मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १०७ ते १०९ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १०७ ते १०९ Translation - भाषांतर दिने दिने स्वप्नसुप्त्योरधीते विस्मृतेऽप्ययम् ॥परेद्युर्नानधीत: स्यात्तद्वद्विद्या न नश्यति ॥१०७॥प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना ॥न नश्यति न वेदांतात्प्रबलं मानमीक्ष्यते ॥१०८॥जैसें कां करितां अध्ययन ॥ स्वप्न सुषुप्तींत होतें विस्मरण ॥परि प्रबोधकाल होतांचि जाण ॥ जैसेंच्या तैसें ॥४७८॥तैसेंचीं हेंही ज्ञान ॥ न नासें होतां ही विस्मरण ॥ नाना विस्मरणचि नासतसें जाण ॥ इया बोधें ॥४७९॥सूर्य असतांचि जवळी ॥ कैसी तमाची होय झांकोळी ॥परिस भेटतांची लोहाची मैळी ॥ परतोनी येई ? ॥४८०॥तैसें प्रमाण सिद्धज्ञान ॥ त्यास कोण करील अप्रमाण ॥वेदांत केसरी गर्जोंन ॥ बोलिला जें कां ॥४८१॥इतर शास्त्रें जंबुकें ॥ न होतींच जया सन्मुखें ॥भयें थबकलीं देखें ॥ ठाईंच्या ठाईं ॥४८२॥आणखी मतवादी सावजें ॥ निष्प्राणवत झालीं खुजें ॥ तिहीं काय नाशिजें ॥ इया ज्ञाना ॥४८३॥तस्माद्वेदांतसंसिद्धं सदद्वैतं न बाध्यते ॥अंतकालेऽप्यतो भूतविवेकान्निर्वृत्ति: स्थिता ॥१०९॥तस्मात वेदसिद्धांत ॥ सदद्वैत हाचि यथार्थ ॥ ब्रम्हाप्राप्ति प्राण्या होत ॥ जया निश्चयें ॥४८७॥ऐसा हा भूतविवेक ॥ जे नित्य विचारें करती सम्यक ॥ तया ब्रम्हापद देख ॥ आधींच आलें ॥४८८॥अंतकाळीं ही भ्रांती ॥ तया न होय निश्चिती ॥ पूर्णं लाभे न्निवृत्तिस्थिती ॥ पठण मात्रें ॥४८९॥श्रीमुनीविद्यारण्य ॥ घेउनी माळेचें प्रमाण ॥ केले नवाधिकशत जाण ॥ श्लोकमणी ॥४९०॥ही माळाजे जपती ॥ तयां काळाची नाहीं भीती ॥सदद्वैत मेरू निश्चिति ॥ येती तया ठाया ॥४९१॥मेरुचिया पैटी ॥ स्थित होतां नाहीं राहटी ॥इयाचा विचार करितां शेवटीं ॥ सतचि होती ॥४९२॥जे अलक्ष्य करुनी उपेक्षती ॥ तयां होय पुनरावृत्ती ॥म्हणोनी लक्ष्य ठेवोनी निश्चिती ॥ बुद्धि करावी ॥४९३॥हा ! हा ! जन्मभूमीच्या ग्रामीं ॥ मी स्नात झालों इया संगमी ॥ सदद्वैत गंगा नामीं ॥ देखोनीया ॥४९४॥श्लोक नद्या मिळाल्या ॥ समस्तही गंगारूप जाहल्या ॥त्याही म्यां वंदिल्या ॥ भक्तिभावें ॥४९५॥तेथ ओवियें भरुनी अंजुली ॥ श्रीसतगुरुपदीं अर्ध्यदानें अर्पिलीं ॥सोहंपदें जपली गायत्री माता ॥४९६॥झाली संध्या संदेह निरसला ॥ सतगुरु ह्रदयींच प्रगटला ॥ब्रम्हानंद दुमदुमिला ॥ सर्वत्रभर ॥४९७॥नाना दुर्भिक्ष पडलें पृथ्वी वरी ॥ तेणें गांजिलें विश्व भारी ॥म्हणोनी ओवियें अभिषेकला त्रिपुरारी ॥ विश्वपिता ॥४९८॥तो सदद्वैत रूपें प्रकट्ला ॥ सदन्नाचा सुकाळ झाला ॥तेणें द्वैत दुष्काळ लया गेला ॥ विश्व जनाचा ॥४९९॥किंवा श्लोक नव्हती हे ब्राम्हाण ॥ तया ओवियें नमस्कारिलें जाण ॥पंचाशत परिपूर्ण ॥ साष्टांग भावें ॥५००॥येथ मिया काय केलें ॥ श्रीसतगुरुचि ह्रदयांतुनी बोले ॥तेंचि ओवियें लिहिलें ॥ त्यांचें त्यांनीं ॥५०१॥नाम घेतां ग्रासोग्रासीं ॥ तो नर जेविलाची उपवासी ॥तैसाचि मी गोविंद नामा सरसी ॥ अक्रिय जाहलों ॥५०२॥ऐशा हया तीन ओवियें वरती ॥ करूनी आत्मरायाची स्तुति ॥भूतविवेक समाप्ति ॥ होती झाली ॥५०३॥॥ इति श्रीहरिगीते हरीहरराय विरचिते भूतविवेकनाम द्वितीय प्रकरण समाप्तं ॥॥ ॐ तत् सत् - शांति: शांति: शांति: ॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP