मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग २३१ ते २४० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग २३१ ते २४० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २३१ ते २४० Translation - भाषांतर २३१तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥२३२पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचना काय लाज ॥२॥मागें बहुतांचे फेडियेलें ऋण । आम्हांसाठीं कोण आली धाड ॥३॥वारंवार तुज लाज नाहीं देवा । बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥२३३देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी ।कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव ।अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें ।पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा ।भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥ऐसा कष्टी होउनि बोध्य राहिलासी । तूं कलंकी या लोका भारिसी ।आपल्या दोषासाठीं आणिका दंडिसी । निष्कलंक होसी नारायणा ॥५॥ऐसा तूं बहुतां दोषीं बांधलासी । पुढीलाचीं जन्में अवगतोसी ।विष्णुदास नामा म्हणे ह्रषिकेशी । तुझी भीड कायसी स्वामियाहो ॥६॥२३४मरणें पेरणें जन्म उगवणें । मायेची ते खूण सांगितली ॥१॥संग तुझा पुरे संग तुझा पुरे । संग तुझा पुरे नारायणा ॥२॥तूं तरी न मरे मी तरी न पुरे । भक्ति हे संचरे हाचि लाभु ॥३॥नामा म्हणे माझ्या ठायिंचा मी नेणें । संसार भोगणें तुझी जाला ॥४॥२३५तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥चोर आणि शिंदळू चाळविलें गोविळें । अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥नामा म्हणे केशवा सांगेन वर्म । ऐकतां न राहे संतांचें कर्म ॥४॥२३६उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥किती बडिवार सांगसील वायां । ठावा पंढरिराया आहेसी आम्हां ॥३॥कर्णा ऐसा वीर झूंझार उदार । त्यासी त्वां जर्जर केलें बाणीं ॥४॥पाडिलें भूमीसी न येचि करुणा । त्याचे नारायना पाडिले दांत ॥५॥श्रिययाळ बापुडें सात्विक निर्वाणीं । खादलें कापोनी याचें पोर ॥६॥ऐसा कठिण कोण होईल दुसरा । कांडियेलें शिरा उखळामाजीं ॥७॥शिवी चक्रवर्ती करिताम यज्ञयाग । कापिलें त्याचें अंग ठायीं ठायीं ॥८॥जाचोनियां प्राण घेतला तयाचा । काय सांगसी वाचा बडिवार ॥९॥हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकले त्याचे जीव डोंबाघरीं ॥१०॥बहुतचि श्रम दिधलें तयासि । परी तो सत्वासि ढळेचिना ॥११॥पाडिला विघड नळादमयंतीं । ऐसी कृपामूर्ति बुद्धि तुझी ॥१२॥आणिक तुझी कीर्ति सांगावी ती किती । केली ते फजिती माउशीची ॥१३॥मारियेला मामा सखा पुरुषोत्तमा । नामा म्हणे सीमा फार केली ॥१४॥२३७उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥वर्में तुझीं कांहीं बोलेन मी आतां । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥न घेतां न देसी आपुलेंहि कोण । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥बाळमित्र सुदामा विपत्तीं पिडला । तो भेटावया आला तुजलागीं ॥५॥त्याचें मुष्टिपोहेसाठीं मन केलें आसट । मग दिलें उत्कृष्ट भाग्य तया ॥६॥छळावया पांडव दुर्वास पातला । द्रौपदीनें केला धांवा तुझा ॥७॥गेली वृंदावना केली प्रदक्षेना । आळविला कान्हा द्वारकेचा ॥८॥आळवी पांचाळी येर बा वनमाळी । राख ये काळीं सत्व माझें ॥९॥येवढिया आकांतीं घेऊनि भाजीपान । मग दिलें अन्न ऋषिलागीं ॥१०॥बिभीषना दिधलि सुवर्णाची नगरी । हे कीर्ति तुझी हरि वाखाणिती ॥११॥वैरियाचें घर भेदें त्वां घेतलें । त्याचें त्यासी दिधलें नवल काया ॥१२॥धरुवा आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र रुक्मांगद आदि करुनी ॥१३॥त्याचें सेवाऋण घेऊनि अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्या ॥१४॥एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचें तें चित्त हिरोनि घेसी ॥१५॥मग तया देशी आपुलें तूं पद । जगदानी हें ब्रीद मिरविसी ॥१६॥माझें सर्वस्व घेई तुझें नको कांहीं । मनोरथाची नाहीं चाड मज ॥१७॥नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरीं । ऋणी करिन हरी ऋणें सेवा ॥१८॥२३८निर्गुण नामाची अनंत कल्पना । धरुनि नारायणा व्यक्ति येसी ॥१॥लाज लावियेली त्या निर्गुणपणा । श्रुतींच्या वचना वाखाणितां ॥२॥तैसें न हो आम्ही करणीचे विलगत । नामाचे निकट दास तुझे ॥३॥चतुरा शिरोमणी नंदाना खिल्लारी । हें अघटित मुरारी नाम जरी ॥४॥तुमचे तुम्हां देवा सांगतां तें निकें । समर्थांसी रंकें बोलिजे केवीं ॥५॥देवा मुगुटमणी हें बोलती पुराणें । आणि बळिचें राखणें द्वार काय ॥६॥अर्जुना सारथी रथा वागविसी । उच्छिष्टें काढिसी धर्माघरीं ॥७॥विश्वंभर नाम तुझें कमळापति । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥८॥गौळियांचे घरीं दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसीना ॥९॥आतां दीनानाथ ब्रीद तुझें साचें । तरी भूषन आमुचें जतन करी ॥१०॥येर ठेवा ठेवी कायसी आम्हां आतां । विनवितो नामा केशिराजा ॥११॥२३९अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग ॥१॥ये गा तूं विठ्ठला माझिया माहेरा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥२॥वर्णिती पुराणें न करीं लाजिरवाणें । बोलती वचनें सनकादिक ॥३॥कृपेचा सागरू कैवल्यउदारू । रखुमाईचा वरू पांडुरंग ॥४॥पुंडलिकाचे भेटी अससी वाळवंटीं । हात ठेवुनि कटीं विटेवरी ॥५॥भक्तिलागीम कैसा उभा असे तिष्ठत । असे वाट पहात भीमातीरीं ॥६॥येऊनी जन्मासी पाहावी पंढरी । तेणें भवसागरीं तरसील ॥७॥नामा म्हणे मज हरीचा विश्वास । जालों असे दास जन्मोजन्मीं ॥८॥२४०काया कर पैं फुटों नेदी । टाळ विंडी वाहिन खांदीं ॥१॥तूं बा माझा तूं बा माझा । तूं बा माझा केशिराजा ॥२॥आळवणीच तूं बा वाचे । तेणें छंदें पेंधा नाचे ॥३॥तूं बा माझा मी दास तुझा । विनवितो नामा केशिराजा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP