्हांसी घाली तसें पृच्छेचें सांकडे ॥ आम्ही न तुळों जी तुमच्या पाडें ॥ परी क्षमा करी तसां ॥४॥
जैसें मानवीं आणिलें मृग धारासी ॥ बहुप्रीति अंतर तुळितां स्पर्धेसी ॥ तयापाडें परी सामर्थ्य लोकांसी ॥ कौतुक तयाचें ॥५॥
तैसा मी मर्कट शरीर ॥ मज तुम्हांसी बहु प्रीत अंतर ॥ मज देतां पृच्छेचा परिहार ॥ हे क्षमा तुमची ॥६॥
भक्ती विण मज होतां प्रसन्न ॥ यागाविर्हित देतां अवदान ॥ स्वामी पात्रा विण समर्पण ॥ करितां दानें ॥७॥
तरी प्रश्न असे जी स्वामी स्कंदा ॥ दक्षें केली शंकराची निंदा ॥ मागुती पूजिलें सच्चिदानंदा ॥ विश्वनाथासी ॥८॥
दक्ष निखंदी त्रिनयना ॥ आणि कैसा आला गंगो चिया स्नाना ॥ काशी मध्यें स्थापिलें पंचानना ॥ तें दक्षेश्वरलिंग पैं ॥९॥
तेणें किमर्थ जी शिव निंदिला ॥ आणि किमर्थ जी शिव वंदिला ॥ शिव-दक्षां कलह जोडला ॥ किंनिमित्त स्वामी ॥१०॥
तंव स्वामी म्हणे श्रोत्रोत्त मपात्रा ॥ मित्रा वरुणसुता महा पवित्रा ॥ श्रवण दीजे गा दक्षचरित्रा ॥ सांगेन सविस्तर ॥११॥
विरिंचिदेवाचे सप्तही कुमर ॥ ते सप्त ऋषी महा सृष्टिकर ॥ त्यांमध्यें समर्थ राजेश्वर ॥ तो दक्षराजा ॥१२॥
त्यासी ब्रह्मयाचे अंगुष्ठीं उत्पत्ती ॥ विधीनें नाम ठेविलें प्रजापती ॥ पत्नी मेळविली नामें प्रसूती ॥ स्वयं भुमनूची कन्या ॥१३॥
मग शिप्रागंगेचे तीरीं ॥ बृहस्पतिनामें पुण्यपुरी ॥ दक्ष केला तेथींचा अधिकारी ॥ विधीनें स्वहस्तें ॥१४॥
ऐसा तेथें दक्ष राज्य करितां ॥ सर्व देव ऋषींचा झालासे दाता ॥ इच्छा दान देतसे प्रसूता ॥ पतिब्रता त्याची ॥१५॥
ऐसें क्रमलें बहुत काळवरी ॥ मग दक्षासी प्रार्थी ते सुंदरी ॥ पुत्र प्रजा नाहीं आपुल्या मंदिरीं ॥ पुत्रे विण गृह अशोभ्य ॥१६॥
मग दक्ष प्रिये चिया मता ॥ कुल गुरुसी जाहाला आराधिता ॥ तंव तो दधीचि महा ऋषि होता ॥ नैमिषारण्यीं ॥१७॥
तो दधीचि आला बृह स्पतिपुरा ॥ दक्षें सन्मान केला तया मुनिवरा ॥ मृगा जिनीं पूजिलें ऋषीश्वरा ॥ महा आदरें ॥१८॥
तंव गुरूसी प्रार्थी दक्षराजा ॥ आणि प्रसूता पत्नी सलज्जा ॥ म्हणे जेणें पविजे पुत्र प्रजा ॥ ते भक्ति सांगा आम्हां ॥१९॥
प्रजापतीसी वदे ऋषीश्वर ॥ कन्यादानाची करीं सामुग्री अपार ॥ मग आराधिंजे तो वैश्वानर ॥ पुत्रकामनेस्तव ॥२०॥
मग दक्षें याग केला संतुष्टीं ॥ कन्या जाहाल्या सालं कृता साठीं ॥ मग त्या क्षिप्रागंगेचे तटीं ॥ दक्षानें केलें स्वयंवर ॥२१॥
कृतान्त आणि गार्ह पत्याग्न ॥ नैऋत्य मार्तंड आणि वरुण ॥ चंद्र समीर आणि पंचानना ॥ हे जामात केले ॥२२॥
बहुकाळ क्रमिल्या उपरी ॥ महा पुण्याधिका त्या दक्षकुमरी ॥ ऐसे वर लाधल्या सुंदरी ॥ पूर्वत पसुकृतें ॥२३॥
ऐशा त्या कन्या आपापुलें मंदिरीं ॥ स्वामि भक्तिणी सुखशेजारी ॥ परी तो दक्षराजा चिंता करीं ॥ कन्या सुख दुःखां चिया ॥२४॥
दक्ष राजा वदे प्रसूतीसी ॥ शूभ गुणी जामात जोडले आम्हांसी ॥ पार नाहीं कन्यां चिया भाग्यासी ॥ जोडले इच्छावर ॥२५॥
अवघिया जामातांमाजी क्रूर ॥ महादुष्ट बुद्धि तो अमृतकर ॥ तैसाचि अभिमानी लाधली वर ॥ दाक्षायणी ते ॥२६॥
आपुले मंदिरीं स्वगुणें वर्ततां ॥ संज्ञेसी पीडा करी तो सविता ॥ कन्या प्रसवलों परी चिंता ॥ न जायेचि माझी ॥२७॥
जरी मी दक्ष प्राणें स्वस्थ असेन ॥ तरी त्या कन्यांचें उसनें घेईन ॥ यज्ञ काळी त्यांचा मान हरीन ॥ देवां माजी सर्वथा ॥२८॥
मग त्या बृहस्पतिपुरनगरीं ॥ अनुपम दक्षराजाचे घरीं ॥ पुरोष्टियागाची सामुग्री ॥ आरंभिली दक्षानें ॥२९॥
मग त्या नैमिषारण्या माझारी ॥ क्षिप्रागंगेच्या पुण्यतीरीं ॥ यज्ञमंडपा बर वियापरी ॥ घातला दक्षानें ॥३०॥
पाचारिले महाजुनाट ऋषी ॥ मूळ पाठ विलें इंद्रा दिकांसी ॥ गण गंधर्व सुर यागासी ॥ आले दक्षा चिया ॥३१॥
अष्ट ही जामात आले दिक्पती ॥ हरि विरिंचि आणि पशुपती ॥ महा अद्‍भुत सभा दाटली युक्ती ॥ नृत्यांगना पातलिया ॥३२॥
पूज्य मान बैसले त्रिपुरारी ॥ सभाषति शोभा यमान हरी ॥ विरिंचि जाहालासे आचारी ॥ दक्ष यागी पैं ॥३३॥
मग प्रदीप्त करूनि हुताशना ॥ महा ऋषि प्रवर्तले हवना ॥ अंगिरा वसिष्ठ हे क्षत्रिय विधाना ॥ कथिती हव्यें ॥३४॥
स्वाहा शब्दें हविती होमीं ॥ ध्रुव मंडवळीं ज्वाला कोंदल्या व्योमीं ॥ अवदानें संकल्पिती मंत्र नेमीं ॥ मरीचि भार्गव ॥३५॥
ऐसा यागाची होतसे विधिपूजा ॥ याग आरंभिला पुत्र काजा ॥ तंव यज्ञमंडपीं दक्षराजा ॥ आला हव्यसा मग्रीसीं ॥३६॥
अत्रि ऋषीनें घेतलीसे यज्ञदीक्षा ॥ दानमंडपीं बैसविलें दक्षा ॥ सभा अवलो कितां विरूपाक्षा ॥ देखिलें पूज्य स्थानीं ॥३७॥
सर्व जामात आले प्रिया घेऊनी ॥ दिव्यांबरीं मिरविती याग स्थानीं ॥ तेथें उमेतें न देखेचि नयनीं ॥ द्क्ष राज तो ॥३८॥
म्हणे सर्व कन्या आलिया अध्वरीं ॥ यज्ञ मंडपीं न देखेंचि गौरी ॥ आपणचि आला हा त्रिपुरारी ॥ स्त्रिये विण यागासी ॥३९॥
शिव बैसला पूज्य सिंहसनीं ॥ दक्षाचा प्रदीप्त झाला क्रोधाग्नी ॥ म्हणे परिसा रे माझी वेदवाणी ॥ समस्त देव हो ॥४०॥
गृहीं त्यागो नियां स्त्रिया सुंदरा ॥ आपण क्रमिजे यागस्वयंवरा ॥ स्त्रीविर हित सौभाग्य नरा ॥ नाहीं गा मंडपीं ॥४१॥
ज्या ज्या पतिव्रता कुलांगना ॥ स्वामि भक्तिणी तारुण्यसगुणा ॥ त्यांसी वंचूनि कार्य कारणां ॥ क्रमितां अशोभ्या ॥४२॥
आपण क्रमिजे कार्य कारणीं ॥ गृहीं एकली ठेवूनि कामिनी ॥ दासी पुत्र प्रजा तरी भुवनीं ॥ स्वसुखेंचि कां नसो ॥४३॥
तरी हा निपुत्रिक त्रिपुरारी ॥ यानें गृहीं ठेविली सुंदरी ॥ कैसा मिरवतो सभेमाझारी ॥ निर्लज्ज शूळिया ॥४४॥
येर यामात माझे पुत्रप्रजांसीं ॥ याग करावया आले सहस्त्रियांसीं ॥ तैसा न देखों हा स्मशानवासी ॥ दीर्घ जटिया हा ॥४५॥
कोठें ते सुंदरी दक्ष बाळी ॥ तियेची कैंचा नेमिला हा शूळी ॥ सर्व देवां वेगळाचि भाळीं ॥ तृतीय नेत्र ॥४६॥
गौरी ऐशा सुंदरीचा करोनि त्याग ॥ अक्षते विण पाहूं आला याग ॥ आजि यासी न द्यावा रे यज्ञ भाग ॥ हेचि आज्ञा माझी ॥४७॥
यासी म्हणतां रे शंभु महेश ॥ याचें कवण नगर कवण देश ॥ कवण याचा गुरु उपदेश ॥ कवण अधिकार यासी ॥४८॥
यासी म्हणती शिव पंचानना ॥ जाती ना कुळ ऐसा हा कवण ॥ यासी राहावयासी एक स्थान ॥ न देखों आम्ही ॥४९॥
यासी देव म्हणती ईश्वर म्हणती ईश्वर ॥ तरी हा संन्यासी ना दिगंबर ॥ ज्ञाता म्हणों तरी शरीरस्मर ॥ असेना यासी ॥५०॥
सुंदर म्हणों तरी पंचवक्र ॥ दश भुज पंचदशनेत्र ॥ महाप्रळयांतीं शत्रु विचित्र ॥ त्रैलोक्याचा ॥५१॥
क्षत्रिय म्हणों तरी शस्त्र नसे मुष्टीं ॥ अश्व नाहीं बैसे वृषभाचे पाठीं ॥ स्त्रिया प्रहरूनि गिरिकुटीं ॥ रिघतसे वेळोवेळां ॥५२॥
ब्राह्मण ऐसें म्हणावें याप्रती ॥ तरी यासी नेणती वेदश्रुती ॥ पंचाग्नि षट्‍कर्मनीती ॥ आगम्य यासी ॥५३॥
शूद्र म्हणों तरी गृहीं नाहीं सृष्टी ॥ सर्पाचें जानवें सुनील कंठीं ॥ अव्हेरूनि चंदनागरूची उटी ॥ लावीतसे भस्मधूळी ॥५४॥
गृहस्थ हा म्हणावा पंचाननी ॥ तरी याचें राहाणें स्मशानीं ॥ तेथें कनकपत्रीं पुष्पीं शूळ पाणी ॥ पूर्ण असे हार ॥५५॥
ब्रह्मचारी म्हणों हा भाललोचनी ॥ तरी गृहीं सुंदरी दाक्षायणी ॥ तियेविरहित मंडपस्थानी ॥ मिरवतसे पूज्यमान ॥५६॥
जरी वानप्रस्थ म्हणावें यासी ॥ तरी अन्न नाहीं भक्षावयासी ॥ त्रैलोक्य स्मरतसे वृथाचि यासी ॥ ऐसा हा कवण ॥५७॥
यासी राहावया नाहीं देश ॥ कवण माता पिता कवण ग्रामीं वास ॥ कवणाचा शिष्य कवण वेष ॥ हें नेणों आम्ही ॥५८॥
हालाहल भक्षी सुनीलकंठ ॥ धर्मकर्म नेणे आचार भ्रष्ट ॥ नित्य भाळीं विभूतीचा त्रिपुट ॥ भयंकर हा ॥५९॥
शार्दूलचर्मीं करी हा शयन ॥ गजचर्म यासी परिधान ॥ शंखरुद्राक्षांचें आभरण ॥ वाहातसे भार हा ॥६०॥
अनेकनामी हा जाश्वनीळ ॥ हा कधीं नाहीं देखिला सुशीळ ॥ सर्व पदार्थीं अमंगळ ॥ कवणें पाचरिला ॥६१॥
ऐसा अमंगळ क्रोधी थोर ॥ यासी देव म्हणती ईश्वर ॥ ऋषि द्ग्ग्ज वज्र धर ॥ म्हणती हा स्वामी आमुचा ॥६२॥
सर्वां माजीं श्रेष्ठ यासी म्हणती ॥ जामातांची ऐसीचि नीती ॥ सासरियाचे गृहीं मिरविति ॥ वाउगीचि थोरीव ॥६३॥
बैसावें ऊर्ध्व मान करूनीं ॥ महागर्विष्ठ उंच सिंहासनीं ॥ पाहे आम्हांकडे व्यंकटलोचनीं ॥ दीर्घ निर्लज्ज हा ॥६४॥
तैसाचि निर्लज्ज अमृतकर ॥ तो सत्तावीस कुमारींचा वर ॥ सन्मानपूजेचा बडिवार ॥ न करी आम्हांसी ॥६५॥
तेणें एक वंचिलें कृत्तिकेसी ॥ आणि प्रीति केली रोहिणीसी ॥ मग म्यां शापूनि तयासी ॥ कंलक लाविला ॥६६॥
तैसाचि हा शूळिया करीन ॥ देवांमाजी याचा मान हरीन ॥ तरीचि मी दक्ष राज होईन ॥ पुत्र विरिंचिनाथाचा ॥६७॥
ऐसें त्या दक्षरायाचें वचन ॥ ऐकोनि स्तब्ध झाले समस्त गीर्वाण ॥ तंव ऋषीश्वरीं सारिलें हवन ॥ पूर्णा हुतीचें ॥६८॥
मग प्रवर्तले आशीर्वचना ॥ पूर्ण केली दक्षाची कामना ॥ मग प्रवर्तले दक्षिणा दान ॥ सत्पात्रांसी सन्मानें ॥६९॥
सुखी केले सर्व देव ऋषी ॥ अलंकार दिधले जामा तांसी ॥ प्रति आदर न करीचि शिवासी ॥ हरिला मान तयाचा ॥७०॥
मग दक्ष म्हणे सर्व देवांसी ॥ यज्ञ भाग न द्यावा शिवासी ॥ मग तो या सप्तद्वी पवतीसी राहों नेदीचि शापें ॥७१॥
ऐसा अपमनिला त्रिनयन ॥ शिवाचें वर्जिलें भाग दान ॥ परी शिव न करीचि प्रतिवचन ॥ श्वशुरत्व म्हणोनी ॥७२॥
ऐसा अपमान देखोनि शंकरा ॥ तंव कोप न सांवरेचि नंदिकेश्वरा ॥ उठावला स्वामीचे कैवारा ॥ अतुर्बळी तो ॥७३॥
म्हणे दक्षा गर्विष्ठा थोरा ॥ विनाशकाळ आला रे अविचारा ॥ शिवाचा भाग न देतां अध्वरा ॥ जय कैंचा येईल पैं ॥७४॥
ऐसा या मही मंडळी कवण ॥ जो शंकराचा भाग करील जीर्ण ॥ वमूनि काढीन तें अवदान ॥ प्रमथांपासोनि ॥७५॥
शिवा विरहित जे यज्ञसिद्धि ॥ ते कैसी प्राप्त होईल सिद्धी ॥ सुखा साठीं घेतली व्याधी ॥ गर्विष्ठा प्रजापती ॥७६॥
तुवां निंदिला विश्वंभर ॥ तुज कां नाही शरीरस्मर ॥ शिवेंविण जो स्थापील अध्वर ॥ तो निष्फळ जाणावा ॥७७॥
शार्दूलाचें भक्ष्ययोजन ॥ तें जंबुकासी केवीं होय जीर्ण ॥ जैसा वस्त्रीं बांधोनि हुताशन ॥ यज्ञ करुं पाहासी ॥७८॥
अरे जें भागदान शंकराचें ॥ तें हालाहाल सिंधुमथनींचे ॥ एक शंकराविरहित त्याचें ॥ न करवे कोणा प्राशन ॥७९॥
अमृतास्तव मथिलें सिंधुजळ ॥ अमृत तेंचि जाहालें हालाहल ॥ तेथें संहारिलें दैत्यकुळ ॥ अमृत भागास्तव ॥८०॥
तैसा तुम्हीं राखिला शिवाचा भाग ॥ आतां कवण करील रे याग ॥ भलता पुढें पडेल जो प्रसंग ॥ मग तैसा देखों ॥८१॥
परी शिवाचा भाग तो अतिक्रूर ॥ येणें दक्षा तुझें जाईल रे शिर ॥ पूर्णाहुति करूनि अध्वर ॥ सुखिया करूं आम्ही ॥८२॥
कवण याग करील पृथ्वी वरी ॥ ऐसा कवण शंकरचा वैरी ॥ रुदाचा भाग देईल तरी ॥ सुखेंचि कां न करी ॥८३॥
तुवां निंदिला त्रैलोक्य स्वामी ॥ द्क्षा तुझें शिर पडेल रे होमीं ॥ सहस्त्र वरुषें होसील भूमीं ॥ प्रेतरूप तूं ॥८४॥
ऐसा अनुवादला नंदिकेश्वर ॥ तंव क्रोधा चढला तपेश्वर ॥ जो दक्षाचा प्रतिबंधुवर ॥ भृगुनामें ॥८५॥
भुगु म्हणे नंदी तृणचरा ॥ केवीं शाप देसी दक्षेश्वरा ॥ तुम्हांसी अल्प करीन वसुंधरा ॥ पळतां मज भेणें ॥८६॥
या पिसाटियाची ऐसीचि जाती ॥ गृहस्था तें देखों न शकती ॥ कैसा याग वर्जिला रे क्षितीं ॥ ऐसे कवण तुम्ही ॥८७॥
क्रोधें अधर रगडो नियां दांतीं ॥ तेणें ओष्ठरोमाग्र पिळोनि हस्तीं ॥ मग बोलता जाहाला नंदी प्रती ॥ शापदान तो ॥८८॥
दक्षा ऐसा शापिला महादानी ॥ तूंही पृष्ठीं भार वाहसी मेदिनीं ॥ तृण भक्षीं मागुतां वमूनी ॥ पशुवा तूं ॥८९॥
ऐसा त्या भृगूचे शापशब्दीं ॥ क्रोधा यमान जाहाला नंदी ॥ तंव उठावले गण शैलादी ॥ आणि भृंगी रिटी ॥९०॥
तंव शैलादि म्हणे रे भृगुवा ॥ तुम्ही गृहस्थ कैसे आलोति दैवा ॥ कृपण पिसाट म्हणतां महा देवा ॥ दंत अधर छेदीन ॥९१॥
तुझें आरुष नाम भृगु ॥ तरी ओष्ठ मार्गें करीन भंगु ॥ तृप्त करीन महा यागु ॥ द्क्षरुधिरें करूनी ॥९२॥
तों पूर्णाहुती जाहाला अध्वर ॥ मग बोलिले सर्व सुर ॥ होतील दोन सहस्त्र कुमर ॥ दक्षरा जासी पैं ॥९३॥
या पुत्रांचें जें सुख कारण ॥ तें दक्षा तूं नव्हसी गा पावन ॥ तरी दोन सहस्त्र पुत्ररत्न ॥ द्क्षा तुज अप्राप्त ॥९४॥
नाहीं संतोष विला वृष भध्वज ॥ जज्ञ भाग रक्षिला सहज ॥ तरी दक्षा पुत्र सुख तुज ॥ अप्राप्त जाण ॥९५॥
कन्या होती गा तुझ्या घरीं ॥ पुत्र न देखसी मंदिरीं ॥ मग मौनेंचि उठिले त्रिपुरारी ॥ जाहाले नंदी आरूढ ॥९६॥
शिव गणेंसीं त्रिपुर हंतु ॥ निघता जाहाला उमा कांतु ॥ विसर्जन जाहाली अकस्मातु अकस्मातु ॥ सभा सकळ देवांची ॥९७॥
ऐसें तेथें जाहालें जी शापदान ॥ परी दधीचि ऋषी मंत्र प्रवीण ॥ तेणें सिद्धी नेलें यज्ञ कारण ॥ बहुतां स्थळीं ॥९८॥
तेणें संपूर्ण केला जो अध्वर ॥ दक्षासी जाहाले दोन सह्स्त्र कुमर ॥ ते दधीचि ऋषीचे मंत्राकार ॥ मंत्र पिंड ते ॥९९॥
दक्ष गृहीं झाला वाद्यध्वनी ॥ थोर उत्साह जाहाल अंतःकरणीं ॥ दोन सहस्त्र पुत्र देखोनि ॥ आनंदल लक्ष ॥१००॥
तंव त्या बृहस्प्तपुर पट्टणीं ॥ दक्ष भेटीसी आले नारद मुनी ॥ तों दक्षें पूजिलें सन्मा नोनी ॥ बंधु वर्ग पणें ॥१०१॥
पुत्र आणिले नारदा पासीं ॥ दक्ष आनंदला निर्भय मानसीं ॥ मग प्रति वचन नार दासी ॥ वदता जाहाला ॥१०२॥
दक्ष म्हणे तूं ब्रह्मा चारी पुरुष ॥ पुत्रांसी दीजे मंत्रो पदेश ॥ जेणें प्राप्त होय आयास ॥ राज्याधि काराचा ॥१०३॥
मग नारद मंत्र सांगे त्यांसी ॥ एकचि उपदेश समस्तांसी ॥ मंत्र विधि सांगोनि वेगेंसीं ॥ क्रमिलें नारदें ॥१०४॥
मग ते क्षिप्रागं चिया तीरा ॥ दक्षु पुत्र गेले मंत्रोच्चारा ॥ अनुष्ठान साधितां एकसरा ॥ जाहाले ते संचार चलित ॥१०५॥
मग त्यांहीं सेविलें ब्रह्मारण्य़ ॥ गृहीं यावयाचें नाहीं ज्ञान ॥ ते सर्वही झाले चित्तीं निंरजन ॥ गेले गिरि कूटीं ॥१०६॥
गृहस्था श्रमाची जे पद्धती ॥ ते दक्ष पुत्र न अंगी कारिती ॥ समस्तही योग पंथें गेलेती ॥ नारद उपद उपदेशें ॥१०७॥
तेणें दक्ष दुःखित जाहाला मनीं ॥ म्हणे शापिलें शिवाच्या गणीं ॥ जे पुत्र अप्राप्त होती भवनीं ॥ दक्ष राजाच्या ॥१०८॥
परी हें झालें नार दाचें कारण ॥ ते शाप शब्द न करीचि भंजन ॥ वृथाचि परा भविले यज्ञ ॥ पुत्रेष्टीचे ॥१०९॥
आतां पुत्रें विर हित शरीर ॥ सर्व ही जीवित्व असार ॥ राज्य लक्ष्मी दान गृही मंदिर ॥ वृथाचि हें सर्वही ॥११०॥
तरी तो पुत्रें विरहित कैसा राजनर ॥ जैसा कृष्ण पक्षींचा शीतकर ॥ अमावा स्यादिनींचा अंकुर ॥ असे चिना कोठें ॥१११॥
तैसा माझा जाहाला संसार निष्फळ ॥ समस्त पुत्रीं सेविले कुला चळ ॥ राज्याधिकारी क्षिति मंडळ ॥ रक्षिता नाहींच ॥११२॥
ऐसे शत एक संवत्सर ॥ तंव आला नारद मुनीश्वर ॥ मग त्यासी वदला शाप उत्तर ॥ प्रजापति तो ॥११३॥
म्हणे गा नारद मुनि बंधू ॥ बरवा उपदे शिला ज्ञानबोधू ॥ सर्वही केले मंत्र साधू ॥ कपटिया मुनी ॥११४॥
आतां घेइजे माझें शापदान ॥ जैसें पुत्रांसी उपदेशिल ज्ञान ॥ तैसें तूंही करिसी भ्रमण ॥ त्रैलोक्यमंडळीं ॥११५॥
तंव नारद म्हणे गा प्रजापती ॥ आतां एक स्मरतें माझें चित्तीं ॥ तुझिया संसाराची व्हावया शांती ॥ तो काळ आतां जवळी असे ॥११६॥
तरी माझें घेईं शापदान ॥ तूं जन्मसी होऊनि पाषाण ॥ जडत्व दाटेल रे संपूर्ण ॥ शिव निंदका तूं ॥११७॥
मग नारदें क्रमिलें तेथुनी ॥ द्क्ष चिंतातुर जाहाला मनीं ॥ म्हणे मज ऐसा महादानी ॥ अल्पया त्रिलोकीं ॥११८॥
अठ्ठयायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ सर्व देव गणगंधर्व सुर ॥ मी जेव्हां आरंभितों अध्वर ॥ तेव्हां तृप्त समस्त ॥११९॥
जेथें पाचारितों या शूळियासी ॥ तेव्हां त्या यज्ञीं होतसे विवशी ॥ अवघे मिळताती भक्षा वयासी ॥ क्षीर सर्पि मृगमास ॥१२०॥
अवदानांचा करिती क्षय ॥ आम्हांसी न देती पुत्रार्थ जय ॥ पाहोनि यज्ञकार्याचा समय ॥ धांवताती अक्षते विण ॥१२१॥
माझे यागीं भक्षा वया अवदान ॥ शिव तो येतसे तो येतसे भूतें घेऊन ॥ आपण राहातसे कपट धरून ॥ पंच मुखी जटिया ॥१२२॥
आपण होतसे पंच मुखी ॥ सांगातें आणितो तैशा सारिखीं ॥ कंठीं बांधोनियां सहस्त्र मुखी ॥ सर्प तोही पाहें पां ॥१२३॥
ऐसा दक्षराजा चिंतातुर झाला ॥ नारद शाप देऊनि गेला ॥ मग प्रजापित विचारिता झाला ॥ कांहीं एक पैं ॥१२४॥
ऐसे सहस्त्र एक संवत्सर ॥ द्क्ष जाहाला होता चिंतातुर ॥ मग करिता जाहाला विचार ॥ कांहीं एक गायाचा ॥१२५॥
तेणें पुनरपि योजिला अध्वरू ॥ पाचारिला दधीचि पूर्णगुरु ॥ नाना सुगंधीं पूजिला ऋषीश्वरु ॥ प्रजापतीनें ॥१२६॥
दक्ष राजा म्हणे जी कृपानिधी ॥ दधीचि स्वामिया सर्वज्ञ सिद्धी ॥ ऐसा आरं भिजे यागविधी ॥ अक्षयगती ॥१२७॥
तंव दधीचि म्हणे दक्षराजा ॥ आणिक याग करीं बरविया वोजा ॥ जे प्राप्त तुम्हासी पुत्रप्रजा ॥ ऐसा विधि कीजे ॥१२८॥
आपणां कायसी पुत्र कामना ॥ वहिलें करूं मागुती हवना ॥ द्रव्य समर्पूनि हुताशना ॥ होईल सिद्धि ॥१२९॥
मग दक्ष बोलिला तये वेळीं ॥ अवघे पाचारूं यज्ञ काळीं ॥ परी न बोला विंजे हा शूळी ॥ पिसाटासी ॥१३०॥
ऋषि म्हणे तथास्तु बरवें ॥ जैसें प्रिय तुम्हांसी तैसें आरं भावें ॥ पुनरपि याग मांडिला स्वभावें ॥ पुत्रकामनेस्तव ॥१३१॥
अक्षता पाठ विल्या सर्वांसी ॥ सुर पन्नग इंद्रा दिकांसी ॥ यक्ष राक्षस गणगंध र्वांसी॥ पाठ विलें मूळ ॥१३२॥
बरवी केली याग आहुती ॥ यज्ञ मंडप घातले बहु युक्तीं ॥ शत योजनें रुंदली क्षिती ॥ त्या नैमिषारण्यीं ॥१३३॥
आणिले महा समिधांचे भार ॥ पाचारिले यज्ञ सिधि ऋषीश्वर ॥ विरिंचि नाथादि देव आणि सृष्टिकर ॥ आले दक्षयागासी ॥१३४॥
सर्वही पाचारावे महायज्ञीं ॥ एक व बोल वावा पंचाननी ॥ समस्त कन्यां मध्यें दाक्षा यणी ॥ मृतवत झाली आम्हांतें ॥१३५॥
दक्षें पाचारिले आपुले बंधू ॥ वेगें आले महायज्ञ साधूं ॥ पिता पाचारिला विधू ॥ सत्यलो काधिपति ॥१३६॥
विरिंचि म्हणे दक्षदूतांसी ॥ आम्ही सर्वथा येऊ ना यागासी ॥ शिव नाहीं तेथें महा विवसी ॥ उद्भवेल सत्य ॥१३७॥
जेथें शिवासी नाहीं भाग दान ॥ तें निष्फळ गा यज्ञ करण ॥ रुद्राविरहित भाग कोण ॥ भक्षील तेथें ॥१३८॥
मूळ पाठ विलें क्षीर सागरा ॥ शेष शयना शार्ङ्गधरा ॥ वेगें यावें जी बृहस्पति पुरी ॥ दक्ष यागासी ॥१३९॥
दक्ष दूतांसी म्हणे शार्ङ्गधर ॥ वृथाचि कां आरंभिला अध्वर ॥ जेथें नाहींत उमा-शंकर ॥ निष्फळ तो याग ॥१४०॥
ऐसे जे त्रिदेवांरहित ॥ दक्षें पाचारिले जी समस्त ॥ अगस्तीसी वदे शिवसुत ॥ षडानन तो ॥१४१॥
ऐसा दक्षें आरंभिला यज्ञ ॥ शंकरासी धरिला अभिमान ॥ तें सिद्धी कैसें पावे अवदान ॥ दक्ष राजाचें ॥१४२॥
जेथें नाहीं ब्रह्मा हरि हर ॥ येर जामात आले बंधु सत्वर ॥ ते कवण कवण सविस्तर ॥ निरोपूं श्रोतयांसी ॥१४३॥
श्रोतीं एकाग्र करावें मन ॥ शिव कथेसी अर्पिजे श्रवण ॥ तरी महादोषांसी होय दहन ॥ म्हणे शिव दास गोमा ॥१४४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दक्ष चरिते सप्तषष्टितमाध्यायः ॥६७॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP