मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ३४ ते ३५ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ३४ ते ३५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ३४ ते ३५ Translation - भाषांतर वियदादेर्नामरूपे मायया सविकल्पिते ॥शून्यस्य नामरूपे च तथा चेज्जीव्यतांचिस्म् ॥३४॥जैसे सस्तुद्वचे वरती ॥ जैसि आकाशादि नामरूपें कल्पिती ॥तैसेची माये शून्या वरती ॥ कल्पना करसी ॥१४९॥सद्वस्तुचे ठाईं ऐसें कल्पिशी जरी कांहीं ॥ तरी तो अपसिद्धांत होई ॥तुझाचि तुजला ॥१५०॥शून्य म्हणजे कांहीं अहे ऐसे मानिशी ॥ कां कांहीं नाहीं ऐसें कल्पिशी ॥आहे जरी तूं म्हणशी ॥ तरी शून्य कैसें ॥१५१॥बरें नाहीं म्हणोनी बोलसी ॥ तरी सिद्धांता पुढें काय आणसी ॥शून्यची प्रतिपादिसी ॥ कवणे रीती ॥१५२॥वांझेचिया लेंकरा ॥ अधिकारसी गंधर्व नगरा ॥नाना स्वप्नीय जनावरा ॥ मृगजळ पाजिशी ॥१५३॥किंवा घेउनियां तमा ॥ सूर्य माखिशी उत्तमा ॥ गंवची नसतां सीमा ॥ प्रतिपादिसी ॥१५४॥ऐशापरी शून्यता ॥ कल्पनामयी असतां ॥चिरकाल राहूं जीविता ॥ तुझी तुझ्यापाशीं ॥१५५॥वादी - तरी आमुचे शुन्याचियपरी ॥ तुमचिया सद्वस्तुचे उपरी ॥कल्पित नामरूपातें अंगीकारी ॥ तुम्ही झालां ॥१५६॥वास्तविक पहातां ॥ नामरूप हे आभाव तत्वता ॥ मग तुम्ही कैसे कल्पिता ॥ सद्वस्तुचे ठायीं ॥१५७॥सतोऽपि नामरूपे द्वे कल्पिते चेत्तदा वद ॥कुत्रेति निरधिष्ठानो न भ्रम: क्वचिदीक्ष्यते ॥३५॥सि० - अरे आम्ही मुळींच झालें नाहीं म्हणतों ॥ तूची तयाचा अंगीकार करितो ॥तये विषयीं आम्ही विचारतों ॥ सांग भातां ॥१५८॥नामरूपें कल्पिशी ॥ तया अधिष्ठान काय घेशी ॥ सत किंवा असत मानशी ॥ अथवा जगत ॥१५९॥सदधिष्टानची जरीम्हणूं लागसी ॥ तरी कोणाचें नामरूप कोणा कल्पिशी ॥रजतादिकाचा आरोप करशी ॥ शुक्तिके वरती ॥१६०॥अन्याचीं नामरूपें ॥ अन्या वस्तुशी आरोपे ॥हे मले झाले सोपे ॥ भ्रमा तुझ्या ॥१६१॥चोरे करावी चोरी ॥ तूं त्या मालकची आंगीकारी ॥परि न्याय येता उजरी ॥ चोर तो चोर ॥१६२॥विषा अमृत नाम ठेविलें ॥ पिउनी कोण सांग जियाले ॥तैसेचि नामरूपाचे मासले ॥ सदधिष्ठानीं ॥१६३॥ब्रम्हा चारीयांचा नातु ॥ सुखें सांगु तुला हया मातु ॥परि नामरूपासी अधिष्ठातु ॥ सद्वस्तु नहोय ॥१६४॥आतां असत म्हणू जावें ॥ तरि ते नाहींच स्वभावें ॥तेणें कैसेनि हुवावें ॥ अधिष्टान ॥ १६५॥वांझेच्या मुलाची कन्या ॥ रूपवती परम धन्या ॥कोणवरील शुन्या ॥ वाचुनी तिला ॥१६६॥म्हणोनीयां असत ॥ हें अधिष्ठान नाहीं होत ॥ आतां म्हणशी जगत ॥ तरीही मिथ्या ॥१६७॥मुळींच जें नाहीं झालें ॥ तया अधिष्ठान आदी बोले ॥वर्णन करी सुखें बागुलें ॥ बालामधी ॥१६८॥एवं ऐसे झाले सिद्ध ॥ अधिष्ठान अमाव प्रसिद्धा ॥नामरूप हे निर्विवाद ॥ मिथ्या रूप ॥१६९॥वादि - अधिष्टान नाहीं झालें ॥ कल्पना रूपेची संचले ॥ऐसे म्हणतां मिथ्यत्व आलें ॥ कैसें नामरूपा ॥१७०॥सि० अरे अधिष्ठाना वांचून ॥ कल्पनाही नुगवते जाण ॥भ्रमासी सुद्धा कारण ॥ अधिष्ठान व्हावें ॥१७१॥एवं नामरूपादि मासलें ॥ मुळींच सद्वस्तु नाहीं स्पर्शलें ॥म्हणोनी अपसिद्धांत झाले ॥ तार्किकांच ॥१७२॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP