महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ८६ ते ९०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


सद्वस्तु ब्रम्हा शिष्टोंऽशो वायुर्मिथ्या यथावियत् ॥
वासयित्वा चिरं वायोर्मिथ्यात्वं मरुतं त्यजेत् ॥८६॥

वायु मधील सदंश काढितां ॥ शिष्टांश राहे जी वायु रूपता ॥
ती निस्तत्व आकाशवत तत्वता ॥ मिथ्या असे ॥४१२॥
म्हणोनी बुद्धीनें ती टाकावी ॥ ब्रम्हासत्ताचि आदरावी ॥
फळ घेऊनी सांडावी ॥ फलकटें जैसी ॥४१३॥
सारासार विचार करावा ॥ वायू असार म्हणोनी सांडावा ॥
बुद्धीला सत्यत्वाचा गोवा ॥ कधीं ही न पडावा ॥१४१॥
वादी - असार रूपेंची वायू असे ॥ बुद्धी ही ते ग्रहण करीतसे ॥
मग तया मिथ्यत्व कैसें ॥ येतें सांगा ॥४१५॥
सि० - अरे असार म्हणजे सत् ॥ कां तूं मानिशी असत् ॥
सत म्हणतां दोष येत ॥ असार पणाला ॥४१६॥
बरें असत म्हणसी ॥ तरी तूंची मिथ्या बोलसी ॥
मग आम्हां काय विचारशी ॥ यथात्व त्याचें ॥४१७॥
मृगजळासी म्हणतां जल ॥ कोण पिऊनी झाला शीतल ॥
तैसेंची हे तुझे बोल ॥ बुद्धि आग्राहय ॥४१८॥
एवं हेंचि सिद्ध झालें ॥ वायूला मिथ्यात्व आलें ॥
तेंचि बुद्धिनें पाहिजे घेतलें ॥ विचार निरंतर ॥४१९॥

चिंतयेद्वन्हिमप्येवं मरुतोन्यूनवर्तिनम् ॥
ब्रम्हांडावरणेष्वेषा न्यूनाधिकविवारणा ॥८७॥

ऐसेंचीं वन्हीचें रूप असें ॥ विचारें पहातां भिथ्या दिसें ॥
जें वायूच्या एकदेशीं असें ॥ ब्रम्हांडाभितरी ॥४२०॥
न्यूनाधिक विचारणा ॥ करितां येईल सकल ध्याना ॥
ही सकल ब्रम्हांड रचना कैशी जाहली ॥४२१॥
ब्रम्हांडा भोंवतालीं ॥ एकेक भूतांचीं आवरणें झालीं ॥
तीं प्रमाणें पाहिजे पाहिलीं ॥ विचार करूनी ॥४२२॥

वायोर्दशांशतोन्यूनो वन्हिर्वायौ प्रकल्पित: ॥
पुराणोक्तं तारतम्यं दशांशैर्भूतपंचके ॥८८॥

वायूच्या द्शांश न्य़ून ॥ वन्हितत्व असे जाण ॥
हें सकलही प्रमाण ॥ पुराणीं पहावें ॥४२३॥
भागवतीं पंचमस्कंदीं ॥ व्यासोक्ती हेंची प्रतिपादी ॥
तें सकळही तारतम्य बुद्धि ॥ घ्यावें भूतपंचकीं ॥४२४॥

वन्हिरुष्ण: प्रकाशात्मा पूर्वानुगतिरत्र च ॥
अस्तिवन्हि: स निस्तत्त्व: शब्दवान् स्पर्शवानपि ॥८९॥

उष्ण प्रकाश रूप वन्ही असे ॥ तेथें सत्ता अस्तित्वें विलसे ॥
तीं काढितां निस्तत्व रुप दिसें ॥ शब्द स्पर्श ॥४२५॥
शब्द स्पर्श हे दोन्ही धर्म ॥ आकाश वायूचे पुर्वोनुक्तम ॥
निस्तत्व रूप माया परम ॥ सत्ता परब्रम्हाची ॥४२६॥

सन्मायाव्योमवाय्वंशैर्युक्तस्याग्नेर्निजो गुण: ॥
रूपं तत्र सत: सर्वमन्यद्बुद्धया विविच्यताम् ॥९०॥

हे सकलही धर्म वेगळे करितां ॥ वन्हीचा धर्म राहे रुपता ॥
तो सत्तेवांचून निस्तत्वता ॥ म्हणोनि त्यागावा ॥४२७॥
पुर्वानुक्रचें करूनी ॥ बुद्धिनें सकल विवंचोनी ॥
मिथ्यारूप असे वन्ही ॥ म्हणोनी त्यागावा ॥४२८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP