मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय २१ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २१ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय २१ वा Translation - भाषांतर श्रीदत्तात्रेयाय नम: ॥वेदधर्मा म्हणे दीपकातें । राम पाहूनी सैन्यातें ।गर्जना करूनी अर्जुनातें । मागें फिरऊनि पुढें आला ॥१॥राम म्हणे क्षत्रियाच्या पोरा । धेनू पळविसी कां चोरा ।आतां तूं धरी धीरा । माझा दरारा नेणसी कीं ॥२॥तूं म्हणविसी विवेकी । हें क्षत्रियां उचित कीं ।आतां माझ्या बळा विलोकी । लोकीं असा दुजा नाढळे ॥३॥भूपानें द्यावें गोदान । द्विजांचें करावें प्रतिपालन ।हा धर्म सनातन । तूं उलंडून जाशी दुष्टा ॥४॥काय हा तुझा अधर्म । केवी घेशी इहपर शर्म ।आतां तुझें तोडितों वर्म । तुझें दुष्कर्म उदेलें हें ॥५॥अशी निर्भर्त्सना ऐकून । रामाप्रति बोले अर्जुन ।राजे करूनी यत्न । रत्न भांडारीं आणिती ॥६॥हे धेनू गोरत्न । म्यां देखिलें नूतन ।देऊनियां गोधनरत्न । घेऊनि जातों नगरासी ॥७॥ही मी पुन: न देईन । जरी तूं अससी बळपूर्ण ।करी मजसीं रण । अन्यथा जाण न मिळे ही ॥८॥राम म्हणे हें तुझें दुर्वचन । ब्राह्मण विकती कीं गोधन ।कोणीं तुझें घेतलें रत्नधन । बलात्कार करून आलासि तूं ॥९॥या कामधेनूवरून । ब्रह्मांड टाकावें ओवाळून ।तीबद्दल रत्नें ठेवून । जासी घेऊन तूं करंटा ॥१०॥आतां करूनी समर । तुझें तोडितों शिर ।तरीच मी रेणुकाकुमार । चांडाळीचा पोर नातरी ॥११॥असी प्रतिज्ञा करून । हातीं परशु धरून ।राम कराया कदन । सरसरून पुढें आला ॥१२॥सज्ज देखूनि रामातें । राजा आज्ञा दे सैन्यातें ।राम करून अन्यायातें । येतो यातें ठार मारा ॥१३॥बोलतो अबद्ध भाषण । हा असेना कां ब्राह्मण ।समरीं याचा घेतां प्राण । अन्याय कोण म्हणेल ॥१४॥अशा राजाचिया वचना । ऐकोनियां ती सेना ।करावया कदना । भृगुनंदनावरी लोटे ॥१५॥कोणी बाण सोडिती । कोणी खङ्गी तोडूं इच्छिती ।कोणी ग अदा झुगारिती । मुद्गर फिरविती वारंवार ॥१६॥रामही समरधीर । उभा राहोनी समोर ।युद्ध करी परशुधर । एकटा वीर बलाढ्य ॥१७॥कोणाचीं कवचें फोडी । कोणाचीं धनुष्यें तोडी ।कोणाचे मुकुट फोडी । तोडी चरण कित्येकांचे ॥१८॥कित्येकांचे हात । तोडोनी करी घात ।कित्येकांचे फोडिले रथ । सारथी मारिले कित्येकांचे ॥१९॥गजांचीं गंडस्थळें फोडी । अश्वांचीं शिरें तोडी ।असी सेना उडाउडी । राम धाडी यमसदना ॥२०॥ज्याचा परशू अतितीक्ष्ण । लागतां तत्काळ घेई प्राण ।सर्वांचे गळलें त्राण । कोण जिंकील तयातें ॥२१॥कोणी मेले तत्काळ । कोणी पडले घायाळ । सर्व झाले व्याकुळ । वाटे काळ राम तो ॥२२॥जसा एकटा केसरी । अनेक गजांतें मारी ।तसा एकटा संहारी । राम वैरी सैन्यातें ॥२३॥सैन्य नि:शेष मारिलें । रत्काचे पूर चालिले ।शव वाहूं लागले । आश्चर्य केलें देवांनीं ॥२४॥रक्ताच्या नद्या दिसती । केश शैवाल भसती ।हात सर्पसे दिसती । भासती कलेवर जलचर ॥२५॥ज्या ढाला फिरती । ते भोंवरे भासती ।मांसाचे चिखल होती । आंत रुतती गजाश्व ॥२६॥जसा गरुड एकला । संहारी सर्पकुला ।तसा राम एकला । मारिता झाला सर्व सैन्य ॥२७॥राम हा वडवानळ । प्रज्वळला प्रबळ ।अर्जुनसैन्यसमुद्र केवळ । जाळी सकळ क्षणार्धें ॥२८॥राम हा अगस्ती क्षोभला । सैन्यसागर शोषिला ।रायाचा संशय फिटला । उठला मग तत्क्षणीं ॥२९॥राजा म्हणे हा नोहे नर । होय साक्षात् विश्वंभर ।अन्यथा हा सैन्यसागर । कोण पामर शोषिता ॥३०॥सूर्य जसा अंधकार । क्षणें करितो दूर ।तसा यावें सैन्यभार । नि:शेष सत्वर उडविला ॥३१॥ सुर किंवा असुर । न टिकती माझ्यासमोर ।मला जिंकी असा शूर । ब्रह्मांडीं असेना ॥३२॥तेथें बापुडा नर । मजसी करील कीं समर ।तरी हा नोहे द्विजकुमार । लक्ष्मीवर खास असे ॥३३॥तरे याशीं युद्ध करून । क्षात्रधर्में तोषवून ।समरीं देह ठेऊन । आद्यस्थान घ्यावें तें ॥३४॥असा निश्चय करून । महात्मा तो अर्जुन ।रामासमोर राहून । म्हणे कदन करी आतां ॥३५॥तूं तों अससी ब्राह्मण । मी क्षत्रिय दारुण ।माझें स्वरूप भीषण । कठिण बाण माझे हे ॥३६॥तूं तरी सुकुमार । तपस्वी ऋषिचा कुमार ।नित्य भक्षण फळाहार । केवि धीर धरसील ॥३७॥व्यर्थ जाशील मरोनी । शोक करील तुझी जननी ।तुवां मागें फिरोनी । जावें सदनीं सुखानें ॥३८॥अंगा डसतां मच्छर । तुम्हां वाटती कष्ट फार ।लोहाग्र हे तीक्ष्णशर । झोंबतां धीर धरवेल कीं ॥३९॥राम म्हणे माझी खंती । न करी तूं काकुळती ।शस्त्रें उचलोनी घे हातीं । शब्दतती आतां पुरे ॥४०॥मग राजा काय करी । श्रीदत्ता स्मरे अंतरीं ।पांचशें धनुष्यें करीं । सज्ज करी त्वरेनें ॥४१॥गर्जोनियां सिंहापरी । बाणांची वृष्टि करी ।रामातें आच्छादित करी । राम वारी तद्बाणां ॥४२॥जसा मेघ पर्वतावरी । हजारों धारांनीं वृष्टी करी ।त्याप्रमाणें रामावरी । राजा करी शस्त्रवृष्टी ॥४३॥देव विमानीं बैसून । अंतरिक्ष राहून ।तें युद्ध पाहून । हर्षे मान तुकाविती ॥४४॥रथारूढ अर्जुन । प्रतापी दुर्दर्शन ।सहस्रकर भीषण । वाटे अरुण दुसरा कीं ॥४५॥वेळोवेळ पांचशें बाण । सोडूनियां दारुण ।रामा टाकी झांकून । करी गर्जना हरीसा ॥४६॥ज्याचें हस्तलाघव अचाट । ज्याचें शस्त्र न जाय फुकट ।ज्याचा मार तिखट । राहे निकट धीट तो ॥४७॥पाहूनी हस्तलाघव त्याचें । मन संतुष्ट झालें रामाचें ।म्हणे हस्तलाघव याचें । या वाचे न वदवे ॥४८॥कार्तवीर्य हा महाशूर । महावीर समरधीर ।याला न मारतील सुरासुर । कायसा नर यापुढें ॥४९॥अशी प्रशंसा करूनी । बाणजाल तोडूनी ।साश्वासारथी मारूनी । रथ फोडूनी टाकिला ॥५०॥वृक्षाचे खांदे कसे । तोडिती वेगें जसे ।तोडी अर्जुनाचे भुज तसे । परशूनें परशु-धर ॥५१॥जे जे भुज तुटती । तेथें भुज नवे फुटती ।रामा मारूं उठती । न हटती मागें ती ॥५२॥रामा त्वरा करोनी । भुजां टाकी तोडूनी ।तरी पुन: नवीन फुटूनी । रामातें ताडिती ॥५३॥पर्वत झाले भुजांचे । मन खचलें रामाचें ।म्हणे काय कारण याचें । मजला सर्वथा कळेना ॥५४॥जों भुजांचा नाश न होईल । तों याचें शीर न तोडवेल ।जरी हा न मारवेल । व्यर्थ जाईल प्रतिज्ञा ती ॥५५॥राम झाला नाउमेद । मनामध्यें करी खेद ।मती जाहली मंद । म्हणे छंद न पुरेल कीं ॥५६॥रेणुका पतिव्रता । ही माझी माता ।जमदग्नी माझा पिता । गुरुदेवता श्रीशंकर ॥५७॥यांचा अनुग्रह असेल । तरी यश मिळेल ।हा मम करें मरेल । प्रतिज्ञा होईल सत्य माझी ॥५८॥असें राम बोलत । तों तेव्हां अकस्मात् ।आकाशवाणी बोलत । रामाप्रत संबोधूनी ॥५९॥श्रीदत्तप्रसादेंकरूनी । भुजांचें बीज उरस्थानी ।आहे तें पूर्वीं शोषुनी । मग तोडूनी टाकी भुज ॥६०॥आसें रामें परिसूनी । आग्नेयास्त्र सोडूनी ।उरस्थल फोडूनी । भुजबीज शोषून घेतलें ॥६१॥दोन भुज राहिले । ते अभेद्य झाले ।रामाला ते न तोडवले । भलें झालें म्हणे राम ॥६२॥तेव्हां समजला अर्जुन । म्हणे आयुष्य गेलें सरून ।आतां होईल शरीरपतन । एक क्षण न लागतां ॥६३॥धन्य माझा गुरुदेव दत्त । माझें हृष्ट केलें चित्त ।पुरविला माझा मनोरथ । त्याला समस्त वोपिलें ॥६४॥तद्रूप मी अभेद । असें सच्चिदानंद ।असा तो परमानंद । अभेद झालों समरसें ॥६५॥स्वस्वरूपीं दृढ लक्ष घरी । इंद्रियांचा प्रत्याहार करी ।तयां मनामध्यें लीन क रे । मनाचा लय करी प्राणामध्यें ॥६६॥तेजामध्यें प्राणलय । करी तेजाचा परदैवतीं लय ।असा होवोनियां अद्वय । ब्रह्ममय तो झाला ॥६७॥नाडीद्वारें लखलखीत । उजेड पडला हृदयांत ।सुषुम्णामार्ग धरीत । प्राण ऊर्ध्वगत झाला ॥६८॥तंव अर्जुनाचें शिर । रामें तोडिलें सत्वर ।दणदणोनी पडे कलेवर । जयजयकार देव करिती ॥६९॥रामाचें मस्तक फुटलें । दत्तरूपीं प्राण गेले ।रायें सायुज्य घेतलें । अलभ्य जें देवादिकां ॥७०॥स्मरण करी जन्मवरी । श्रीदत्त ज्याचे अंतरीं ।त्याला कोण मारी । निमित्तमात्र हो राम ॥७१॥श्रीदत्ताचा पूर्ण भक्त । सर्वसंगप्रित्यक्त ।पूर्वींच होता जीवन्मुक्त । विदेहमुक्त आतां झाला ॥७२॥स्वर्गीं देव हृष्ट होती । जयजयकारें गर्जती ।रामावरी पुष्पें वर्षती । हर्षा मिती नाहीं ज्यांच्या ॥७३॥स्वरगीं दुंदुभी वाजती । गंधर्व सुस्वरें गाती ।अप्सरा नृत्य करिती । यश गाती रामाचें ॥७४॥देव म्हणती पुरुषोत्तमा । जयजया भार्गवरामा ।तूं अससी मंगलधामा । नाहीं सीमा पराक्रमाची ॥७५॥जो जिंकी यक्षकिन्नरां । जो नावरें देवासुरां ।जो बळें बांधी वीरां । तया बरा मारिला ॥७६॥अशी स्तुती करिती । कल्पवृक्ष पुष्पें वर्षिती ।रामही आनंदला चित्तीं । प्रतिज्ञा ती सफळ होतां ॥७७॥घेऊनियां धेनूसी । राम आला आश्रमासी ।वंदूनी सांगे पितयासी । म्यां राजाशीं मारिलें ॥७८॥आजी युद्ध करून । सर्व सैन्य मारून ।रायाचे भुज तोडून । शिरच्छेदन केलें म्यां ॥७९॥तें वचन ऐकूनी । अनुतापला मुनी ।म्हणे जा येथूनी । पातक करून आलास ॥८०॥जो वारी प्रजेचें दु:ख । ज्याला भीति तिनी लोक ।जो सर्वां दे सुख । तो पुण्यश्लोक वधार्ह कीं ॥८१॥हा असतां भूप । निर्विघ्न होई आमुचें तप ।तो प्रजेचा मायबाप । त्यावरी कोप कां केला ॥८२॥जरी त्याणें विनोदें । धेनू नेली स्वच्छंदें ।तरी मी शाप न दें । त्वां हें काय केलें रे ॥८३॥जो अमित गोदानें देई । सिद्धी निधी ज्याचे पायीं ॥लागती तया हे गाई । सांग कशाला पाहिजे ॥८४॥त्याणें हा विनोद केला । हा तुला न कळला ।त्वां व्यर्थ शिरच्छेद केला । शिरीं घेतला पापपर्वत ॥८५॥दशश्रोत्रियसम । राजा असे असा आगम ।त्या मारितां घडे अधर्म । त्वां हें कर्म निंद्य केलें ॥८६॥ज्याचे शिरीं अभिषेक । होई त्याला वंदी लोक ।हा तरी पुण्यश्लोक । जोडिलें पातक तद्वधें ॥८७॥ऐकूनी पितृवचन । राम अनुताप पावून ।पितृचरण वंदून । बोले दीन होवूनी ॥८८॥ताता मी नेणून । पाप केलें दारुण ।तुजवांचून कोण । माझें रक्षण करील ॥८९॥ हो शरण शरण । तूं करी परित्राण ।धरिले तुझे चरण । उद्धरण करावें ॥९०॥असा राम कळकळे । निजचित्तीं हळहळे ।लोळे भरूनी डोळे । मग वळे मुनी तो ॥९१॥जरी पाप केलेंस थोर । तरी आतां सत्वर ।विश्वास ठेवी माझेवर । तूं कर तीर्थयात्रा ॥९२॥होऊनियां अनुतप्त । जीं या भरतखंडांत ।तीर्थें असती समस्त । सेवी स्नानपानें तूं ॥९३॥गंगेची कावड घेऊन । दक्षिणेस जाऊन ।समुद्रीं सोडून । समुद्रदर्शन करूनियां ॥९४॥वाळूची कावड घेऊन । गंगातीरीं आणून ।गंगास्नान करून । गंगेमध्यें सोडी ती ॥९५॥चार धाम पाहे पुत्रा । ज्योतिर्लिंगें बारा ।सात पुरी पवित्रा । यांचें दर्शन करावें ॥९६॥राम ऐसें ऐकूनी । पितृवचन मानूनी ।पितयातें नमूनी । मात्राज्ञा घेऊन निघाला ॥९७॥स्वपाप उच्चारून । पश्चात्तापा पावून ।यात्रासंकल्प धरून । कार्पटीक होउनी निघाला ॥९८॥ब्रह्मनिष्ठ तात । जसें जसें आज्ञापित ।राम तसें आचरित । भक्तियुक्त होऊनी ॥९९॥राम हा विश्वरूप । त्यासी कैसा कोप ।न शिवेल त्याला पाप । अनुताप मग कैसा ॥१००॥जो असे अज्ञानी । तो वेष्टिजेल कामांनीं ।पाप केलें हें मनीं । अहंकारोनी घेईल तो ॥१०१॥राम हा विष्ण्ववतार । त्यासी कैचा अहंकार ।लोकशिक्षणार्थ निर्धार । हा व्यापार तयाचा ॥१०२॥बद्रिकाश्रमीं जाऊन । नारायणा वंदून ।गंगेची कावड घेऊन । तीर्थपावन करीत ये ॥१०३॥यमुना क्षिप्रा नर्मंदा । तापी पयोष्णी गोदा ।कृष्णा कावेरी नंदा । देखे पुण्यदा ताम्रपर्णी ॥१०४॥दक्षिणेस्सी जाऊन । समुद्रस्नान करून ।तेथें सेतू भरून । कार्तिकेयदर्शन करी पुन: ॥१०५॥शिवकांची विष्णुकांचीसी । पाहुनियां गिरीसी ।पूजूनी मल्लीकार्जुनासी । विरूपाक्षासी वंदितसे ॥१०६॥गोकर्णासी जाऊन । कोल्हापुरा येऊन । त्रिंबकेश्वरा वंदून । सोमनाथा जातसे ॥१०७॥सिद्धपुरी येऊन । पुष्करीं स्नान करून ।प्रयागासी पाहून । सेतुविसर्जन करीतसे ॥१०८॥काशीस जाऊन । तीर्थयात्रा संपवून ।पितयातें भेटून । सर्व सांगे ॥१०९॥इति श्रीदत्तमाहात्म्ये एकविंशोsध्याय: ॥२१॥श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP