महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक १ ते ५

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


सदद्वैतं श्रुतं यत्तत्पंचभूतविवेकत: ॥
बोद्धुं शक्यं ततो भूतपंचकं प्रविविच्यते ॥१॥

सकल ही सृष्टीनिर्माण ॥ झाली सताद्वैतवस्तु पासून ॥
ऐशी बोलली श्रुती प्रमाण ॥ “सदेव” इत्यादिना ॥९॥
तें अद्वैत ब्रम्हा कैसेनी बोलावें ॥ जेथ वाचा मन परतलीं स्वभावें ॥
कार्या वरुनी अनुभवावें ॥ पंच भूतांच्या ॥१०॥
म्हणोनी पंचभूतविवेक ॥ करूं आताम सम्यक ॥
जेणें  होईल हरिख ॥ श्रोतृजना ॥११॥

शब्दस्पर्शौ रूपरसौ गंधो भूतगुणा इमे ॥
एकद्वित्रिचतु: पंचगुणा व्योमादिषु क्रमात् ॥२॥

आकाशाचा शब्दगुण ॥ तेथून वायु झाला उत्पन्न ॥
त्याला आले दोन गुण ॥ शब्द स्पर्श ॥१२॥
वायुपासून वन्ही झाला ॥ तो धरी तीन गुणांला ॥
शब्दस्पर्श आणि रूपाला ॥ प्रकाशत्वें ॥१३॥
अग्री पासूनी झाला रस ॥ तो धरी चौगुणास ॥
शब्दस्पर्श रूपरस ॥ पातळपणें ॥१४॥
तेथून झाली भूमी ॥ ती पांच गुणातें आक्रमी ॥
शब्द स्पर्श रूप नामीं ॥ रस गंध ॥१५॥

प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायोर्बीसीति शब्दनम् ॥
अनुष्णाशीतसंस्पर्शो वन्हौ भुगुभुगुध्वनि: ॥३॥
उष्ण: स्पर्श: प्रभा रूपं जले बुलुबुलुध्वनि: ॥
शीत स्पर्श शुक्लरूपं रसो माधुर्यमीरितम् ॥४॥
भूमौ कडकडाशब्द: काठिण्यं स्पर्श इष्यते ॥
नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रस: ॥५॥
सुरमीतरगंधौ द्वौ गुणा: सम्यक विवेचिता: ॥

प्रतिध्वनि उमटतो ॥ तोच आकाशीं शब्द होतो ॥
हाचि एक गुण राहतो ॥ आकाशतत्वीं ॥१६॥
वायूचा शब्द वीसीत ॥ थंडगार स्पर्श होत ॥
हे दोन गुण राहत ॥ जये ठायीं ॥१७॥
अग्रीचा भुगुभुगुध्वनि ॥ उष्णस्पर्श रूप प्रकाशनीं ॥
ऐसें राहती गुण तीनी ॥ एके ठायीं ॥१८॥
जळीं बुलबुल शब्द होतां ॥ शीतस्पर्श शुक्ल रूपता ॥
रसीं वसे माधुर्यता ॥ चारी गुणें ॥१९॥
भूमीं कडकड शब्द होत ॥ कठीण स्पर्श लागत ॥
नीलादि चित्ररूप दिसत ॥ मधुर आम्लादि रस ॥२०॥
गंधही नानागुण ॥ भूमीमध्यें असतीजाण ॥
एवं हीं पांचही लक्षण ॥ पृथ्वीठायीं ॥२१॥
ऐशीं हीं पंचभूतें ॥ धरितीं झालीं नानागुणातें ॥
तयांचें कार्य इंद्रियें त्यांतें ॥ पुढेंकरुनी बोलती ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP