मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग ७१ ते ८० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग ७१ ते ८० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ७१ ते ८० Translation - भाषांतर ७१तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥कामधेनु घरीं असे प्रसवली । ते विकावया नेली दैवहतें ॥६॥पंथी पडिला पायां लागे चिंतामणी । पाषाण म्हणऊजि उपेक्षिला ॥७॥तैसी परी मज जाहली अधमा । चुकलों तुझ्या वर्मा केशिराजा ॥८॥नामा म्हणे थोर खंती वाटे जीवा । कृपा करूनि ठेवा कर माथां ॥९॥७२सर्वभावें तूतें जे ध्याती दातारा । त्यांचिया संसारा तूंचि होसी ॥१॥ज्याचे चित्तीं नाहीं आणिक कांहीं काम । त्याचा योगक्षेम तूंचि होसी ॥२॥ऐहिक परत्र जें कांहीं देखिजे । तें तुवां होईजे मायबापा ॥३॥नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । केशवा वाहिली क्षणमात्रें ॥४॥७३अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥७४जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥७५अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥उपमन्यालागीं आळी पुराविली । अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥७६संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥काम क्रोध मगर करिती माझा ग्रास । झणीं तूं उदास होसी देवा ॥३॥नामा म्हणे देवा झणीं मोकलिसी मातें । नाम तुझें सरतें धरिलें एक ॥४॥७७कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥७८काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम ॥१॥आणिक नाहीं मज चाड । रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥आनरस सेवितां मंद पडिलों । तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥इच्छाभोजनीं तूं एक दाता । नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥७९तान्हेलों भुकेलों । तुझेनि नामें निवालों ॥१॥तहान नेणें भूक नेणें । अखंड पारणें नामीं तुझ्या ॥२॥अमुतलिंग केशव हा चित्तीं । तेणें नामया तृप्ति अखंडित ॥३॥८०मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें ॥१॥धांव धांव चक्रपाणि । आणिका न करवे धांवणी ॥२॥नामा म्हणे निर्विष जालों । केशव नामें उपचारिलों ॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP