मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग २४१ ते २५० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग २४१ ते २५० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २४१ ते २५० Translation - भाषांतर २४१निंदा आणि स्तुति तुझीच करणें । परि आणिकांचे न घेणें गुणदोष ॥१॥वैर अथवा सख्या तुझियेच । परि न पडो ह्रदयीं विसर तुझा ॥२॥दास्य अथवा सत्ता गोपाळांचे परी । असो तुजवरी सर्वलोभ ॥३॥जिणें अथवा मरणें तुझियेच द्वारीं । उदास नरहरि करिसी झणें ॥४॥नामा म्हणे थोर शिणलों पंढरिनाथा । स्वामीचें नेणातां प्रेमसुख ॥५॥२४२छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥२४३अनाथासी साह्म होसी नारायणा । करुणावचना बोलविसी ॥१॥पांडुरंगा कृपा करीं मजवरी । पामर उद्धरीं पाहतांची ॥२॥गणिकें सत्वर मोक्षपद देसी । उपमन्यु बाळासी क्षीरसिंधु ॥३॥नामा म्हणे याति विचारसी । कण्य घरीं खासी विदुराच्या ॥४॥२४४अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी । पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । निवारी दुःखासी केशिराजा ॥२॥त्रितापें तापलें दुःखें आहाळलों । कासाविस जालों दायासिंधू ॥३॥तुजवीण आतां कोणातें मी सांगूं । तोडि हा उद्वेगु नारारणा ॥४॥नामा म्हणे आतां नको पाहूं अंत । उद्धरीं त्वरित पांडुरंगा ॥५॥२४५कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥२४६अनंता जन्मीचें चुकवीं सांकडें । काय मी बापुडें वानुं कैसें ॥१॥सगुन गुणाची वोललिसे मूर्ति । राहो माझे चित्तीं निरंतर ॥२॥माझा मीच जालों सकळ व्यापारी । संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥नामा म्हणे मज नको गोवूं आशा । पावन परेशा केशिराजा ॥४॥२४७जेथें जेथें मन जाईल गा माझें । तेथें तेथें तुझें रूप असो ॥१॥ऐसी मज संवई लावीं निरंतर । जन्मजन्मांतरीं केशिराजा ॥२॥आपणांस काम जरूर कायसा । आतां पंढरीशा आटोपावें ॥३॥नामा म्हणे नको पाहों माझी लाज । संसाराचें बीज मूळ खुडी ॥४॥२४८आम्ही काय जाणों तुझा अंतपार । होसी निरंतर निवारिता ॥१॥बहु अपराधी जाणा यातिहीन । पतितपावना तुम्ही देवा ॥२॥नामा म्हणे ऐसा पातकी पामर । करिसी उद्धारा साच ब्रीदें ॥३॥२४९अग्निमाजिं पडे बाळू । माता धांवे कनवाळू ॥१॥तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥२॥सवेंचि झेपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥भुकेलें वत्स रावें । धेनु हुंबरत धांवे ॥४॥वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतित हरिणी ॥५॥नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ॥६॥२५०धेनु विये वनीं तीसि कैचि सुयणी । तरीं ते वत्स स्तनीं लावी कवण ॥१॥भुजंगाचीं पिलीं उपजतांचि वेगळीं । त्यांसी डेखूं शिकविलें हो कोणी ॥२॥सहज लक्ष्ण जयाचिये ठायीं । तो आपुलिये सोई धांवतसे ॥३॥उपजतांचि फूल मोगर्यांच्या माथां । त्यासी परिमळता कोणे लावियेली ॥४॥कडू दुध्याच्या आळयासी साखर दूध घातलें । ते अधिकचि कडुवाळें कवणें केलें ॥५॥गाळिला तोडिला खंड विखंडी । ऊंन न संडी सोय गोडीसी ॥६॥नामा म्हणे तैसें आहे गा श्रीहरी । साईचे व्यपारीं घेईन तूतें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP