महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ७६ ते ८०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.


वासनायां प्रवृद्धायां वियत्सत्यत्ववादिनम् ॥
सन्मात्राबोधयुक्तं च द्दष्ट्वा विस्मयते बुध: ॥७६॥

वादी - बरें वियत् असत् ठरलें ॥ तुमचें सतचि सर्वत भरलें ॥
तरि आकाशीं सत्यत्व मानिलें ॥ तेणें काय होतें ॥३८७॥
सि० - ज्ञात्याचे समे माझारि ॥ मूर्खपणा येतो आंगावरी ॥
विस्मय करिती वरचे वरी ॥ मूढ म्हणोनी ॥३८८॥
आपणचि आपणा भुलला ॥ त्याला किती म्हणावा खुळा ॥
वासनाविशिष्ट जीवाला ॥ सद्बोधकैंचा ॥३८९॥
म्हणोनी सज्जन तिरस्कारिती ॥ बाल जाणूनी तुच्छमानिती ॥
स्मृती शास्त्रेंही डावलती ॥ द्विपदपशु म्हणोनी ॥३९०॥

एवमाकाशमिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते ॥
न्यायेनानेन वाय्वादे: सद्वस्तु प्रविविच्यताम् ॥७७॥

एवं ऐसें झालें सिद्ध ॥ तुटला सकलही वाद ॥
सत सत्य निर्विवाद ॥ आकाश मिथ्या ॥३९१॥
येणेंचि न्यायें करून ॥ वाय्वादिकांचें करावें विवरण ॥
सत् असत् निवडोन ॥ सतचि घ्यावे ॥३९२॥

सद्वस्तुन्येकदेशस्था माया तत्रैकदेशगम् ॥
वियत्तत्राप्येकदेशगतो वायु: प्रकल्पित: ॥७८॥

सद्वस्तुचे एकदेशीं ॥ माया आहे ऐसें जरि मानसी ॥
तरी तियेच्या ही एकदेशीं ॥ वियत् असे ॥३९३॥
तया वियताचे एकदेशीं ॥ वायु कल्पनाये जन्मासी ॥
एवं परंपर भूताशीं ॥ संबंध असे ॥३९४॥
परंपरेच्याही संबंधें ॥ सद्वस्तु कधींही न बाधे ॥
येच विषयीं प्रतिपादे ॥ मुनिवर्य पुढारी ॥३९५॥

शोषस्पर्शौ गतिर्वेगो वायुधर्मा इमेमता: ॥
त्रय:स्वभावा: सन्मायाव्योम्नां ये तेऽपि वायुगा: ॥७९॥

शोष, स्पर्श, वेग, गति ॥ हे वायुचे धर्म असती ॥
जे निरंतर राहती ॥ तया जवळी ॥३९६॥
सत्ता माया आणि आकाश ॥ हयाही त्रय धरी स्वभावास ॥
ते ही दाऊं प्रत्ययास ॥ पूढारी आतां ॥३९७॥

वायुरस्तीति सद्भाव: सतो वायौ पृथक्कृते ॥
निस्तत्त्वरूपता मायास्वभावो व्योमगो ध्वनि: ॥८०॥

वायुचा जो अस्तित्व भाव ॥ तोचि सत्तेचा स्वभाव ॥
तो पृथक्क केलियाही वाव ॥ वायु निस्तत्व ॥३९८॥
निस्तत्व स्वभाव मायेचा ॥ ध्वनि तो आकाशाचा ॥
एवं त्रय स्वभाव गुणाचा ॥ वायु झाला ॥३९९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP