मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ४० वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४० वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ४० वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥जो योगज्ञ वेदधर्म मुनी । सांगे शिष्यालागूनी ।असा वर घेऊनी । आयू स्वसदनीं पातला ॥१॥राजा एवढा सूज्ञ असून । न मागे पुत्रावांचून ।तरी अर्थार्थी भक्त मानून । दे वरदान तदनुरूप ॥२॥जडो कोणतीही भक्ती । तरी अनुक्रमें ती ।पुढें होईल परा भक्ती । हे युक्ति भगवंताची ॥३॥पुण्य नसे ज्याचे पदरीं । तो क्षुद्र देवाची भक्ति करी ।तो पडे संसारीं । येराजारी न चुके त्याची ॥४॥ह्या गोविंदाची जरी । सकाम भक्ति घडे तरी ।अनुक्रमें हो अधिकारी । पुन: संसारीं न पडेल तो ॥५॥निराश होईल उतरोत्तर । ह्या भक्तीचा हा महिमा थोर ।असो हें तो नृपवर । स्वभार्येसी भेटला ॥६॥नृपति म्हणे प्रियेसी । म्यां सेविलें दत्तासी ।वर दिधला आह्मांसी । आतां लाधसी पुत्र तूं ॥७॥पुत्रमुख आतां पाहून । आम्ही जाऊं तरून ।असें भार्येसी सांगून । फळ दे तिच्या हातांत ॥८॥प्रमुख: सर्वदेवानां सुमुख: पुण्यकारिणां ।य उन्मुख: स्वभक्तानां स दत्तोsदादिदं फलं ॥९॥दत्तप्रसाद झाला आतां । नको पुत्राची चिंता ।हें फळ भक्षण करितां । तूं सुता लाधसी ॥१०॥आतां विस्तारेल कुल । ह्मणूनी सांगे भूपाळ ।मग राज्ञी हर्षूनी तत्काळ । तें फळ भक्षीतसे ॥११॥मग विलासें करून । पतीसीं रत होऊन ।राज्ञी करी गर्भधारण । दत्तवच्न अन्यथा नोहे ॥१२॥ती भुक्तभोग होऊनी । पहुडे आपुले शयनीं ।तंव अकस्मात स्वप्नीं । देखे नयनीं महापुरुषा ॥१३॥चार भुजा दिसती । केयूर कंकणें झळकती ।मोतियाचे हार कंठी । कर्णी शोभती कुंडलें ॥१४॥स्वभक्तैकगम्य जें । तें हास्यमुखीं विराजे ।दिशा भासे स्वतेजें । शिरीं विराजे शेषछत्र ॥१५॥सुतेज रत्नांकित । शेषाच्या फणा अनंत ।छत्रापरी शिरीं शोभत । वरहस्त पुरुष दिसे ॥१६॥तो हसोनी तिच्या हातीं । देतसे अमूल्य मोतीं ।दुग्धपूर्ण शंख हातीं । घेऊनी प्रोक्षी तिच्यावरी ॥१७॥ती तद्विलोकनेंकरून । परमानंद पावून ।आश्चर्य करी तंव तत्क्षण । अदृश्य होऊनी गेला तो ॥१८॥असें ती स्वप्नीं पाहून । तात्काळ जागृत होऊन ।पुन: पुन: तें आठवून । होऊनी दीन बोलतसे ॥१९॥हें प्राय: भगवद्रूप कीं । स्वप्नीं जें मी विलोकी ।तें पाहतां एकाएकीं । गुप्त झालें कां कळेना ॥२०॥माझें पाप प्रचंड । ह्मणोनी देव झाला आड ।सोडुनी विषयाची चाड । मन आवड ठेवी ज्याची ॥२१॥यो याद:पतिशायी । तो कीं स्वप्नीं येयी ।दर्शनें प्रीति देयी । किमर्थ होयी गुप्त तो ॥२२॥तन्मय ती होऊनी । इंदुमती राजपत्नी ।स्वर्भानुची नंदिनी । खेद मनीं करी असा ॥२३॥सर्वत्र ती अवलोकूनी । न दिसतां तें रूप नयनीं ।तेंची पुन: पुन: मनीं । आणुनी हृष्ट होतसे ॥२४॥हा वासुदेवाचा प्रसाद । म्हणोनी मानी आनंद ।ती आयुराजाला विशद । सांगे गोविंद देखिला ते ॥२५॥मी सुप्तोत्थित होतां । न दिसे तें रूप आतां ।असें पत्नीचें वाक्य ऐकतां । राजा आनंद पावला ॥२६॥वदे नरपती तियेसी । आतां सोडी निद्रेसी ।तरीच स्वप्नफला लाधसी । निजला फससी निश्चित ॥२७॥अनुकंपा करूनी । काय सुचविलें देवें स्वप्नीं ।हें प्रात:काळीं मुनीपासुनी । तें कळून येईल ॥२८॥स्वप्न चमत्कारिक जाणून । त्वां न करावें शयन ।असें राजाचें वचन । राणी मानून न निजे ती ॥२९॥तें ध्यान धरून । राहे राणी तंव अरुण ।उदित झाला तो पाहून । दंपती उठोन स्नान करिती ॥३०॥प्रात:कालीं कर्म करून । मंगलद्रव्य स्पर्शून ।शौनका पाचारून । राजा वंदून प्रश्न सांगे ॥३१॥तें सुमंगल जाणून । ऋषी बोले सुहास्यवदन ।ह्मणे भूपा हें उत्तम स्वप्न । सावधान ऐक आतां ॥३२॥तूं जी कामना धरून । केलें दत्ताचें आराधन ।तें सफळ झालें जाण । वाहे आण निश्चयें ॥३३॥परम भाग्य तुझें जाण । जें केलें फळभक्षण ।त्या प्रभावेंकरून । गर्भधारण करी राणी ॥३४॥तुझा यत्न सफळ झाला । दिक्पाळांश गर्भी आला ।आतां पुत्र होईल तुला । होईल भाविक वैष्णव ॥३५॥महातेज धर्मनिपुण । सोमवंशाचें भूषण ।ख्यातीनें जसा नारायण । बळपूर्ण वेदवेत्ता ॥३६॥सज्जनपालक होईल । हुंडासुरा मारील ।चक्रवर्ती नामा पावेल । तो शोभेल सर्वगुणीं ॥३७॥अनुकंपा करून । पंगु दिनांध आर्तजन ।यांचें करील पालन । म्हणून सांगे शौनक ॥३८॥अग्नी चहूंकडून । करो गर्भाचें रक्षण ।मृत्युपाशापासूनी वरुण । करो रक्षण दहा मास ॥३९॥तो शौनक आशीर्वचन । असें देतसे हर्षून ।मग तया पूजून । करी बोळवण भूपाळ ॥४०॥जें हें स्वप्नफळ मुनी । सांगे ते देवांनीं जाणूनी ।पुष्पवृष्टी करूनी । स्वर्गीं केला उत्सव ॥४१॥सुस्वप्नं जातं म्हणूनी । देव गाती हर्षूनी ।असें होतां तेच क्षणीं । हुंडनंदिनी स्वर्गी गेली ॥४२॥पृथ्वीपते आयू जे वेळीं । तपा गेला ते वेळीं ।हुंडनामा दैत्य त्या वेळीं । भूमंडळीं उपजला ॥४३॥जो वश्य करी भूगोल । जिंकी देव सकळ ।असा तो दैत्य खळ । बळें धरीं शुककन्येतें ॥४४॥तीणें तिरस्कारूनी तयातें । आयूपुत्र मारील तूतें ।असें शापितांतोतीतें । कारागृहीं ठेवितसे ॥४५॥कन्या तयाची सुंदरी । ती गेली स्वर्गावरी ।खेळे नंदनवनांतरीं । अंतरीं आनंद पावूनी ॥४६॥द्विषत्सुता ही असें नेणून । परस्पर बोलती चारण ।हुंडासुराचें हनन । आयु:सुत करील ॥४७॥जो सुषुप्त होतां निश्चिंत । तया मृत्यु अकस्मात ।पातला देवनिर्मित । हें निश्चित वाटतें ॥४८॥प्रसुप्तंच प्रमत्तंच कार्याकार्याविदं खलं ।मृत्युर्ग्रसिष्यति क्षिप्रं देवगोविप्रपीडकं ॥४९॥असें सुरचारणभाषण । ती कन्या ऐकून ।त्वरें कांचननगरीं येऊन । सांगे वर्तमान हुंडासुरा ॥५०॥जो इषुधी धनुष्य ठेवून । राहे तो हें ऐकून ।आठवे मनीं डचकून । शापवचन अशोकसुंदरीचें ॥५१॥तो गुप्तपणें येऊन । पाहे राज्ञीस भिऊन ।कृष्णाग्रपुष्टस्तन । तो पाहून म्हणतसे ॥५२॥अवस्था इची पालटली । ही खास गर्भिणी झाली ।तरी गर्भपात ये वेळीं । प्रयत्नें करावा ॥५३॥जंव न झाली प्रसूत । तंव मारावा इचा पोत ।असें म्हणे तो अकस्मात । दिसलें त्याला सुदर्शन ॥५४॥त्वरें एकसरें गरगरां । राणी भोवतें घाली फेरा ।तें पाहतां त्या असुरा । थरथरां कापरा आला ॥५५॥विलोकितसे दुरोन । म्हणे इचें रक्षण ।गुप्तरूपें करी कोण । माझा यत्न थकला आतां ॥५६॥स्वर्गीं भूमीतळीं । अथवा रसातळीं ।मत्समान नाहीं बळी । तरी हा ह्या वेळीं कोण आला ॥५७॥ही प्रात:कालीन सूर्यासमान । तेजें भासे म्हणून ।इचे पोटीं दारुण । माझा शत्रू पातला ॥५८॥जरी प्रयत्नेंकरून । याचा घ्यावा प्राण ।तरी हें सुदर्शन । आड येऊनी राहिलें ॥५९॥ही प्रज्ञा येथें खुंटली । आतां शक्ती गळाली ।आयुष्याची दोरी तुटली । म्हणोनी बली हा झाला ॥६०॥तरी न टाकावा प्रयत्न । यत्नें न टळतां मरण ।मग अपराध म्हणेल कोण । हा पूर्ण सिद्धांत ॥६१॥जें न घडे उद्योगानें । तेथें दोष कोण म्हणे ।असें म्हणून असुरानें । दु:स्वप्नें दाविलीं तियेसी ॥६२॥मरून गर्भ बाहेर । पडे तया नसे शिर ।भिन्न दिसे उदर । असें स्वप्न पाहे ती ॥६३॥एकाएकीं डचकून । उठे भयभीत होऊन ।म्हणे हें दु:स्वप्न । काय दुश्चिन्ह सुचवितें ॥६४॥बरवा वर लाधून । मी झालें गर्भीण ।आतां हे दु:स्वप्न । काय सुचवून देतसे ॥६५॥अत्रिनंदना आठवून । ती प्रात:काळीं उठून ।प्रात:स्नान करून । प्रार्थी वंदून सूर्यासी ॥६६॥नमो दयासागरा । श्रीसूर्या प्रभाकरा ।अभयदा दिवाकरा । सुरवरा त्रिमूर्ते ॥६७॥हें मम दु:स्वप्न । निवारूनी करी सुस्वप्न ।तुला करितें नमन । माझें मन प्रसन्न करी ॥६८॥जें हें योगीश्वरें फळ । दिधलें तें होवो सफळ ।सुखें उपजो हा बाळ । वाढो कुळ आमुचें ॥६९॥आतांह्या दु:स्वप्ना पाहून । मनीं भीत होऊन ।आल्यें तुला शरण । करी रक्षण आमुचें ॥७०॥तूं आनंददाता । अससी जगत्प्रसविता ।अशी प्रार्थूनी ती वनिता । स्वस्थचित्ता राहिली ॥७१॥तें सुदर्शन राणी न पाहे । तें तो असुरचि पाहे ।म्हणूनी दुष्ट स्वप्न पाहे । दावितसे दैत्य तिला ॥७२॥हुतभुक्सम चक्रकांती । पाहूनी दैत्य घे भीती ।म्हणे उद्योग निष्फळ होती । म्हणूनी खंती करी तो ॥७३॥दैत्याचे माये करून । न हो गर्भाचें पतन ।ज्याला रक्षी अत्रिनंदन । वरदान सफळ व्हावया ॥७४॥मग तो दुष्ट असुर । सोडूनियां आहार ।गुप्त राहुनी अहोरात्र । पाहे अंतर घात कराया ॥७५॥ज्याचें मुनी करिती ध्यान । तो दत्त स्वत: राहून । करी गर्भाचें संरक्षण । तेथें कोण घात करी ॥७६॥जो सुखस्वरूपदाता । कसा कोन तया दत्ता ।ठकवील हे सर्वथा । कानीं कथा न पडेल ॥७७॥निज प्रारब्ध नेणून । दैत्य गेला व्यर्थ शिणून ।तंव राणीचा गर्भ पूर्ण । सुखें करून वाढला ॥७८॥मंत्रज्ञ विप्र बोलावून । राजा करी पुंसवन ।अनवलोभन सीमंतोन्नयन । करी हर्षून विष्णुबली ॥७९॥सुविस्तृत होईल वंश । म्हणूनी राजा धरी आस ।अमित धन ब्राह्मणांस । दे संतोष मानूनी ॥८०॥मग ती दहा मास लोटतां । राणी प्रसूत न होतां ।राजा करीतसे चिंता । अजूनी प्रसूत कांन हो ही ॥८१॥हें प्राय: कांहीं तरी विघ्न । असावें असें मानून ।विप्रा म्हणे जळ मंत्रून । देतां सुखानें प्रसवेल ही ॥८२॥तें नृपाचें वचन । ते ब्राह्मण मानून ।देती जळ मंत्रवून । चिंतून अश्विनीकुमारां ॥८३॥वचोद: शृणुतं दस्त्रौ सप्तवध्रिं च मुंचतं ।नाथमानमृषिं भीतं दशमास्यं यथासुखं ॥८४॥मंत्रें एक वेळ देतां जळ । तें पितां तत्काळ ।ती प्रसवली बाळ । न होतां व्याकुळ सुखानें ॥८५॥ अशेष तेज एकवट । होऊनी झाला कीं बाळ स्पष्ट ।असें वाटे अवचट । बाळाचा ललाट लागतां ॥८६॥योग सकळ पातले । पांच ग्रह परमोच्चीं आले ।अस्त नसे तये वेळे । कोणत्याही ग्रहाचें ॥८७॥जो सर्वेश्वराचा प्रसाद । तो मध्यरात्रीं झाला विषद ।त्याचा तेजें दीप होती मंद । नृपा आनंद जाहला ॥८८॥योगीश्वराचें वरदान । तेंहें पुत्ररूपेंकरून ।उपजतां सर्वांचें मन । समाधान जाहलें ॥८९॥जसा रवी नभोमंडळीं । तसा पुत्र तो भूमंडळीं ।शोभे मग तये वेळीं । आयुराजा तेथें आला ॥९०॥बाळ एकाएकीं पाहून । राहे हृष्ट होऊन ।म्हणेम मी ऋणापासून । मुक्त झालों निश्चयें ॥९१॥संतोष मानूनी असा मनीं । राजा स्नान करूनी ।ब्राह्मणा बोलावूनी । जातकर्म करी तो ॥९२॥विप्रांस धन देऊनी । नांदीश्राद्ध करूनी ।सुवर्णे मधु घृत घेऊनी । बाळाचे वदनीं घाली तो ॥९३॥अपूर्व लाभ मानून । राजा भांडार फोडून ।विप्रां म्हणे लुटा धन । समाधान व्हा तुम्ही ॥९४॥दैवज्ञ येथें येऊन । जन्मलग्न साधून ।ग्रहयोग पाहून । म्हणती सावधान ऐक भूपा ॥९५॥न्रुपा एवढा राजयोग । आम्ही न ऐकला चांग ।हा बळें घेईल स्वर्ग । असा सुयोग दिसतसे ॥९६॥चंद्रा षोडश कला असती । हा जाणेल कला चौसष्टी ।चौदा विद्या जाणूनी ख्याती । मिरवील हा सर्वत्र ॥९७॥जन्मान्तरींचें होतें सुकृत । म्हणोनी हा झाला सुत ।हा महावीर प्रख्यात । दाता धर्मरत होईल हा ॥९८॥हा आर्यांचा रक्षक । अनार्यांचा शिक्षक ।परंतु बाल्यावस्थेंत शोक । देईल तोक हां तुम्हां ॥९९॥हो साम्येसी याचिया । असा न दिसे दुसरा राया ।असें वचन ऐकूनियां । राजा तयां ग्राम देई ॥१००॥संतोष मानुनी असतां । विप्राचें वचन परिसतां ।मग राजाच्या चित्ता । ये खिन्नता किंचित ॥१०१॥शोकयोग न यावा म्हणून । तत्काळ विप्रां वरून ।म्हणे करा अनुष्ठान । शोकशमन व्हावया ॥१०२॥ज्याणें नि:शेष दोष वारून । दिधला हा नंदन ।तो अत्रिनंदन । शोकसमन करो माझें ॥१०३॥माझा सर्वपरी भार । आहे ज्याच्या पादावर ।तो श्रीदत्त देववर । आपुला वर सत्य करो ॥१०४॥म्यां सर्वभावेंकरून । धरिले त्याचे चरण ।पुन: पुन: प्रार्थून । काय मागून घ्यावें म्यां ॥१०५॥सर्वस्य चाहं हृदि संनिविष्ट । हे त्याची प्रतिज्ञा स्पष्ट ।तो सर्वज्ञ अंतर्निष्ठ । सर्व कष्ट वारील ॥१०६॥बाळ प्रत्येक वेळीं । रडे मातेजवळी ।माता आश्वासी त्या त्या वेळीं । प्रेमें सांभाळी ज्यापरी ॥१०७॥आम्ही भक्तवत्सला जवळी । आम्ही त्यापरी मारूं आरोळी ।तोचि राखो वेळोवेळीं । असा त्या वेळीं प्रार्थीं भूप ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये चत्वारिशोsध्याय: ॥४०॥॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP