मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ९८ ते १०० महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ९८ ते १०० वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते. Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ९८ ते १०० Translation - भाषांतर भूतभौतिकमायानामसत्वेऽत्यंतवासिते ॥सद्वस्त्वद्वैतमित्येषा धीर्विपर्येति न क्वचित् ॥९८॥सि० - अरे भूतभौतिक अवघी सृष्टी ॥ मायामय ही लाधली द्दष्टी ॥ध्यान विचारें चित्तचतुष्टी ॥ दार्ढ्यता आली ॥४४३॥सदद्वैत श्रुति सिद्धांती ॥ बुद्धिझाली निश्चिती ॥ न फिरे कधीं ही मागुती ॥ विषर्यासा ॥४४४॥सकल हा ब्रम्हांडगोल ॥ अवघा मायेचा कल्लोळ ॥ऐशी बुद्धि झाली निखळ ॥ इया विचारानें ॥४४५॥सदद्वैता त्पृथग्भूते द्वैते भूम्यादिरूपिणि ॥तत्तदर्थक्रिया लोके तथा द्दष्टा तथैव सा ॥९९॥वादी - सदद्वैतता एक झाली ॥ सकलही भूतें मिथ्या ठरलीं ॥तेणें व्यवहार दशा लोपली ॥ होय जगीं ॥४४६॥सि० - सकल ही मिथ्या म्हणतां ॥ व्यवहारा कैशी ये बाधकता ॥ तदर्थचि क्रिया करिता ॥ जैशा तैशा ॥४४७॥व्यवहारा सत्यत्व देशी ॥ तेणें संशय ये तुझे मानसीं ॥ येर्हवीं पहातां विचारेशीं ॥ बाधकता नाहीं ॥४४८॥स्वप्नी स्वप्नव्यवहार चालती ॥ जगतीं प्राणीही तैसेचि वर्तती ॥ज्ञाता ही त्याच रीती ॥ समजूनी चाले ॥४४९॥घटादि मृण्मय सकल सृष्टी ॥ माती म्हणोनी आली प्रतीती ॥तेणें व्यवहार दशा लोपती ॥ कैसी होय ॥४५०॥नाना आरशीं मुख पाहिलें ॥ तें सत्य ऐसें कोणी मानिलें ॥परि व्यवहारा उपेगा आलें ॥ स्वच्छास्वच्छ ॥४५१॥देह हा नाशिवंत ॥ कोणीही न मानिती शाश्वत ॥तरी ही व्यवहार चालत ॥ लोकीं इया ॥४५२॥आतां एक हें एवढें होतें ॥ ज्ञाता समजूनी करितो कृत्यें ॥ तेणें सुखदु:ख संघातें ॥ न लिंपे कधीं ॥४५३॥तत्वज्ञान देहीं होतां ॥ व्यवहार बंद पडेल सर्वथा ॥हया मूर्खपणाच्या वार्ता ॥ आम्हीं नायकों ॥४५४॥सांख्यकाणादबौद्धाद्यैर्जगद्भेदो यथा यथा ॥उत्प्रेक्ष्यतेऽनेकयुत्त्क्या भवत्वेष तथा तथा ॥१००॥सांख्य काणाद बौद्धादि मती ॥ नाना भेदें वर्णिली जगतीं ॥तयांच्या त्या मती सिद्धांतीं ॥ भ्रष्ट जाहल्या ॥४५५॥तयांचें मत करावया खंड्ण ॥ प्रस्तुत विषय नाहीं जाण ॥ म्हणोनी तयाचें प्रतिपादन ॥ असो तैसे असो ॥४५६॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP