मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ६७ ते ७० महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६७ ते ७० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६७ ते ७० Translation - भाषांतर भिन्ने वियत्सती शब्दभेदाद्वद्धेश्च भेदत: ॥वाय्वादिष्वनुवृत्तंसन्नतु व्योमेति भेदधी: ॥६७॥सत् आणि वियत् शब्दिं ॥ वसे निरंतर भेद बुद्धि ॥ययाचें कारण आधिं ॥ परिस आतां ॥३४८॥मुळीं शब्दीं पृथकपणा ॥ विपर्यास असे जाणा ॥मग अर्थाचे ठिकाणा ॥ शोध घेऊं ॥३४९॥विकल्पनेन जें सत् ॥ तया म्हणती वियत् ॥कांकीं सत्ता प्रतिपादित ॥ न होय जेथ ॥३५०॥जैशी पृथ्वीदिकांचे ठाईं ॥ सत्ता अस्तित्व वाटे पाहीं ॥तैशी आकाशीं नाहीं ॥ बुद्धि ग्राहय ॥३५१॥पृथ्वी आहे पाणी आहे ॥ तेज आहे वायु आहे ॥तैशा परी आकाश नोहे ॥ ऐसें वाटतें बुद्धी ॥३५२॥तीच जाणावी भेदबुद्धि ॥ राहतें वियत् सत् शब्दीं ॥ जैपा का नद नदी ॥ लिंग भेद ॥३५३॥सद्वस्त्वधिकवृत्तित्वाद्धर्मि व्योम्नस्तु धर्मता ॥धिया सत: पृथक्कारे ब्रूहि व्योम किपात्मकम् ॥६८॥सद्वस्तुचेनी आधारें ॥ सकल ही सृष्टी वावरे ॥ येर्हवीं तया पृथक्कारें ॥ सत्ता नाहीं ॥३५४॥म्हणोनी सदसत विशेषें ॥ बाकीचा किंचित अभास भासे ॥सता धर्मित्व असे ॥ इतरां धर्मता ॥३५५॥धर्म धर्मि वांचून ॥ न राहे एकही क्षण ॥ तैसेंची आकाश ही जाण ॥ कैसें राहतें ॥३५६॥वादी - मृत्तिके वांचूनी घट नाहीं ॥ तेथ धर्मि मृतिकाच पाहीं ॥परि तो निराळा रूपें राही ॥ तैसें आकाश कां नसावें ॥३५७॥सि० - अरे सद्वस्तु वांचून ॥ बुद्धि काय करी आकाश वर्णन ॥ कोणतें तयाचें विलक्षण ॥ रूप असे ॥३५८॥अवकाशात्मकं तच्चेदसत्तदिति चिंत्यताम् ॥भिन्नं सतोऽसच्च नेति वक्षि चेव्द्याहतिस्तव ॥६९॥जरी तूं अवकाशात्मक म्हणसी ॥ तरि तें सतचि विलासविसी ॥सत् विलक्षण प्रतिपादिसी ॥ कोणे रिती ॥३५९॥सत् विलक्षण असे असत् ॥ तेंचि म्हणसी तरी होतो व्यावात ॥जन्मांध सूर्य प्रकाश पाहव ॥ हें का जैसें ॥३६०॥आकाशाची करशी खोळी ॥ मृगजळ भरिसी आंजळी ॥नाना गंधर्व नगराचे राउळीं ॥ बागुला बैसवीसी ॥३६१॥सत् विलक्षण आकाश ॥ कोणे रीती करसी भास ॥जीभ नाहीं मला म्हणतां दोष ॥ वदतांचि असे ॥३६२॥भातीतिचेद्भातु नाम भूषणं मायिकस्य तत् ॥यदसद्भासमानं तन्मिथ्या स्वप्नगजादिवत् ॥७०॥वादी - मग असत्वाचे ठाईं ॥ भान तरी कैसें राही ॥परि येथें राहतें हे प्रत्ययीं ॥ येतें आमुच्या ॥३६३॥सि० - स्वप्नीं गजादि पहासी ॥ जागृतीं भानही असे तुजसी ॥तरी का सत्यत्व आणसी तया लागीं ॥३६४॥तें जैसें का असत् ॥ तैसेंची हें सकल जगत ॥ मायोपाधी भासत ॥ सत मिथ्यत्वें ॥३६५॥माया हेंचि असे उचित ॥ मिथ्या सत्यत्वें दावीत ॥हें सकल ही प्रतिपादित ॥ मागें केलें ॥३६६॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP