मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ३० ते ३३ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ३० ते ३३ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ३० ते ३३ Translation - भाषांतर भगवत्पूज्यपादाश्च शुष्कतर्कपटूनमून् ॥आहुर्माध्यामिकान् भ्रांतानचिंत्यऽस्मिन्सदात्मनि ॥३०॥सद्दस्तुचे ठाईं ॥ विपरीत कल्पिती जे कांहीं ॥तया भ्रांताचें नांवही ॥ घेऊं नये ॥१३८॥ते आपणचि ना बुडती ॥ इतरांसी घेती सांगाती ॥म्हणोनी आचार्य दूषीती ॥ तया लागीं ॥१३९॥अनाद्दत्य श्रुतिं मौर्ख्यात्तदिमे बौद्धास्तमस्विन: ॥आपेदिरे निरात्मत्वमनुमानैकचक्षुष: ॥३१॥माध्यामिक बौद्धादिक ॥ श्रुती अनादरुनी मूर्ख ॥इंद्रियें अनुमानिती देख ॥ निरात्मत्व ॥१३०॥म्हणती शून्थच पूर्वीं होतें ॥ तया पासुनी हीं पंच महाभूतें ॥सृष्टी झाले निर्मिते ॥ संयोग बळें ॥१४१॥प्रलय होतां अंतीं ॥ शून्यची सकल होती ॥पुन्हा तेथोनीच उद्भवती ॥ आपोआप ॥१४२॥एवं आदी आणि अंतीं ॥ शून्यचि आहे निश्चिती ॥ ऐसें जे का बोलती ॥ तया दूषती ॥१४३॥शून्यमासीदिति ब्रूषे सद्योगं वा सदात्मताम् ॥शून्यस्य न तु तद्युक्तमुभयं व्याहतत्वत: ॥३२॥न युक्तस्तमसा सूर्यो नापिचासौ तमोमय: ॥सच्छून्ययोर्विरोधित्वाच्छून्यमासीत्कथं वद ॥३३॥तूं पूर्वीं शून्य होतें ऐसें बोलसी ॥ तरी तया कोण सत्ता लाविसी ॥कां तेंचि स्वत: विराजसी ॥ सद्रूपत्वें ॥१४४॥दोन्ही ही तुझ्या पक्षीं ॥ सतचि लाविसी साक्षी ॥परिहे विरुद्ध पणा लक्षी ॥ हेंही तुज नकळे ॥१४५॥सूर्य आंधारें झाला युक्त ॥ किंवा तमोमयचि निश्चित ॥हे दोन्ही बोल भ्रांत ॥ जियापरी ॥१४६॥तैसें शून्य विरोधी असतां ॥ कैसी लाविसी सद्रूप सत्ता ॥सरूपचि शून्य म्हणतां ॥ शून्यता कैसी ॥१४७॥शून्याशीं शून्य कोणी म्हणावें ॥ शून्येची शून्या कैसें प्रकाशावें ॥नामरूपातें भावावें ॥ कवणें कवणा ॥१४८॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP