मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ६६ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६६ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६६ Translation - भाषांतर एवं श्रुतिविचारात्प्रग्यथा यद्वस्तु भासते ॥विचारेण विपर्योति ततस्तच्चिंत्यतां वियत् ॥६६॥श्रुतिविचाराचे पूर्वीं ॥ आकाशचि सदत्वें दावी ॥जग सत्यत्वा आणवी ॥ मायादेवी ॥३०३॥सुखदु:खाचे सांगडी ॥ पापपुण्याची पुरवडी ॥स्वर्गनरकादी उतरडी ॥ रची मोडी ॥३०४॥नवल इयेचें लाघव ॥ अभावी दाखविला भात्र ॥भावेचि झाली देवी देव सुवधात्रो ॥३०५॥इंद्रभुवन निर्मियेलें ॥ आमृत तेथ एक कल्पियले ॥रंभा उर्वशादि रचियेले ॥ रूपाचे सांगाडे ॥३०६॥बंधमोक्षाच्या दावणो ॥ बांधिलीं जनावरें नाना योनी ॥तेथ अज्ञ सुज्ञ दोनी ॥ एकेचि पाती ॥३०७॥पायीं घालुनी शृंखला ॥ मुक्तपणाचा नांच मांडिला ॥आपणचि देखे आपुली लीला ॥ नानाविव ॥३०८॥क्वचित् एखादा जीव ॥ एथून सुटकेचा करी उपाव ॥तया पुढें सिद्धिची माव ॥ नांचवू लागे ॥३०९॥सुखाचे घेउनि दोरखंड ॥ बांधुनी टाकी दोनी दंड ॥कोणाही जिवाचे बंड ॥ इये पुढें न चाले ॥३१०॥हा हा इये पासोनी जो सोडवी ॥ तयाची किती वर्णावी थोरवी ॥धन्य धन्य हेचि वदवी ॥ वाचा आमुची ॥३११॥अम्हा मूढा साठीं ॥ बोंब मारीत हटोहटी ॥आक्रोशें धांवे उठाउठी ॥ कळवोनी ॥३१२॥तया श्रुति परोती ॥ माउली नाहीं नाहीं त्रिजगती ॥अहिता पासुनी सोडविती ॥ जिवा लागीं ॥३१३॥आम्हीं कैसे बैसावें ॥ कोण उठणी उठावें ॥कैसें जेवावें निजावें ॥ हें ही बोलली ॥३१४॥आम्हीं होऊनी नि:संग ॥ करूं लागलों नाना संग ॥तेथ ही प्रतिपादित सांग ॥ हिताहित ॥३१५॥आमुचीये मळमूत्री ॥ विसर्जनी अहोरात्री ॥ गाथा गाईली पवित्री ॥ त्याज्यात्याज ॥३१६॥आम्हीं कैसें बोलावें ॥ कोण कर्म अचरावें ॥कोण्या रस्त्यानें जावें ॥ आपुलीया ठाईं ॥३१७॥कैसा करावा भोग ॥ कैसा करावा त्याग ॥ विधीनिषधीं सांग ॥ प्रतिपादिलें ॥३१८॥कर्म करुनी अकर्ता ॥ भोग भोगोनी अभोक्ता ॥बोल बोलोनी अवक्ता ॥ कैसें व्हावें ॥३१९॥जीव म्हणजे काय ॥ शीव म्हणजे काय ॥आत्मा म्हणजे काय ॥ हें ही प्रतिपादिलें ॥३२०॥आम्हीं पाऊल टाकावें ॥ तेथ ही हा दिवटा धांवे ॥कां कीं आम्हीं न पडावें ॥ गर्ते माजी ॥३२१॥वैराग्य कैसें करावें ॥ विचार कैसे विवरावे ॥ ज्ञान कैसेनीं ठसावें ॥ आमुचें आम्हां ॥३२२॥संसार म्हणजे मृगजळ ॥ हें ही बोलियेलें प्रांजळ ॥आमुचें सत्य हित निवळ ॥ उघड दावियेलें ॥३२३॥आमुचे अनिवार छंद ॥ माया मोहें झालों धुंद ॥ तेही युक्तीप्रयुक्तीं केले बंद ॥ कृपाळुपणें ॥३२४॥आतां किती इयेशी वर्णावें ॥ सकळ इयेनींच आम्हां दावावें ॥अद्वैत साम्राजीं बैसवावें ॥ इनेची आम्हां ॥३२५॥धन्य धन्य श्रुतिमाता ॥ जिचा बोधकर्णपुटीं ऐकता ॥भवभय माया वार्ता ॥ वाव झाली ॥३२६॥ऐसा जियेचा विचारू ॥ तयावरी बोधी श्रीसद्नरु ॥धन्य धन्य अपरंपारु ॥ उपकार तयाचे ॥३२७॥आम्हीं हेंद्रे जन प्राकृत ॥ नाहीं भाषा ही पुरी संस्कृत ॥परि केलें कृत कृत्य ॥ ईक्षण मात्रें ॥३२८॥श्रुतीजलधींतुनी बहु यत्नें ॥ शोधुनी काढिलीं अमोघ रत्नें ॥आम्हा आर्पियलीं प्रयत्नें ॥ नको नको म्हणतां ॥३२९॥उपनिषद सिद्धांत ॥ दाखविले यथार्थ ॥ आम्हां बनविलें समर्थ ॥ काळाचे ही काळ ॥३३०॥आम्ही मूर्खपणें भांडावें ॥ तरी हंसुनी युक्तीनेंचि बोधावें ॥किती म्हणोनी वर्णावें ॥ वात्सल्य तयांचें ॥३३१॥जयासी सानुकुळ श्रीगुरु ॥ तोचि धन्य धन्य जगती नरु ॥तेणें सकळ हा माया कुंजरू ॥ पायीं रगडिला ॥३३२॥श्रीगुरुचीनी प्रसादें ॥ काय एक न सादे ॥द्वैत साकार द्वंदें ॥ लया जाती ॥३३३॥जयाचेनी कृपाउजिवडे ॥ महेंद्र पदही पावती वेडे ॥वेदघोषही बोलती रेडे ॥ अचुक पणीं ॥३३४॥धन्य धन्य गुरुमाउली ॥ श्रुती प्रत्यक्षचि उभी राहिली ॥आम्हांस करावया सावली ॥ कृपाळुपणें ॥३३५॥आम्हांसी घेऊनी खांदीं ॥ बसविती साम्राजपदीं ॥डंका ठोकोनी देती पदीं ॥ ब्रम्हाचि ब्रम्हा झालें ॥३३६॥गुरु शिष्याच्या भावा ॥ उरोंच न देती ठावा ॥दीपकें वातीचा दिवा ॥ स्पर्शतांचि जैसा ॥३३७॥गुरु शास्त्र आणि आपण ॥ एकचि रूपें झाली गोठण ॥ब्रम्हानंद परिपूर्ण ॥ दुमदुमिला ॥३३८॥आतां वर्णना पुरे करी ॥ श्लोकपद राहिलें दुरी ॥ऐसें बोलियलें अंतरीं ॥ श्रीगुरु माझे ॥३३९॥ऐकोनी तयांचें वचन ॥ आलें गेलेलें भान ॥ “ऐशिया श्रुतिविचारेण” ॥ मुनी जे का बोलिले ॥३४०॥विचारेण या पदावरी ॥ व्याख्या झाली येथवरी ॥श्रोतें कोपावें ना चतुरीं ॥ बोबडया बोला ॥३४१॥आणि कोप तरी कुणावरी करती ॥ तेचि अंतरांतुनी प्रतिपादती ॥मला एक बाहुलें निश्चिती ॥ पुढें केलें ॥३४२॥असो ऐशिया विचारें स्पर्शला ॥ तयानेच मायाकलाप आकर्षिला ॥सद्रूप ब्रम्हाचि झाला ॥ देखदेखतां ॥३४३॥आणि इतरही याच रीती ॥ गगनादि भाव सोडिती ॥वस्तु सद्रूप चिंतिती ॥ निरंतर ॥३४४॥तेही ब्रम्हाचि होती ॥ नाना विपरीत भाव त्यागिती ॥श्रुतिविचारें लाभतीं ॥ आपआपणा ॥३४५॥श्रुति गुरुवरी नाहीं विश्वास ॥ तया येथचि नरक वास ॥कोण वर्णी आपदांस ॥ तयांच्या त्या ॥३४६॥म्हणोनिया निरंतर ॥ ब्रम्हाविचारेंच भरावें अंतर ॥शास्त्र गुरुवरी विश्वास थोर ॥ असों द्यावा ॥३४७॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP