महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ४१ ते ४४

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


ननु भूम्यादिकं माभूत्परमाण्वंतनाशत: ॥
कथं तें वियतोऽसत्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥४१॥

शं० - निरंश सदवस्तु नित्य ॥ सदा सर्वदा नाश रहित ॥
आकाश ही तैसेंचिसत ॥ कां न मानितां ॥१९२॥
भौम्यादिकांचे परमाणु असती ॥ त्याचा नाश संभवतो जगतीं ॥
तैसे आकाशीं मुळींच नसती ॥ मग त्या कां उपेक्षीतां ॥१९३॥
आकाश कधीं नाहींसे झालें ॥ ऐसें कोणी देखिलें ना ऐकिलें ॥
मग सद्वस्तुच हें संचलें ॥ ऐसें बोला ॥१९४॥

अत्यंतं निर्जगव्द्योम यथाते बुद्धिमाश्रितम् ॥
तथैव सन्निराकाशं कुतो नाश्रियते मतिम् ॥४२॥
निर्जगब्द्योम द्दष्टं चेत्प्रकाशतमसी विना ॥
क्व द्दष्टं किं च ते पक्षे न प्रत्यक्षं वियत्खलु ॥४३॥

स० - तुझे बोल आम्हास मानवते ॥ परि आकाश बुद्धि आरूढ होते ॥
बुद्धिमध्यें येते आणि जाते ॥ इतरा सारिखे ॥१९५॥
बुद्धीचेनी प्रकाशें ॥ जयाचें आस्तित्व आम्हा भासे ॥
येर्‍हवी कईंही न उल्हासे ॥ आपेआप ॥१९६॥
प्रकाश तमा वांचून ॥ जयाचें आस्तित्वही नये प्रमाण ॥
तया सद्वस्तु तूं म्हण ॥ आम्ही न म्हणू ॥१९७॥
खपुष्पाच्या माळा ॥ सुखें घाली वांझपुत्राचे गळां ॥
नाना मृगजळींच्या कासवीला ॥ दुग्धवती म्हण ॥१९८॥
तैशी नोहे सद्वस्तु ॥ बुद्धिच्या कघींच नोहे गृहा आतु ॥
बुद्धी तयाची मातु ॥ कधींही न जाणे ॥१९९॥
कोण्याही प्रकाशें ॥ वस्तुचें आस्तित्व न भासे ॥
प्रमाण नहोय सरिसें ॥ जयाच्या प्रमाणा ॥२००॥
वादि - ऐशी कधीं नये प्रमाणा ॥ तयाशीं शून्य ऐसें म्हणा ॥
बुद्धी गृहाक नये जाणा ॥ तया आस्तित्व कैचें ॥२०१॥
समा० - अरे जयाचेनी प्रमाणें ॥ प्रमाणा प्रमाणत्व येणें ॥
तयासी अप्रमाण कोण म्हणे ॥ बुद्धीमंत ॥२०२॥
जयाचेनी प्रकाशें ॥ बुद्धीअस्तित्व अभासे ॥
तया अस्तित्वाचे वानिवसे ॥ मानसीं काई ॥२०३॥

सद्वस्तु शुद्धं त्वस्माभिर्निश्चितैरनुभूयते ॥
तुष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेश्च वर्जनात् ॥४४॥

सकल ही वस्तु अशुद्ध ॥ जयाचा बुद्धीशीं होतसे संबंध ॥
बुद्धी आश्रया विण एकही सिद्ध ॥ हौं न शके ॥२०४॥
तैशी नोहे सद्वस्तु ॥ कोणाचे संबंधें विण असतु ॥
अनुभवत्याविण अनुभवतु ॥ शूद्धपणें ॥२०५॥
इतर कोणाही वस्तूचा ॥ अनुभव न येतां साचा ॥
पद्धे वळसा शून्याचा ॥ अभाव रूपी ॥२०६॥
तैसी सद्वस्तु नोहे ॥ प्रतीतीमात्रचि जी आहे ॥
कधींही शून्य नोहे ॥ स्वयंप्रभ ॥२०७॥
शून्याची ही प्रतीती ॥ बुद्धी घेतसे निश्चिती ॥
तैशी नोहे वस्तु स्थिती ॥ बुद्धी अग्राहय ॥२०८॥
शुद्ध निर्मल वस्तु असे ॥ स्वयंप्रभोनीच प्रकाशे ॥
आपणचि आपण उल्हासे ॥ आपुलेपणे ॥२०९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP