मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक १७ ते १९ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १७ ते १९ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक १७ ते १९ Translation - भाषांतर स्पष्टशब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् ॥अक्षादावपितच्छास्त्रयुक्तिभ्यामवधार्यताम् ॥१७॥शब्दादि युक्ती करून ॥ भौतीक स्पष्ट केलें जाण ॥कोणतीहीवस्तु निर्माण ॥ भूत कार्यीं वसे ॥६४॥घेउनी शास्त्राचें प्रमाण ॥ इंद्रियें कार्यासहित कथलीं जाण ॥“अन्नमयंहि सौम्य मन” ॥ इत्यादि वाक्यें ॥६५॥आदी मध्य अंती ॥ एकचि आत्मा निश्चिती ॥हेही झाली स्पष्टोक्ती ॥ अन्वय व्यतिरेकें ॥६६॥जैसे मृत्तिका कार्य घत होत ॥ आदी मध्य अंतीं माती असत ॥तैसेंच हया भौक्तिकीं वसत ॥ आत्मतत्व ॥६७॥“षोडशकला सौम्य पुरुष” इति ॥ बोलियली छांदोग्य श्रुति ॥ तीच केली स्पष्टोक्ती ॥ शास्त्रयुक्ति ॥६८॥एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेंणाप्यवगम्यते ॥यावत्किंचिद्भवेदेतदिदं शब्दोदितंजगत् ॥१८॥“सदैव सोम्येदमग्र आसीत” ॥ इत्यादि श्रुति सिद्धांत ॥तेचि अद्वैत ब्रम्हा प्रतिपादित ॥ युक्ती केलें ॥६९॥भूत भौतिक सृष्टी ॥ एकलाची करी परमेष्टी ॥तयाची ही हातवटी ॥ दाखविली ॥७०॥एकादश इंद्रियें कडुन ॥ किंवा शास्त्र युक्ती लढऊन ॥हेंचि केलें प्रतिपादन ॥ अद्वैत ब्रम्हा ॥७१॥इदं ही सकल जंगत ॥ ऐसे झाले प्रतिपादित ॥तेंचि करावया पूरीत ॥ प्रमाण बोले ॥७२॥इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवाद्वितीयकम् ॥सदेवासी न्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वच: ॥१९॥अरुण पुत्र उद्दालक ॥ ऐसेंच बोलिला सम्यक ॥नामरूपादी भासक ॥ सद्ववस्तुति असे ॥७२॥साखरेचें केलें वृंदावन ॥ तैं कायेतें कहवटपण ॥नामरूप भासोनी भिन्न ॥ साखरची तें ॥७३॥तैसेंची हें जगत ॥ नामरूपीं भिन्न दिसत ॥ परीअसे एक अद्वैत ॥ ब्रम्हा पूर्ण ॥७४॥आदी मध्य अंतीं ॥ नगीं सुवर्णाचीच वस्ती ॥तैसेंच ब्रम्हानिश्चिती ॥ सर्वत्र असे ॥७५॥येथें झालें न झालें ॥ नाना तैसेंची संचलें ॥है सकलही आर्वाक बोले ॥ म्रांतमयी ॥७६॥वस्तुचॆं यथार्थ वर्णन ॥ वस्तुशींच न होय जाण ॥तेथें अवस्तु प्रमाण ॥ कवणें घ्यावें ॥७७॥तेंचि करावया कथन ॥ मुनी बोलियेले पुढें होऊन ॥आम्हीही तयाची कासधरून ॥ सरसावलों ॥७८॥शं० - हांहां तुमचे बोला ॥ जीव आमुचा भ्याला ॥ कांकीं एकही प्रमाणाला ॥ धरितां नये ॥७९॥प्रथम अद्वैत बोलितां ॥ पुढें द्वैत प्रतिपादितां ॥पुन्हां अद्वैतचि द्वैत झालें म्हणतां ॥ एवं सकल घोटाळा ॥८०॥बरें पुढें कांहींच नाहीं झालें ॥ वस्तु जैसें तैसेचि संचलें ॥हेंही प्रतिपादित केलें ॥ भ्नमिष्टा सारखें ॥८१॥आतां आम्हीं ऐसें विचारूं ॥ वस्तुचि झालाना संसारु ॥का नामरूपादि प्रकारु ॥ निराळा असें ॥८२॥स० - कोणी ही बोलिल्या वत्त्क्याचा ॥ शेवट सिद्धांत घ्यावा त्याचा ॥तैसा आमुचे बोलाचा ॥ शेवट घेई ॥८३॥वस्तु स्वत: अभेद ॥ तेथें कधींच नाहीं झाले भेद ॥हे सद्दष्टांत करुनि सिद्ध ॥ दाऊं तुजला ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP