महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६० ते ६२

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


आद्यो विकार आकाश: सोऽवकाश: स्वरूपवान् ॥
आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेप्युनुगच्छति ॥६०॥

निर्विकारी झाला विकार ॥ तोही झाला निराकार ॥
पोकळपणाचा आकार ॥ अवकाश घनी ॥२७४॥
हीच मूळ कल्पना ॥ आकाशाची झाली भावना ॥
सत्ता विशेष गुणा ॥ उद्भवली ॥२७५॥
येर्‍हवीं पहातां आकाश ॥ स्वरूपाकारच वाटे भास ॥
परि गुणा झाला अवकास ॥ पोकळ पणें ॥२७६॥

एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावक: ॥
नावकाश: सति योम्नि स चेषोऽपिद्वयं स्थितम् ॥६१॥

सद्वस्तुच्या ठाईं ॥ अवकांश मुळींच नाहीं ॥
तें सदस्वभावें असे पाही ॥ एकलें एक ॥२७७॥
परि आकाशीं द्वय स्वभाव ॥ सत्ताविशेष अवकाश ठाव ॥
मायादेवीचा प्रभाव ॥ येथून वाढला ॥२७८॥

यद्वा प्रतिध्वनिर्व्योम्नो गुणौ नासौ सतीक्ष्यते ॥
व्योम्नि द्वौ सध्द्वनी तेन सदेकं द्विगुणं वियत् ॥६२॥

सद्वस्तुचे ठाईं ॥ “सत्” हाही शद्ब नाहीं ॥
अवकाश होतांचि आला पाही ॥ प्रतिध्वनी ॥२७९॥
सतला सत् कोणी म्हणावें ॥ तें असें एकलें स्वभावें ॥
अवकाश होतांची संभवें ॥ सत् शद्ब ॥२८०॥
म्हणोनी द्विगूण आकाश झालें ॥ तेणेंचि सद्वस्तु एक गुणी म्हटलें ॥
येर्‍हवीं गुणातीत वस्तु संचलें ॥ जैशाचें तैसें ॥२८१॥
वांझेला मुलगा नाहीं झाला ॥ परि झाला ऐसाचि कल्पिला ॥
मग सुखें ऐका बाललीला ॥ एकेक त्याच्या ॥२८२॥
तैसाचि हा माया विलासु ॥ सुखें ऐका सावकाशु ॥
श्रुत्यादिकांना अवकाशु ॥ बरा फावला ॥२८३॥
श्रुति प्रमाणा आल्या ॥ स्मृत्यादिकीं. बाहया उभारल्या ॥
मायादेवी शृंगारल्या ॥ पुत्रोत्साहें ॥२८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP