मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ५३ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ५३ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ५३ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशा नमः ॥ शिववीरांपुढीं यमसैन्यें ॥ जैसीं तीं यागमुखीं अवदानें ॥ पतिव्रतेपुढें लावण्यें ॥ काय कीजे अप्सरांचीं ॥१॥तरी श्रोता कोपला मजप्रती ॥ म्हणे अन्य वेळ नव्ह्ता द्दष्टांतीं ॥ युद्धसमयीं द्दष्टांतयुक्ती ॥ बोलों नयेचि सर्वथा ॥२॥तरी यमवीरांची सेना स्त्रिया ॥ ते शिववीरां आली पर्णावया ॥ म्हणोनि हा द्दष्टांत द्यावया ॥ कारण जाहालें श्रोतयां ॥३॥चौदा कोटींशीं सूर्यसुत ॥ बहु अभिमानें आला कृतांत ॥ तंव दूतीं जाणविली मात ॥ शिववीरांसी ॥४॥तंव त्या शिववीरांचे दळीं ॥ नाद गर्जिन्नला व्योममंडळीं ॥ त्या ध्वनी श्रुत जाहालिया तत्काळीं ॥ पराभविल्या व्याधी ॥५॥सनया गर्जती सानभेरी ॥ मृदंन काहळा रणमोहरीं ॥ तंव यमाचें सैन्य झडकरी ॥ उठावले तत्काळ ॥६॥यमदूत कवण कैसे ॥ एक व्याघ्रमुख जैसे ॥ सिंह-उष्ट्र्वदनी दिसती तैसे ॥ एक ते जंबुकवदनी ॥७॥ऐसे त्वरें पावती शिवसेंन्यावरी ॥ म्हणती अटक रे यमपुरी ॥ कैसा घेऊनि जाल दुराचारी ॥ शिवगण हो पाहूं आतां ॥८॥मग आज्ञा केली शिववीरीं ॥ म्हणती विध्वंसा रे हे यमपुरी ॥ वन्हि चेतवा चौफेरी ॥ दग्धा रे यमगृह ॥९॥आवेशें धांविन्नला शैलादिगण ॥ जैस अकस्मात जंबुकावरी पंचानन ॥ कीर्तिवीर महादारुण ॥ महाबाहु तो ॥१०॥शंखस्फुरण मस्तकीं विभूती ॥ पुढें देखतांचि यमदूत पळती ॥ हाणोनि चूर्ण केली जी निर्घातीं ॥ शिववीरीं सेना यमाची ॥११॥ऐसे यमाचे मोडिले भार ॥ अद्भुत शिवगण अनिवार ॥ हातीं पडे तेंचि हत्यार ॥ त्यजिती यमावरी ॥१२॥मारीत आला शैलादिगण ॥ कीं प्रलयींचा वृष्टिघन ॥ तें पाहूनि सूर्याचा नंदन ॥ उठावला यमरावो ॥१३॥एक तो पंचाननाचा सुत ॥ एक सूर्यपुत्र विख्यात ॥ प्रौढ वीर महाद्भुत ॥ यमराज युद्धीं ॥१४॥मिरवे कुलाचलाऐसा ॥ उग्रवाहन भयंकर म्हैसा ॥ पताका मीनलिया आकाशा ॥ लहरी कृष्णवर्ण ॥१५॥दोघे प्रवर्तले अद्भुत संग्राममारा ॥ बाणीं लोपिलें दिनकरा ॥ मग कोप न सांवरेचि शिववीरां ॥ दग्धिली पुरी यमाची ॥१६॥मग ह्रदयीं विंधिला सूर्याचा नंदन ॥ तेणें विकळ झाला यमाचा प्राण ॥ मग विध्वंसिती शैलादिप्रभृति गण ॥ कृतांतासी तेथें ॥१७॥यम पडिला मूर्च्छित भूमीं ॥ शिववीरांसीं अशक्त संग्रामीं ॥ जे महाविक्राळ होते पराक्रमी ॥ ते विमुख केले ॥१८॥ मग धांविन्नला मनुमूर्ती ॥ कृतांत बांधिला मागुते हस्तीं ॥ मग तो आणिला रौरव्पती ॥ वीरभद्राजवळिकें ॥१९॥मग लंबोदर आज्ञा करी ॥ म्हणे विध्वंसा रे यमपुरी ॥ तंव ते उठावले कोटी चारी ॥ गण शिवाचे ॥२०॥त्यांही फोडिल्या बंदिशाळा ॥ महादुर्गांचिया सघनशृंखला ॥ कल्पान्त केला जी काळवेळा ॥ थोर मांडला प्रलयान्त ॥२१॥द्वादश सहस्त्र जे कुंभीपाक ॥ त्यांमध्ये होते दोषिक ॥ मग ते सोडूनिया पावक ॥ चेतविला नगरीं ॥२२॥चरणें हाणिती दुर्गाचे हुडे ॥ फोडिती जैसे गिरीचे कडे ॥ ते शिवगण महा बळियाढे ॥ येते झाले यममंदिरीं ॥२३॥तोडिले कुंभीपाक सहस्त्रवरी ॥ अग्नि लाविला यममंदिरीं ॥ एकवीस खणांचे दामोदरीं ॥ केला महाप्रळयो ॥२४॥द्वादश लक्ष यमभुवन ॥ अवधें जाळूनि रक्षा केली घन ॥ मग तो मधुरशया ब्राह्मण ॥ वंदिला शिवगणीं सकळीं ॥२५॥विभूति देखिली तयाचे भाळीं ॥ वंदिते झाले मग ते चरणकमळीं ॥ तेथींची धूळी धूसर मौळीं ॥ घेतली समस्तीं ॥२६॥मग तो मधुरशया ब्राह्मण ॥ वीरभद्रपाशीं आले घेऊन ॥ ह्रदयीं आलिंगीतसे गजानन ॥ त्या मधुरशया ब्राह्मणासी ॥२७॥स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसी विध्वंसिली यमाची धामिनी ॥ शतवेळां चेतविला वन्ही ॥ तया यमाचे नगरीं ॥२८॥कल्पान्त करिती सूर्यनंदना ॥ कृपा न उद्भवे शिवगणां ॥ त्यांहीं यम घातलासे चरणां ॥ नेणों किती ॥ वेळां ॥२९॥आतां असो हा युद्धाचा संबंध ॥ बहुत वेळ केला यमासी खेद ॥ तो मागील प्रसंगीं अनुवाद ॥ केला एक वेळां ॥३०॥मग वीरभद्र गजानन ॥ निघाले दोषियासी घेऊन ॥ यमपुरीसी स्थापिला सूर्यनंदन ॥ ऐसें नेणों किती वेळां ॥३१॥मग शिवगणीं गोत्रहत्यारा ॥ तो आणिला जी कैलासपुरा ॥ जैसी पूर्वभाग्यें त्या पाथरा ॥ प्राप्त होय लोहदशा ॥३२॥मग परिसचा होतांचि संबंध ॥ लोह होतसे सुवर्ण शुद्ध ॥ तैसे कृमी जंतू जे अबोध ॥ ते शुद्ध करी विभूती हे ॥३३॥मग शंकरें त्या दोषिया-श्वानांसी ॥ पुनरपि जन्म दिधला दोघांसी ॥ वोलागरनगरीं केला निवासी ॥ दक्षिणदेशीं पैं ॥३४॥श्वान तों केला तेथींचा राजा ॥ दोषिया केला तेथींची प्रजा ॥ ते नित्य पूजिती वृषभध्वजा ॥ विभूतिमंत्रसिद्धि कीजे ॥३५॥दोषिया नाम गूढब्राह्मण ॥ प्रतापरुद्र तो राजा श्वान ॥ दोघांसी प्रवर्तला सत्त्वगुण ॥ परी नाहीं जातिमत्सर ॥३६॥तंव आश्वर्य वर्तलें कैलासीं ॥ अप्सरा आलिया शिवसभेसी ॥ त्यांहीं नृत्य करूनि शिवासी ॥ उल्हास केला पैं ॥३७॥दिव्यांगनीं वाखाणिला शंकर ॥ तूं शरणागतवज्रपंजर ॥ तेथें होता नारद मुनीश्वर ॥ तेणें निषेधिल्या अप्सरा ॥३८॥नारद म्हणे दिव्यांगनांसी ॥ तुम्हीं कां वाखाणिलें शिवासी ॥ हा वज्रपंजर शरणागतासी ॥ ऐसें केवीं घडे पैं ॥३९॥तरी या शंकराचा पवाडा ॥ तोचि आतां श्रुत करूं तुम्हांपुढां ॥ हा शरणागतांविषयीं गाढा ॥ तो ऐका तुम्ही ॥४०॥तरी मृत्युमंडळीं सर्व क्षिती ॥ चैनमुनामें राजा चक्रवर्ती ॥ त्यानें प्रसन्न केला पशुपती ॥ सहस्त्र वर्षें ॥४१॥जेणें सामर्थ्य असे चंद्रमौळी ॥ मागीतली ते भस्मधूळी ॥ तेणें दुर्बळ जाहाला चक्षुभाळी ॥ सहस्त्र वरुषें ॥४२॥मग ते भस्मराशि मंदाकिनी ॥ राजयानें आणिली मृत्युभुवनीं ॥ मग त्या यमासी स्पर्श मेदिनीं ॥ नाहीं त्या राज्यीं ॥४३॥जैसा तो सचेतन असतां गृहाधीश ॥ मग त्या गृहा नव्हे कुटिलांचा स्पर्श ॥ कीं जागृत असतां मृगेश ॥ जंबुका भक्ष अप्राप्त ॥४४॥तैसी विभूती आणिली राजयांनीं ॥ ते प्रसवती जाहाली चतुर्विध खाणी ॥ चतुर्थ हे मोक्षदायिनी ॥ त्या राजगृहीं ॥४५॥जो जंतु मृत्यु पावे क्षितितळीं ॥ राजा विभूति चर्ची तयाचे भाळीं ॥ मग त्यासी नेतां कृतांत बळी ॥ तो अशक्त होय ॥४६॥तो जंतु सचेत होय मागुता ॥ मृत्यूची नेणे गंधवार्ता ॥ सर्वही अगम्य जाहाले कृतांता ॥ पृथ्वीचे जीव जे कां ॥४७॥विभूति प्रसवे सर्व भांडार ॥ षड्रसादि अलंकार ॥ ऐसा तो सर्व सृष्टीचा व्यापार ॥ चालवीतसे विभूतीनें ॥४८॥मग भस्मेंविण पंचानन ॥ जैसा महादरिद्री कृपण ॥ तैसा औदार्यविषयीं त्रिनयन ॥ अशक्त जाहाला ॥४९॥मग नारद म्हणे दिव्यांगनांप्रती ॥ ऐसा तो चैनमुनामें चक्रवर्ती ॥ सहस्त्र वरुषें अवघीं क्षिती ॥ राखिली विभूतिबळें ॥५०॥मग त्या चैनमुनामें राजयाचा भृत्य ॥ नैगमुनामें तप करीत ॥ त्यासी प्रसन्न होऊनि उमाकांत ॥ नेला कैलासीं ॥५१॥तें श्रुत जाहालें राजयाप्रती ॥ मग धैर्य न धरवें चित्तीं ॥ म्हणे माझिया भृत्यासी पशुपती ॥ घेऊनि गेला केवीं पां ॥५२॥मग पाचारिले मंत्री सुमती ॥ विचार स्थापिला युद्धाप्रति ॥ म्हणे पालाणा रे अश्वजाती ॥ जे जे मनोवृत्तीचे ॥५३॥तंव साठ सहस्त्र वीरां ॥ त्वरित राजयानें केला हांकारा ॥ मग सुवर्णाचिया पाखरा ॥ धातल्या वारूंसी ॥५४॥अंगीं भस्मधुलिचिया संगती ॥ भस्मधुलीचीं शस्त्रें हातीं ॥ मग तो महाराजा चक्रवर्ती निघाला साठी सहस्त्रेंसी ॥५५॥चार चार पक्ष केले वारूंसी ॥ ते ऊर्ध्व उडाले आकाशीं ॥ कल्पान्त करावया देवांसी ॥ त्या प्रलयाचा शिववीरां ॥५६॥श्रीशैलपर्वतींहूनि नृपती ॥ उत्पतन पावला तो चक्रवर्ती ॥ ग्रह नक्षत्रें सोमसूर्यदीप्ती ॥ लोपती वारुपक्षीं ॥५७॥करीं रुद्राक्षांच्या माळा ॥ भाळीं भस्मत्रिपुंड्रटिळा ॥ तो पाहातांचि सकळ कळा ॥ दिपती अत्रिसुताचिया ॥५८॥ऐसे उत्पतित जाहाले महावीर ॥ त्यांहीं प्रथम वेढिलें यमपुर ॥ पराभविला सूर्यकुमर ॥ जिंकिला सूर्यलोक ॥५९॥मग वेढिली अमरपुरी ॥ नेणतां घेतली देवपुरी ॥ व्यथाभूत केला वज्रधारी ॥ तें असो आतां ॥६०॥मग अग्निपुरा केला आकांत ॥ शक्तिमंद जाहाला तो महाहुत ॥ मग तेणें षण्नेत्रींचे सुत ॥ लंघिले कुलाचल ॥६१॥मग तो चैनमु चक्रवर्ती ॥ चंद्रलोक जिंकीत शीघ्रगतीं ॥ व्यथा पावला रोहिणीपती ॥ द्विजराज पैं ॥६२॥मग जिंकोनियां नक्षत्रमाला ॥ कल्पान्त केला भौममंडला ॥ बुध पराभवूनि अवलीला ॥ जिंकिला देवगुरु ॥६३॥मग जिंकिला एकनयन ॥ जो दैत्यगुरु भृगुनंदन ॥ त्यासी भिडूनि महादारुण ॥ आकर्षिला शनिग्रह ॥६४॥ मग सप्तऋषिमंडळ जिंकिलें जाण ॥ ध्रुवपद घेतलें ध्रुवापासून ॥ महर्लोक तपोलोक सोडवून ॥ घेतला जनोलोक ॥६५॥मग श्री घेतली सत्यलोकाची ॥ भ्रष्ट केला तो विरिंची ॥ वैकुंठ शांत करूनि हरीची ॥ घेतली बळप्रौढी ॥६६॥ऐसा तो राजा सर्व लोक जिंकोनी ॥ धाड घातली कैलासभुवनीं ॥ अप्सरांपाशीं म्हणे नारदमुनी ॥ म्यां सांगीतलें शिवासी ॥६७॥तंव धांविन्नले शिववीर ॥ चौसष्ट कोटी उन्मत्त अपार ॥ तंव चैनमु राजा नृपवर ॥ आज्ञा करी वीरांसी ॥६८॥शिवगण आले महापुरुषार्था ॥ त्यांचीं शस्त्रें जाऊं नेदी वृथा ॥ त्या शिवमंत्राची जे व्यथा ॥ तुम्हीं घेइजे आपुले अंगीं ॥६९॥तंव अस्त्रें प्रेरिलीं शिवगणीं ॥ जैशा कडकडती प्रलयसौदामिनी ॥ तीं अस्त्रें रायाचे वीरखिळणीं ॥ घेतलीं आपुले अंगीं ॥७०॥तेणें वीरांचीं सर्वांगें भेदती ॥ मग ते विभूतीनें घाय मिळती ॥ तेणें अधिकचि उद्भवे शक्ती ॥ राजवीरांसी पैं ॥७१॥राजवीर अस्त्रें घेती वक्रीं ॥ तीं जीर्ण करिती विभूतीमंत्रीं ॥ अवघे शिववीर निःशस्त्री ॥ केले राजवीरीं ॥७२॥नारद म्हणे अप्सरांसी ॥ मग मी सांगूं गेलें शिवापासीं ॥ तंव शंकर पाहे विभूतीसी ॥ मग न देखे भस्मराशी ॥७३॥मग शक्ति सांदूनियां कांपत ॥ म्हणे द्या गा तयासी शरणागत ॥ राजवीरांसी उभारोनि हस्त ॥ मागा रे जीवदान ॥७४॥मग नारदमुनि धांवत आला ॥ तेणें तो चैनमु राजा प्रार्थिला ॥ म्हणे दळभार स्थिर करीं गा आपुला ॥ घेईं भृत्य तुझा ॥७५॥सर्व गणेंसीं उमाकांत ॥ तुझा जाहालासे शरणागत ॥ मग तो राजा सर्व वीरांसहित ॥ प्रवेशला शिवभुवनीं ॥७६॥ऐसा नम्र जाहाला पंचानन ॥ दिधला राजयाचा भृत्य जाण ॥ अप्सरांसी म्हणे ब्रह्मनंदन ॥ तुम्ही केवीं वर्णितां त्या शिवासी ॥७७॥मग त्या शिवगणीं सकळीं ॥ उपचार मांडिला तया स्थळीं ॥ तरी तो अद्यापि महीमंडळीं ॥ नाहीं आला राजा ॥७८॥ऐसें भविष्य असे पुराणीं ॥ तो राजा येईल मृत्युभुवनीं ॥ त्या दक्षिणदेशीं पुण्यस्थानीं ॥ श्रीशैलपर्वतीं वसे ॥७९॥अप्सरांसी म्हणे नारदमुनी ॥ एक शिवभक्त मृत्युभुवनीं ॥ तो शरणागतरक्षक म्हणोनी ॥ सांगितला शिवप्रताप ॥८०॥तो पूर्वनामें मधुरशया ब्राह्मण ॥ तो शंकरें केला असे अग्रगण ॥ त्यासी नाम ठेविलें गूढब्राह्मण ॥ शिवें जन्म दिधला त्यासी ॥८१॥समीप वोलागरनाम नगरी ॥ तेथें त्याची असे गोचरपुरी ॥ तंव नारदमुनीसी त्रिपुरारी ॥ विज्ञापिता जाहाला ॥८२॥मग शिव म्हणे गा मुनीश्वरा ॥ आपण चला जाऊं त्या गोचरपुरा ॥ सत्त्वसामर्थ्य पाहूं त्या भक्तवरा ॥ गू्ढब्राह्मणाचें ॥८३॥मग विरिंचि हरि पंचानन ॥ सवें नारदमुनि ब्रह्मनंदन ॥ मग जंबूद्वीपीं त्रिनयन ॥ आला दक्षिणदेशीं ॥८४॥मग तो श्वान पूर्वजन्मींचा ॥ तो शिवें अधीश केला वोलागरपट्टणींचा ॥ पाहा हो तपतरणिउदय तयाचा ॥ जे देव आले त्यापाशीं ॥८५॥मग वोलागरपट्टणप्रदेशीं ॥ शंभु स्थिरावला त्रिमूर्तींसीं ॥ नगरांत पाठविलें नारदासी ॥ पाहावया रिगावा ॥८६॥नगर सर्व पाहिलें नारदें जाऊनी ॥ परीक्षा केली राजभुवनीं ॥ ऐसें नगरच्छिद्र पाहूनि नयनीं ॥ आला शंभूपाशीं ॥८७॥मग रात्रीच्या प्रथम प्रहरीं ॥ आपण देव तो जाहाल खाणोरी ॥ मग संचरला राजमंदिरीं ॥ होऊनि तस्कर ॥८८॥फोडिली हिरण्याची मांदुस ॥ काढिले अवघे मुक्तांचे घोंस ॥ पाटाऊ कनकदंड बहुवस ॥ काढिले रत्नमणी ॥८९॥मग आले महाद्वाराप्रती ॥ सोडिला राजाचा भद्रजाती ॥ तेथें रक्षक निद्रित होती ॥ त्यांसी काय केलें ॥९०॥एकमेकांच्या मौळींचे भारमुष्टी ॥ तस्करीं ग्रंथि पाडिल्या नेटीं ॥ दाढिया बांधोनि मुखवटीं ॥ घातल्या गांठी ॥९१॥मग तोडिल्या दुर्गींच्या घनश्रृंखला ॥ दीर्घ बोहरी केली लोकपाळां ॥ मग ते खाणोरी वोलानगरस्थळा ॥ बाहेर निघाले ॥९२॥मार्गीं सांडिती रत्नें दिव्यांबरें ॥ पाठोपाठीं येती धांवणेंकरें ॥ खाणोरी पळाले एकसरें ॥ गोचरासी पैं ॥९३॥पावले गूढब्राह्मणाचे घरीं ॥ मातंग बांधिला तयाचे द्वारीं ॥ मग तयासी म्हणती ते खाणोरी ॥ आम्हीं शरणागत तुझे ॥९४॥तरी ते दोघे बंधु शिवभक्त ॥ त्यांहीं राखिले शरणागत ॥ तंव धांवणेंकरी धांवत ॥ आले गोचरासी ॥९५॥त्यांहीं द्वारीं देखिला भद्रजाती । सोडूनि नेला राजद्वाराप्रती ॥ मग पाचारिता जाहाला नृपती ॥ त्या शिवभक्तांसी ॥९६॥राजा म्हणे गूढब्राह्मणा ॥ तुम्ही नित्य पूजितां त्रिनयना ॥ तुमची ऐसी हे वासना ॥ करितां हा उदीम ॥९७॥आतां कोठें ते द्यावे खाणोरी ॥ हस्ती बांधिला तुमचे द्वारीं ॥ तंव बोलता जाहाला प्रत्युत्तरीं ॥ प्रतापरुद्रासी ॥९८॥आमुचे द्वारीं देखिला कुंजर ॥ तरी कवण असेल गा चोर ॥ आम्हींचि केला हा कुटिलाचार ॥ नाम सांगो कोणाचें ॥९९॥तंव नगरलोक आले बहुत ॥ ते राजासी कथिती वृत्तांत ॥ जी कालच्या रात्रीं नेली वस्त ॥ तेचि हे खाणोरी ॥१००॥ मग राजा आज्ञा करी तत्काळीं ॥ यांसी शूळ प्राप्त करा रे येचि वेळीं ॥ पाहा हो विभूति लाविताती भाळीं ॥ महाकुटिल हे ॥१०१॥मग त्या रुद्राक्षवृक्षाचे दोन शूळ ॥ दोघां बंधूंसी केले तत्काळ ॥ मग राजभृत्य लोकपाळ ॥ ताडिताती तयांतें ॥१०२॥देव पळाले होते जे खाणोरी ॥ ते रूप पालटोनि आले बाहेरी ॥ मग ते वदते जाहाले प्रत्युत्तरीं ॥ त्या शिवभक्तांसी ॥१०३॥कुटिलांसी राखोनि आपुले घरीं ॥ तुम्ही कां पडतां शूळावरी ॥ ऐसे ते तुम्हां खाणोरी ॥ उपयोगा काय येती ॥१०४॥मग ते सांगती गुप्तरूपियांसी ॥ एवढा वेव्हार काय गा तुम्हांसी ॥ तुम्हीं उगेंचि असावें वैखरीसीं ॥ न बोलावें प्रत्युत्तरीं ॥१०५॥ते आणिले शूळाजवळी ॥ त्यांहीं शिवपूजा केली तत्काळीं ॥ मग शूळाचा नैवेद्य ते काळीं ॥ समर्पिला शिवासी ॥१०६॥त्यांची देखोनियां आचारनीत ॥ मग नगरलोक झाले कृपावंत ॥ म्हणती कोण चोर आणि कोणा प्राप्त ॥ होताती शूळ ॥१०७॥ऐसें विचारिलें लोकीं श्रीमंतीं ॥ मग त्या प्रतापवंतासी विज्ञापिती ॥ जी जी शिवभक्तांची पूर्वस्थिती ॥ ती तुम्हां व्यक्त असावी ॥१०८॥न कळे पां काय कैसें चरित्र ॥ न कळे त्या विश्वंभराचें सूत्र ॥ गूढब्राह्मण पवित्र ॥ विभूतिस्थायी तो ॥१०९॥तंव राजा म्हणे श्रीमंतांसी ॥ त्यांची कृपा उपजली तुम्हांसी ॥ तरी जावें गा वेगें अप्राप्त त्यांसी ॥ करावा शूळ ॥११०॥तंव धांविन्नले श्रीमंत जन ॥ त्यांहीं वारिले ते शिवाचे गण ॥ म्हणती अढळ रे राजवचन ॥ तुम्हां अप्राप्त केला शूळ ॥१११॥मग ते गूढब्राह्मण दोघे बंधु ॥ बोलते झाले तेव्हां शब्दु ॥ शूळासी समर्पिला नैवेद्यु ॥ आम्हांसी केवीं अप्राप्त ॥११२॥शूळ भक्षिला रे चंद्रमौळीं ॥ आम्हीं कैसें वांचावें शूळीं ॥ विभूति साक्ष आहे या आमुचें भाळीं ॥ हा शिवाचा भस्मराशि ॥११३॥अरे स्वामीसी घालोनि रणीं ॥ भृत्य पळे आपुला जीव घेऊनी ॥ मग त्यासी रौरवादि योनी ॥ भोगवी कृतांत ॥११४॥ऐसा शूळ भक्षविला शंकरा ॥ आम्हीं कैसें वांचावें शरीरा ॥ नित्य नित्य स्मरतां शंकरा ॥ पाविजे स्वर्गपद ॥११५॥मग तो महाशूळ मुखाननीं ॥ प्राशन केला शिवभक्तजनीं ॥ तंव तो बेलवृक्ष तत्क्षणीं ॥ झाला त्या शूळाचा ॥११६॥तंव देव गुप्तचारी ॥ धांवत गेले त्या गणांच्या घरीं ॥ दोघांच्या पाचारूनि सुंदरी ॥ सांगीतलें त्यांसी ॥११७॥दोघां बंधूंचिया दोघी सुंदरी ॥ त्यांहीं खेद केला आपुले शरीरीं ॥ हेमपरियेळीं घालूनियां परिकरीं ॥ आरंमिलिया पंचदीप्ती ॥११८॥त्या पंचदीप्ती घेऊनियां कर तळीं ॥ दोघी आलिया शूळाजवळी ॥ तंव नारद वदे जी चंद्रमौळी ॥ सांभाळीं भक्त आपुला ॥११९॥शिवासी विज्ञापी ब्रह्मकुमर ॥ हे शरणागतांचा वज्रपंजर ॥ शिवा हे भक्त पूर्वापार ॥ मधुरशया आणि श्वान तो ॥१२०॥हा प्रतापराजाधिपती ॥ हे जाणावी गाविभूतीची शक्ती ॥ मग सत्त्वासी पाहोनि पशुपती ॥ प्रसन्न झाला तयासी ॥१२१॥मग त्या गणीं आणिलें विमान ॥ संगमेश्वर झाला शंभु आपण ॥ मग ते बेलवृक्षींचे शिवगण ॥ शिवें आलिंगिले ह्रदयीं ॥१२२॥मग त्यांसी म्हणे महादानी ॥ तुम्ही भक्तराज बैसा रे विमानीं ॥ स्त्रियांसहित सायुज्य स्थानीं ॥ मज प्रिय तुम्ही ॥१२३॥तंव बोलते झाले शिवाचे गण ॥ तूं जरी झालासी प्रसन्न ॥ आमुचे भक्तीसी जाहालासी पावन ॥ तरी देइंजे इच्छावर ॥१२४॥हे श्रीमंत लोक सज्जन ॥ हा प्रतापरुद्र राजा सगुण ॥ नाना जंतु ज्ञानी सहवर्तमान ॥ नगर न्यावें कैलासासी ॥१२५॥शिव पाहे सत्याचा पसर ॥ तंव देखे तो जैसा क्षीरसागर ॥ मग उभा राहूनि त्रिशूळधर ॥ आणिलीं कोटी विमानें ॥१२६॥मग त्या गणांसी वदे शंकर ॥ तुम्हांसी सर्व लोकीं केला आदर ॥ शूळीं धालावया प्रत्यादर ॥ बहु प्रयत्न केला ॥१२७॥मग शिवासी म्हणे गूढब्राह्मण ॥ जैसा वनस्पतींमध्यें चंदन ॥ सर्वांसी लावी आपुला गुण ॥ परी तो नेघे कवणाचे ॥१२८॥जैसा तो चिंतामणींपरीस सिंधु ॥ ते अष्ट धातूंसी करी वेधु ॥ तरी तो कवणाचा संबंधु ॥ अंगीकारीच ना ॥१२९॥जैसा तो महाप्रळयींचा हुताशन ॥ जेथें पडे तेथेंचि आपुला गुण ॥ परी तो कवणाचा होऊन ॥ अंगीकारीच ना ॥१३०॥परी तूं व्यापक सर्वत्र ॥ सर्व लोक तुझें लीलायंत्र ॥ जैसें निराधारिया पद्मिनीपत्र ॥ तैसें तुझ्या आधारें ॥१३१॥तंव नगरामध्यें शिवगणें ॥ धामीं धामीं आणिलीं विमानें ॥ कीं ते मर्त्यांसी अमृतपानें ॥ वरपाडलीं पूर्वभाग्य़ें ॥१३२॥मग ते श्रीमंत लोक सर्व ज्ञाती ॥ शिवमंत्रें शिवगण लाविती विभूती ॥ मग त्या लोकांसी वंदूनि घालिती ॥ पुष्पकयानीं ॥१३३॥ऐसें तें वोलागरपट्टण पुण्यपुर ॥ आणि गूढब्राह्मणाचें गोचर ॥ कैलासा घेऊनि शंकर ॥ नेलें महाक्षेत्र तें ॥१३४॥ऐसी हे विभूतिमाहात्म्यकथा ॥ श्रोतीं परिसावी पुण्यस्वार्था ॥ फलश्रुती सांगों जन्मव्यथा ॥ नाहीं श्रोतयां जनांसी ॥१३५॥चुकला जी अनेक योनिमार्ग ॥ मग कैंचा फळश्रुतीचा भोग ॥ जन्मांतर पापा तोडी सवेग ॥ नलगेचि एक क्षण ॥१३६॥स्वामी म्हणे जी ऋषिनाथा ॥ ऐसी विभूतीची मूळ कथा ॥ श्रवणपठनें सर्वही व्यथा ॥ पराभवी तत्काळ ॥१३७॥आतां षडानन अगस्तीप्रती ॥ कवण कथा सांगेला पुढती ॥ ते परिसावी संतभक्तीं ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१३८॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे विभुतिमाहात्म्यवर्णनं नाम त्रिपंचाशत्तमाध्ययः ॥५३॥॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP