महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ५८ ते ५९

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


निरंशेऽप्यंशमारोप्य कृत्स्नेंशे वेति पृच्छत: ॥
तद्भाषयोत्तरं ब्रूते श्रुति: श्रोतृहितैषिणी ॥५८॥

इहीं सकल ही आरोप केला ॥ किंवा सत्यांश असे सद्वस्तुला ॥
मायादेवीच्या सकल हया लीला ॥ कोठे राहव्या ॥२५७॥
स० - तूं बोलिलासी जीं प्रमाणें ॥ ती आम्हास ही भाग मानणें ॥
परि श्रुति ह्रद्रत न जाणणें ॥ हें काई ॥२५८॥
बाला लागलसे छंद ॥ तो एकाकीं न करवे बंद ॥
बागुल आला गेला हा मिथ्या वाद ॥ बोलावा लागे ॥२५९॥
तैशीच अथ्यारोप अपवाद श्रुति ॥ बोलून गेली सृष्टी उत्पत्ती ॥
शेवटीं सकळ ही माया निश्चिती ॥ होंचि प्रतिपादिलें ॥२६०॥
माया म्हणजे कांहीं नाहीं ॥ तें झालें आहे हयाचा वाद काई ॥
परि मूर्ख तये ठांई ॥ वादा प्रवर्तले ॥२६१॥
तयांचा वाद तुटावा ॥ सद्बोध चित्तीं आरूढावा ॥
म्हणोनी श्रुति स्मृति धांवा ॥ मारूं लागल्या ॥२६२॥
तुम्हासी सांगू गेले स्वप्न ॥ तेथें कैचें अनुसंधान ॥
कोठेंशंका समाधान ॥ करावें लागे ॥२६३॥
कानाशी गोड वाटावें ॥ संषय सकळही फिटावे ॥
ऐसे गुप्त धरुनि अंतरीं ठेवे ॥ श्रुति स्मृती बोलल्या ॥२६४॥
माया मुळीच नाहीं म्हणतां ॥ उद्वेग वाटेल तुमचे चित्ता ॥
म्हणोनी एकदेशीय सत्ता ॥ प्रतिपादिली ॥२६५॥
परमात्मा याच रीती ॥ अर्जुनाप्रति बोधिती ॥
“एकांशेन” जगत स्थिती ॥ म्हणजे मुळींच नाहीं ॥२६६॥
“नासतो विद्यते भाव” इत्यादि ॥ बोलिले सिद्धांत आदी ॥
परि तेथ अर्जुनाची बुद्धी ॥ कोती पाहिली ॥२६७॥
म्हणोनी घेतला वळसा ॥ सप्तशत श्लोकमात्रीय रसा ॥
तेव्हां “नष्टो मोह:स्मृतिर्लब्धा” या सरसा ॥ वाक्या अर्जुन बोलिला ॥२६८॥
मुळींच कांहीं नाहीं म्हणावें ॥ तें कोणें कैसें प्रतिपादावें ॥
म्हणोनी मायामय हें अघवे ॥ श्रुति कल्पित्या झाल्या ॥२६९॥
त्याही कल्पना निराधार ॥ होती हयणोनी सदंश आधार ॥
घेउनी बोलियल्या सार ॥ सदैव इत्यादिना ॥२७०॥

सत्तत्त्वमाश्रिता शक्ति: कल्पयेतसति विक्रिया: ॥
वर्णा भित्तिगता भित्तौ चित्रं नानाविथं तधा ॥५९॥

जैसें कां भिंती वरती ॥ रंगें नाना चित्रें उमटती ॥
तैशीच ही चिच्छक्ति ॥ विकारली जगती ॥२७१॥
पर्वत नदी डोंगर ॥ वर्णचि दिसती नानाकार ॥
तैसीच ही मायादेवी साकार ॥ एकलीच विलसे ॥२७२॥
तियैचा अभासभासु ॥ सद्वस्तु वरती विलासु ॥
कैसा झाला सावकाशु ॥ तोही सांगू ॥२७३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP