मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १०१ ते ११० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १०१ ते ११० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १०१ ते ११० Translation - भाषांतर १०१विसावा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घाली भक्तांवरी ॥१॥दाखवी चरण दाखवी चरण । दाखवी चरण नारायणा ॥२॥विठठल आचार विठठल विचार । दावीं निरंतर पाय आतां ॥३॥नामा म्हणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज ॥४॥१०२भुक्ति मुक्ति मागों तुज । तरी मज हांसती पूर्वज ॥१॥मज प्रेम पढियें देवा । न मगें आन कांहीं सेवा ॥२॥मोक्ष मागूं तुजप्रति । संत छलवादें हांसती ॥३॥चाड धरीन ब्रह्मज्ञानीं । तरी मज व्यर्थ व्याली जननी ॥४॥होऊं सिद्धीचा साधिता । दैवें सांडिलें तत्त्वता ॥५॥नामा म्हण्ने कांहीं न मगें । उभ राहेन संतांमागें ॥६॥१०३असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥मनाचिया वृत्ति आड तूं राहोनि । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥नामा म्हणे ऐसें पाळिसी तूं मातें । मी जीवें तूतें न विसंवें ॥४॥१०४उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥१०५येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारीं भवव्यथे पांडुरंगे ॥१॥मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु । करीं माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥माझें माहेर पैं नित्य आठवे अंतरीं । सखा विटेवरी पांडुरंग ॥३॥मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्म तूं अन्न । मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगा ॥४॥मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा ॥५॥मी धनलोभी शुंभ तूं पूर्ण कनक कुंभ । मी मगर तूं अंभ पांडुरंगा ॥६॥मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध । मी शुष्क नदी तूं ओग पांडुरंगा ॥७॥मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक । मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा ॥८॥मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी । मी अपत्य तूं जननी पांडुरंगा ॥९॥मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ॥१०॥ऐसी जे जे माझी विनंती ते तुजचि लक्ष्मीपती । निज सुख सांगाती पांडुरंगा ॥११॥शीघ्र येई वो श्रीरंगे भक्त मानस घे गे । प्रेमपान्हा दे गे नामदेवा ॥१२॥१०६बहु दिस होतों तुमचां गांवीं । आतां कृपा असों द्यावी ॥१॥आम्ही जातों आपुल्या गांवा । विठोबा लोभ असों द्यावा ॥२॥आमुचे ठायीं तुझें मन । तुझें चरण आमुचे प्राण ॥३॥आमुचें स्मरण असों द्यावें । लिखित पत्र पाठवावें ॥४॥नामा म्हणे जी केशवा । अखंड प्रेमभाव द्यावा ॥५॥१०७प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतें छंदें नाचों रंगीं ॥१॥कोणे वेळे काय गाणें । हें तो भगवंता मी नेणें ॥२॥वारा धावे भलतेया । तैसी माझी रंगछाया ॥३॥टाळ मृदंग दक्षिणेकडे । आम्ही गातों पश्चिमेकडे ॥४॥बोले बाळक बोबडें । तरी तें जननीये आवडे ॥५॥नामा म्हणे गा केशवा । जन्मोजन्मीं देई सेवा ॥६॥१०८टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान । अंतरीं ध्यान विठोवाचें ॥३॥श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामें । घेतलीं त्या प्रेमें सुखरूपें ॥४॥संतांची विश्रांति ज्ञानियांचें गुज । जें कां मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥गोवर्धनधरे गोपीमनोहरे । भक्तकरुणाकरे पांडुरंगा ॥७॥सकळा मंगळनिधी पातकभंजना । हरिजगज्जीवना परमानंदा ॥८॥तूंचि एक सकळ आदिमध्यअंतीं । नित्य सुखसंपत्ति सज्जनांची ॥९॥तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता । तूंचि घेता देता प्रेमसुख ॥१०॥विष्णुदास नामा विनवी पुरुषोत्तमा । सोडवी भवभ्रमां पासूनियां ॥११॥१०९तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥११०बोलूं ऐसे बोल । जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥परेहूनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रूप पूर्ण ॥४॥नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥५॥सर्व सत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP