मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ९१ ते ९७ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ९१ ते ९७ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ९१ ते ९७ Translation - भाषांतर सतो विवेचिते वन्हौ मिथ्यात्वे सति वासिते ॥आपो दशांशतो न्यूना: कल्पिता इति चिंतयेत् ॥९१॥एवं प्रकारें करून ॥ मिथ्या ठरतां दहन ॥तया दशांशन्यून ॥ आपही विवेचावें ॥४२९॥संत्यापोऽमू: शून्यतत्त्वा: सशब्दस्पर्श संयुता: ॥रूपवत्योऽन्यधर्मानुवृत्त्या स्वीयो रसो गुण: ॥९२॥सतोविवेचितास्वप्सु तन्मिथ्यात्वं च वासिते ॥भूमिर्दशांतो न्यूना कल्पिताप्स्विति चिंतयेत् ॥९३॥अस्ति भूस्तवत्त्शून्यास्यां शब्दस्पर्शौ सरूपकौ ॥रसश्च परतो गंधौ नैज: सत्ता विविच्यताम् ॥९४॥पृथककृतायां सत्तायां भुमिर्मिथ्याऽवशिष्यते ॥भूमेर्यशांशतो न्यूनं ब्रम्हांडं भूमिमध्यगम् ॥९५॥ब्रम्हांडमध्ये तिष्टंति भुवनानि चतुदर्श ॥भुवनेषु वसंतेषु प्राणिदेहा यथा यथम् ॥९६॥ब्रम्हांडलोकदेहेषु सद्वस्तुनि पृथक कृते ॥असंतोंऽडदयो भांतु तद्भानेऽपीह का क्षति: ॥९७॥पाणी आहे हीच सत्ता ॥ ती बुद्धिनें विवेकें वेगळी करितां ॥ बाकी राहे निस्तत्वता ॥ तें मायारूप ॥४३०॥तेथ शब्दगूण अकाशाचा ॥ स्पर्श तो असे वायूचा ॥रूप धर्म वसे अग्नीचा ॥ रस स्वकीय वसे ॥४३१॥एवं हे सकळही गूण ॥ सत्ता विरहीत निस्तत्व जाण ॥विचारें करावें पृथक्करण ॥ आप तत्वाचें ॥४३२॥एवं विचारें करुन ॥ पृथ्वीतत्त्वही विवरावें जाण ॥जें असें दशांशें न्यून ॥ आप तत्वाचें ॥४३३॥आकाशादि भूतांचे ॥ घेऊनी शब्दादि गूण साचे ॥गंध गूण स्वकीय पणाचें ॥ धर्मत्व असे ॥४३४॥तेथही सत्ता वेगळी करितां ॥ राहे मिथ्या पृथ्वी रूपता ॥ती त्यागावी तत्वता ॥ असार म्हणोनी ॥४३५॥भूमी दशांशें न्यून ॥ ब्रम्हांडमध्य भूमी जाण ॥तियेवरी चतुर्दश भुवन ॥ पाताळ खर्गादि ॥४३६॥तिये भुवनांतरीं ॥ प्राणी वसती देहधारी ॥खकर्म प्रारब्धानुसारी ॥ यथा योग्य ॥४३७॥एवं ही ब्रम्हांड रचना ॥ मायिक उभारली जाणा ॥येथ सदत्वाचा ठिकाणा ॥ विचारें विवरावा ॥४३८॥सत् असतांचि जें आहे ॥ येर्हवीं मुळीच नोहें ॥मायामय अघवें हें ॥ मिथ्या रूप ॥४३९॥जरि हें दिसलें किंवा भासलें ॥ तरि तें मिथ्यारूपचि ठरलें ॥मृगजळ वांझबाळें ॥ जिया परी ॥४४०॥येथ सर्वत्र एकलीच सत्ता आहे ॥ दुजें कांहीं एक नाहीं, नोहें ॥हें पतिज्ञा पूर्वक बोलतहि ॥ वाणी माझी ॥४४१॥वादी - बरें असो तुमचे मतें ॥ सतचि झालें सकल भासतें ॥तेणें काय लाधला फळातों ॥ आम्हा सांगा ॥४४२॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP