महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ७१ ते ७५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


जातिव्यक्ती देहिदेहौ गुणद्रव्ये यथा पृथक् ॥
वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोऽत्र विस्मय: ॥७१॥

सामान्यपणें असे जाती ॥ परि विशेष भेद दिसे व्यक्ति ॥
देह आणि देहचालक निश्चिती ॥ एक नव्हती ॥३६७॥
जैसे का द्रव्य आणि गुण ॥ दिसे विचारे पृथकपणा ॥
तैसेंचि आकाश आणि सत् जाण ॥ ष्टथक् भासती ॥३६८॥
गुळ आणि गुळाची गोडी ॥ सुवास आणि कंर्पुर वडी ॥
नाना वस्त्र आणि तयाची घडी ॥ एक नव्हती ॥३६९॥
तैसेंच वियत् आणि सत् ॥ बुद्धि भेद असे निवडत ॥
यांत मवल वाटत ॥ काय तुजला ॥३७०॥

बुद्धोऽपि भेदो नो चित्ते निरूढिं याति चेत्तदा ॥
अनेकाग्र्यात्संशयाद्वा रूढयभावोऽस्य ते वद ॥७२॥

वादी - ऐसा भेद तुम्हीं म्हणतां ॥ परि तो चित्तीं आरूढ नोह तत्वतां ॥
बुद्धि निश्चयें निश्चय करितां ॥ चित्त व्याकुळे ॥३७१॥
सि० - चित्तीं आरूढ न होये ॥ तें अनेकाग्रें का संशयें ॥
हया दोहीं पैकीं कारण होये ॥ कोणतें सांग ॥३७२॥

अप्रमत्तो भव ध्यानादाद्येऽन्यस्मिन्विवेचनम् ॥
कुरु प्रमाणयुक्तिभ्यां ततो रूढतमो भवेत् ॥७३॥

प्रथम अनेकाग्रचि म्हणसी ॥ तरि तें ध्यानें करावैं निश्चयासी ॥
द्वितीय संशय प्रतिपादिसी ॥ तरि तो प्रमाणयुक्तिं दवडावा ॥३७३॥
करितां सद्वस्तुचें ध्यान ॥ चितचि होईल चैतन्य ॥
मग तेथें नसे भान ॥ अन्य वस्तुचें ॥३७४॥
सत अन्य वस्तु नाहीं ॥ ऐसें प्रमाणा आलें पाहीं ॥
श्रुति स्मृति पाहीं ॥ हेंचि प्रतिपादिती ॥३७५॥
घनदाट वस्तुचे ठाईं ॥ अवकाशाचा रिगचि नाहीं ॥
युक्ति चित्तें चिंतुनी पाहीं ॥ सकल कांहीं ॥३७६॥
आपणा मध्यें अवकाश ॥ कोठें राहिल सावकाश ॥
अनुभवें तूंचि पाहिं आपणास ॥ विवरोनियां ॥३७७॥
येणें येणें प्रकारें ॥ चित्तीं आरूढेल सारें ॥
गुरू शास्त्र आत्मविचारें ॥ सकल कळे ॥३७८॥

ध्यानान्मानाद्युक्तितोऽपि रूढे भेदे वियत्सतो: ॥
न कदाचिद्वियत्सत्यं सद्वस्तुच्छिद्रवन्न च ॥७४॥

ध्यानें मानें युक्तिं ॥ भेद दिसेल वियत् सतीं ॥
कांकीं सत् असत असती ॥ कैसें एक ॥३७९॥
वादी - असो एक बरें झालें ॥ वियत् विजातीय भेद पावलें ॥
तुमचे बोल व्यर्थ झाले ॥ सत् भेद रहित म्हणोनी ॥३८०॥
सि० - सत् विजातीय असत् ॥ तें आहे म्हणसी हाचि व्याघात ॥
मुळींच झालें नाहीं नाहीं वियत् ॥ वाटे ती भ्रांती ॥३८१॥
ती भ्रांती ही जावया ॥ बुद्धि आरूढ होवावया ॥
पडला वळसा मुनिवर्या ॥ आम्हां साठीं ॥३८२॥
जड जीवाचे कळवळे ॥ नाना यत्नें बोध केले ॥
धन्यधन्यम्हणोनी पाउलें ॥ सदा वंदावीं ॥३८३॥
तात्पर्य आकाशवत नव्हे वस्तु ॥ घन सर्वत्र वोतप्रोतु ॥
कैंची बुद्धि जाणें तयाची मातु ॥ भेदाभेंदी ॥३८४॥

ज्ञस्य भाति सदा व्योम निस्तत्त्वोल्लेखपूर्वकं ॥
सद्वस्त्वपि बिभात्यस्य निश्छिद्रत्वपुर: सरम् ॥७५॥

ज्ञाता हेंचि सदा जाणें ॥ आकाश निस्तत्व म्हणे ॥
सतचितत्व विवरणें ॥ एकलें असें ॥३८५॥
निच्छिद्र सद्वस्तु असे ॥ तेथ कशाचा ही शिरकाव नसे ॥
माया भ्रमें जें जें भासें ॥ तें तें मिथ्या ॥३८६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP