मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ६३ ते ६५ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६३ ते ६५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६३ ते ६५ Translation - भाषांतर या शक्ति: कल्पयेव्द्योम सा सव्द्योम्नोरभिन्नताम् ॥आपाद्य धर्मधर्मित्वं व्यत्ययेनावकल्पयेत् ॥६३॥प्रथम मायें आकाश कल्पिलें ॥ परि तें सदभिन्नत्व नाहीं दिसूंदिलें ॥पश्चात् धर्मधर्मित्व भासविलें ॥ तईंच वैपरित्वें ॥२८५॥तेणें आकाशाचे ठाईं आलें ॥ सत्ता भान पहिलें ॥ सत् ऐसें नांव दिलें ॥ वस्तु लागीं ॥२८६॥सतो व्योमत्वमपन्नं व्योम्न: सत्तां तु लौकिका: ॥तार्किकाश्चावगच्छंति मायाया उचितं हि तत् ॥६४॥जैसा कां मृत्तिकेचा घट केला ॥ तो मातीपणा नाहीं सुटला ॥तैसेंचि या आकाशाला ॥ सदत्व न सुटे ॥२८७॥ म्हणोनी सतची झालें आकाश ॥ ऐसा भासविला भास ॥ निर्रावकाशी अवकाश ॥ धर्म लाविला ॥२८८॥आकाशीं सदत्व आणलें ॥ सदत्वीं आकाश कल्पिलें ॥ऐसे मांडले घोटाळे ॥ नानाविव ॥२८९॥तार्किकादि मत सिद्धांती ॥ येथेंच भांबाऊती पडती ॥आकाश सद्रूपचि मानिती ॥ माया योगें ॥२९०॥वादी० - अन्याची प्रतिती अन्य ॥ हें कैसें न्याया होईल मान्य ॥बरें प्रतिती ही उपपन्न ॥ कैसी होते ॥२९१॥स० - अरे माया हेचि उचित ॥ तेथ कैचा न्यायसिद्धांत ॥न्यायासी जी विरुद्व येत ॥ तीच माया ॥२९२॥भ्रामक दाखवी प्रतीति ॥ अन्याची अन्यावर भ्रांती ॥जग भ्रमविलें याच रीती ॥ नाना मोहें ॥२९३॥यद्यथा वर्तत तस्य तथात्वं भाति मानत: ॥अन्यथात्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सार्वलौकिक: ॥६५॥जें जैसें आहे वर्तत ॥ तें तैसेंचि जरी दिसत ॥तरी तें यथार्थ वाटत ॥ जैसेंच्या तैसें ॥२९४॥वस्तु एक असावी ॥ ती भ्रमें भलतीच दिसावी ॥ ती अयथार्थ जाणावी ॥ समज तयाची ॥२९५॥जैसें कां शुक्तिकेवरी ॥ रजताची भासली लकेरी ॥भ्रांत्या प्रतीती आली खरी ॥ अन्यथात्व ॥२९६॥नाना स्थाणुवरी पुरुष ॥ रज्जू वरी सर्पाभास ॥ येच रीती माया प्रतीतीस ॥ लोकीं येते ॥२९७॥हें दिसें ऐसेंचि जरी असे ॥ तरी मृगजळाचेनी वोलांसे ॥बिजारोपण करती माणसें ॥ भूमीचे ठाईं ॥२९८॥एवं ऐशीच हो प्रतीती ॥ मायादेवीची हीच नीती ॥ तेथ शंका समाधान दोन्हीही भ्रांति ॥ जाणावी बापा ॥२९९॥भ्रमेंचि आकाश दिसलें ॥ भ्रमेंचि देव मानिलें ॥भ्रमेंचि सकळ कल्पियलें ॥ सृष्टीजात ॥३००॥एवं “भ्रममूलमिदं जगत” ऐसाचि आहे सिद्धांत ॥तेथें च रमताती भ्रांत ॥ माया योगें ॥३०१॥येथोनी कैसेनी सुटावें ॥ ऐसें जरि विचारसी मनोभावें ॥तरी तेंचि आतां सांगतों ऐकावें ॥ एकाग्र करूनी ॥३०२॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP