मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ३७ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३७ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ३७ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥गुरु म्हणे शिष्यासी । असें गुरुराया त्यासी ।सांगती विस्तारेंसी । राजा मानसीं आनंदें ॥१॥मदालसेचा लेंक । हृष्ट होऊनी अलर्क ।म्हणे चित्तीं ज्ञानार्क । उदित केला ॥२॥माझा हात धरून । ह्या भवाब्धींतून ।मला वर काढून । आनंदीं गढून ठेविला ॥३॥एकदां वंदन । करितां प्रसन्न । होऊनी दिल्हें ज्ञान । दवडून दु:ख माझें ॥४॥हीच वंदन भक्ती । ही उत्तम युक्ती ।जी दे मला मुक्ती । करितां प्रणती तत्काळ ॥५॥देव गुरु वेदांत । सेवावा यावज्जीवित ।अन्यथा कृतघ्नत्व । महंतांची हे उक्ती ॥६॥आजीवितं त्रय: सेव्या वेदांतो गुरुरीश्वर: ।पूर्वं ज्ञानाप्तये पश्चात्कृतघ्नत्वनिवृत्तये ॥७॥हें मनीं आणून । जग भगवद्रूप मानून ।सर्वां करी वंदन । मग कृतघ्न कोण म्हणे ॥८॥इदं सदेव म्हणून । बोले वेदवचन ।हें जग ईश्वराहून । नसे भिन्न निश्चयें ॥९॥ईश्वर तोचि गुरुवर । अविद्या गुकार ।तन्नाशक रुकार । म्हणूनी ईश्वर गुरूची ॥१०॥गुमविद्यां रुणद्धीति गुरुरीश्वर एव स: ॥११॥गणेश अग्नि विष्णुयुक्त । हा मंत्र आगमोक्त ।तोचि गुरु व्यक्त । करी मुक्त भवबंधा ॥१२॥गणेशवन्हिसंयुक्तो विष्णुना च समन्वित: ।वर्णस्वयात्मको मंत्रश्चतुर्वर्गफलप्रद: ॥१३॥हाचि माझा मंत्र । याणें झालों पवित्र ।आतां इहपरत्र । नाहीं अभिलाष अणुमात्र ॥१४॥जरी ह्या देहाचें । चर्म काढूनी त्याचें ।जुतें पायीं गुरूचे । घालिताही ऋण न फिटे ॥१५॥दया करा गुरुवरा । मी तुमच्या उपकारा ।उत्तीर्ण नोहें उदारा । प्रत्युपकारा नेणें मीं ॥१६॥उपकार हा सद्गुरो । माझे अंगीं जिरो ।हें चित्त तुम्हां स्मरो । न विसरो आपात ॥१७॥म्हणोनी घाली लोटांगण । पुन: पुन: वंदून ।म्हणे झालों पावन । मी वंदनमात्रेची ॥१८॥धन्य माझी माता । जीचा लेख पाहतां ।भेटलों गुरुनाथा । आला माथा कृपाहस्त ॥१९॥धन्य माझा बंधू । केवळ दयासिंधू ।जा निरुपम साधू । जो हित साधूनी दे माझें ॥२०॥धन्य ज्याची दृष्टी । करी कृपावृष्टी ।धुंडितां हे सृष्टी । न पुष्टिकर दुजा असा ॥२१॥धन्य वात्सल्य ज्याचें हें । स्वनिष्ठा सोडुनी मोहें ।वनांतून येऊन हें । हित करी महेश्वरसा ॥२२॥धन्य काशीराज हा । ज्यानें सोडूनी स्नेहा ।करवूनी राज्यविरहा । महाकार्य करविलें ॥२३॥जे कोश लुटिले । जें सैन्य नष्ट झालें ।जें स्वयें उलटलें । हें सर्व झालें हित माझें ॥२४॥होतां हा विनाश । आठवला मात्रुपदेश ।तेणें भेटला परेश । जेणें निराश केलें मज ॥२५॥सर्व समृद्धीची प्राप्ती । ईश्वराची अवकृपा ती ।धनादिकांची आपत्ती । ईश्वरकृपा ती जाणावी ॥२६॥कनक हातीं मिळतां । नरा ये उन्मत्तता ।डोळा होई वरता । नवल सर्वथा हें नोहे ॥२७॥कनक नाम धुत्र्यासी । मिळालें सेवितां त्यासी ।उन्मत्तता ये क्षणेंसी । हें सर्वांसी ठावें असे ॥२८॥मिळतां समृद्धवित्त । मी झालों उन्मत्त ।विषयीं डुबलें चित्त । संतमहंत नोळखावें ॥२९॥सख्खा बंधू असूनी । ज्याला मानिती मुनी ।तो स्वयें वनांतूनी । येऊनी भाग मागतां ॥३०॥म्यां मूर्खपणेंसी । धिक्कारिला तयासी ।राज्याची चाड त्यासी । काय होती बरें ॥३१॥तो दयाळू पूर्ण । नेत्रीं दारिद्र्यांजन ।भरूनी हे नयन । उघडवी पूर्ण प्रकाशें ॥३२॥धन्य ती माऊली । तिची कृपासाउली ।होती म्हणूनी लाधली । सोय आपुली आपणा ॥३३॥धन्य हे गुरुचरण । आज्ञानतमहरण ।ज्यांना होतां शरण । जन्ममरण संपलें ॥३४॥जे शमदामा हरी । वैराग्या निवारी ।त्या गार्हस्थ्या टाकूनी दूरीं । वनांतरीं आतां जावें ॥३५॥गृहात्प्रव्रजितो धीर: पुण्यतीर्थजलाप्लुत: ॥३६॥असें बोलते स्मृती । ही न थेवितां स्मृती ।भगवंताची विस्मृती । होईल मतिभ्रंशानें ॥३७॥असा राजाचा निश्चय । ऐकून दत्तात्रेय ।म्हणे अलर्का तूं जाय । बंधूचे पाय धराया ॥३८॥त्याची ही खटपट । तुला मिळाली वाट ।तरी आतां तूं नीट । तया भेट जाऊनी ॥३९॥तूं कृतकृत्य अससी । अभिमाना न शिवसी ।पुढें तुला आवडे जसी । ठेवी तसी स्थिती तूं ॥४०॥आत्मा असे असंग । इंद्रजाळसें हें जग ।निर्णय होतां मग । वासनारंग न उठेल ॥४१॥आत्मासंगस्ततोन्यत्स्यादिंद्रजालं तु मायिकं ।इत्यचंचलनिर्णीते कुतो मनसि वासना ॥४२॥वेदप्रमाणानें झालें ज्ञान । त्याचें पुन्हा विनाशन ।करी असें प्रमाण । नसे भुवन धुंडिता ॥४३॥तेव्हां आतां तूं राया । वाटे तिकडे जा सखया ।न पावसी भया । म्हणूनिया आलिंगिती ॥४४॥गुरूनें देतां आलिंगन । अंगीं रोमांच उठून ।प्रेमें गळां दाटून । आले नयन भरूनी ॥४५॥देहभान हरपून । राजा निश्चळ होऊन ।बाह्याभ्यंतरभान । दे सोडून तत्क्षणीं ॥४६॥ज्या सुखा नाहीं मिती । योग्या न ठावी जी स्थिती ।प्रेमळ भक्ताची स्थिती । ती गती अनिर्वाच्य ॥४७॥कोटी जन्मांचें सुकृत । जेव्हां मूर्तिमंत ।दैवें उदया येत । तेव्हां भक्त होईल ॥४८॥भक्तीचे प्रकार । जगीं असती चार ।त्यांत ज्ञानोत्तर । भक्ती थोर जाणावी ॥४९॥सायुज्यमुक्तीची वार्ता । ती दूर असो आतां ।नि:सीम भक्तीची कथा । जेथें सर्वथा न घडे ॥५०॥जो हा ज्ञानी भक्त । भगवंतीं नित्यमुक्त ।तोचि परम मुक्त । प्रेमरसासक्त सर्वथा ॥५१॥त्या भक्तिरसाचा स्वाद । तोचि जाणे विशद ।त्याचा परमानंद । तोचि स्वच्छंद अनुभवी ॥५२॥हा अखंडानंद । जणूं नेणे मुकुंद ।जरि तो सच्चिदानंद । स्वच्छंद असे जरी ॥५३॥तरी घरी अवतार । करी अभिमानें दूर ।भक्तापाशीं सादर । वागे निरंतर भावलुब्ध ॥५४॥प्रेमळ भक्ताविण । देवा न पडे चैन ।म्हणूनी लाज सोडून । राहे तदधीन भक्तांपासीं ॥५५॥असी ही प्रेमभक्ती । हीच एकांतभक्ती ।इजवरूनी चारी मुक्ती । ओंवाळून टाकाव्या ॥५६॥ही भक्ती अलर्कासी । लाधली अनायासीं ।कोण त्याच्या दैवासी । वाखाणील ब्रह्मांडीं ॥५७॥ती छबी दत्ताची । ती शोभा मुखकमळाची ।ती चपळता नेत्रांची । लावण्याची ती सीमा ॥५८॥तें रूपाचें मांडण । तें सुहास्यवदन ।तें प्रेमकटाक्षवीक्षण । तें वराभय दोन करांचें ॥५९॥तो शंखासम कंठ । तें सुचिन्ह वक्ष:कपाट ।तें पर्णासम पोट । गंभीरावर्तसम नाभि ॥६०॥ते ऊरू नीट रंभोपम । ते चरण निरुपम ।वज्रांकुशध्वज पद्म । जेथें परम चिन्हित ॥६१॥ही स्वरूपाची मात । ही छबी अत्यद्भुत ।हें एक जाळें निश्चित । मनोमत्स्य ज्यांत सांपडे ॥६२॥जें धांवें जिकडे तिकडे । भटकोनी चहूंकडे ।जया विसावा कोणीकडे । न मिळे तें जडे भगवद्रूपी ॥६३॥एकदां छबी पाहतां । हाल चाल त्या चित्ता ।मग नोहे सर्वथा । बळें ओढितां न हाले ॥६४॥ज्याला असे मोचन । तें कायसें मोहन ।अतर्क्य हें भगवद्ध्यान । जेथूनी मन न फिरे ॥६५॥मधा चिकटे मासी । उडूं न ये तिसी ।तसें ह्या मनासी । भगवद्रूपासी न सोडवे ॥६६॥मन इंद्रियांचा राव । मनें रूपीं घेतां ठाव ।इंद्रियां न मिळे वाव । बाहेर धांव घ्यावया ॥६७॥जसें धन्या सोडून । न जाती सेवक जन ।तसा स्वराजा मन । ठरतां न गमन इंद्रियांसीं ॥६८॥श्रीमंतासवें जातां । तया मेजवानी होता ।सेवकां मिळे न मागतां । जसें पक्वान्नभोजन ॥६९॥तसा मना परमानंद । होतां इंद्रियांचा छंद ।पूर्ण होई जाई खेद । हा स्वाद दुर्लभ ॥७०॥घडूनी येतां ध्यान । रूपीं रमे मन ।इंद्रियेंही तें स्थान । सर्वथा न सोडिती ॥७१॥तसी अलर्काची स्थिती । दत्तरूपीं रमली मती ।सर्वथा खुंटली गती । न हले वृत्ती सर्वथा ॥७२॥असा तया पाहून । तया हातीं धरून ।बोले अत्रिनंदन । अलर्का वचन ऐक हें ॥७३॥आतां तुझें मन । न सोडील माझें ध्यान ।आतां तुवां जाऊन । बंधूचें दर्शन करावें ॥७४॥मग वनीं जाऊन । मद्रूपीं लीन होऊन ।मदाकार अनुदिन । निर्वासन राहसी ॥७५॥असें वचन ऐकून । अलर्क कर जोडून ।करीतसे स्तवन । चित्तीं ध्यान रेखूनी ॥७६॥पद ॥ नमो ब्रह्मदेवा नमो वासुदेवा । नमो वामदेवा सुभावा ॥धृ०॥शिष्टजनरंजना दुष्टजनभंजना । दु:खभयतर्जना शोकशमना ।हीनजनमाधवा दीनजनबांधवा । तारिं मज केशवा वारिं भावा ॥७७॥दैत्यजनपातना । पतितजनपावना ।अहितजनदाहना । कोपदहना ॥७८॥तापशमना भवा । पापदमना शिवा ।तव पदीं ह्या जिवा । दे विसावा ॥७९॥( ओवी ) ॥ तूं सच्चिदानंद । प्रत्यगात्मा अभेद ।असें बोले वेद । ते विशद कळले आतां ॥८०॥तूं सर्वकारण सर्वाधार । स्वेच्छेनें झालासी नराकार ।अससी स्वेच्छाकार । वाङ्मनोदूर रूप तुझें ॥८१॥ब्रह्मा आणि ईश । हा मायोपाधीचा भास ।अविद्येचा भास । जीव आणि प्रत्यगात्मा ॥८२॥अविद्या माया निरसतां । मन जीव ईशता ।न भासे तत्वता । अद्वितीयता त्वद्रूप ॥८३॥रज्जूपरी भुजंग । त्यापरी हें जग ।तुझें ठायीं भासे सांग । ज्ञानें भ्म्ग होई जें ॥८४॥जें पूर्वीं नसतें । अंतींही नसतें ।मध्येंच भासतें । तें नसे कालत्रयीं ॥८५॥( लोकार्ध ) ॥ आदावंते च यन्नास्ति वर्तमानेsपि तत्तथा ॥८६॥जंव भ्रम होता । तंव जगाची सत्यता ।वाटली ती आतां । तव प्रसादें नासली ॥८७॥तुझी दृष्टी पडतां । धन्य झालों आतां ।हरपली जीवता । ब्रह्मता अंगीं आली ॥८८॥तूं ब्रह्म साक्षात । मला दिली प्रचीत ।अभेदें कळलें अद्वैत । झालें शांत मीतूंपण ॥८९॥तरी व्हावें भजन । म्हणूनी माझें मन ।विकल्प मानून । हें भजन चालवी ॥९०॥अतएव मानी देव । मी जीव तूं शिव ।मी भक्त तूं देव । भक्तिभाव हा असा ॥९१॥ठेवितां हा भाव । भजनाचा लाघव ।आनंदा नसे वाव । हा अभाव कोण म्हणे ॥९२॥असें प्रेमेंकरून । करितां हें भजन ।त्वद्रूपीं लपे मन । ध्याता ध्यान विसरूनी ॥९३॥लीन होतांही मन । त्याचें करूं उत्थान ।पुन: घडवूं भजन । आम्हां हीच कर्मणूक ॥९४॥ज्याला म्हणती अत्रिज । त्याचें रूप षड्भुज ।आवडे तो मज । हो कां अज वेदमतें ॥९५॥तोचि तूं सगुण । परि तुझे गुण ।पूर्ण जाणे कोण । अनंतपण तुज साजे ॥९६॥कधीं कधीं विप्र । कधीं दिससी क्षत्र ।कधीं वैश्य कधीं शूद्र । दिससी संकर कधीं तूं ॥९७॥कधीं बाल कधीं वृद्ध । कधीं किशोर कधीं प्रौढ ।कधीं सुज्ञ कधीं मूढ । असा गूढ वागसी तूं ॥९८॥कधीं होसी तू भोगी । कधीं दिससी रागी ।कधीं त्यागी विरागी । कधी योगी भाससी ॥९९॥तो तूं अपापविद्ध । परी भाससी अशुद्ध ।कधीं शुद्ध कधीं बुद्ध । अबुद्धसा ॥१००॥जो तूं मायाधीश । सर्वेंद्रियांचा ईश ।तूंचि विज्ञानेश । तो तूं अनीश भाससी ॥१०१॥असी हे तुझी लीला । न कळे ब्रह्मादिकांला ।हे अनंत लोकपाला । असो तुला नमस्कार ॥१०२॥आमुचा मोक्ष । हा तूं समक्ष ।वेद म्हणे ज्या परोक्ष । तो तूं अपरोक्ष आम्हांसी ॥१०३॥तूं श्रुतिशिरोगीत । धर्माधर्मातीत ।तूंची आमुचें अमृत । हें निश्चित त्रिवाचा ॥१०४॥म्यां करायाचें केलें । मिळवावयाचें मिळविलें ।पहायाचें पाहिलें । अनुभविलें अनुभाव्य जें ॥१०५॥आतां मीतूंपण । हें बोलेल कोण ।प्रारब्ध अनुसरून । तथापि बोलतों आतां ॥१०६॥आज्ञा जी आपुली । ती शिरसा मानिली ।असें म्हणूनी तो धाली । पायीं मिठी ॥१०७॥इति श्रीदत्तमाहात्म्ये सप्तत्रिंशोsध्याय: ॥३७॥॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP