मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग ८१ ते ९० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग ८१ ते ९० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ८१ ते ९० Translation - भाषांतर ८१नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं ॥१॥आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरिरायाचे ॥२॥टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीतीं ॥३॥नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥८२नामें तरूं अवघे जन । यमपुरीं घालूं वाण ॥१॥करूं हरिनामकीर्तना । तोडूं देहाचें बंधन ॥२॥करूं हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडूं ओस ॥३॥ऐस नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥४॥८३विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।तुटेल हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥१॥म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।हें नाम आम्हां सारा । संसार तरावया ॥२॥एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी ।गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही ।नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥८४जें जें घडेल तें तें घडो । देह राहो अथवा पडो ॥१॥परि मी न सोडी सर्वथा । तुझे पाय पंढरिनाथा ॥२॥क्लेश होत नाना परी । मुखीं रामकृष्ण हरि ॥३॥नामा म्हणे केशवातें । जें जें घडेल या देहातें ॥४॥८५यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं ॥१॥जप तप होम स्वधर्माचरण । नव्हे तीर्थाटण कांहीं मज ॥२॥गया पिंडदान प्रयागींचें स्नान । कर्म अनुष्ठान नव्हे मज ॥३॥भक्ति उपासना देवाचें पूजन । ध्यान उपोषण नव्हे मज ॥४॥पृथ्वीचें भ्रमण अनुताप संपूर्ण । सारासार खूण नकळे कांहीं ॥५॥पुण्य नाहीं गांठीं पापाचें संचित । परम पतित वाटे मज ॥६॥माझा देह आहे पातकांचा थारा । मी अपराधी खरा कळलेसें ॥७॥पुराणप्रसिद्ध नाम तुझें सार । ऐसें निरंतर बोलताती ॥८॥अन्याथा वचन नोहे हें प्रमाण । तरी ब्रीदें जाण सांडवलीं ॥९॥तुम्ही व्रीद आपुलें जतन करणें । तरी नारायणें सांभाळावें ॥१०॥नामेंविण कांहीं आम्हांपाशीं नाहीं । विचारोनी पाही पांडुरंगा ॥११॥धन वित सर्व आमची हे जोडी । नामा म्हणे गोडी नामीं तुझें ॥१२॥८६लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥आम्हांसी तों तुझें नामचि पाहिजे । मग भेटी सहजें देणें लागे ॥३॥भोळीं भक्तें आम्ही चुकलों होतों वर्म । सांपडलें नाम नामयासी ॥४॥८७भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥नाहीं यासी पतन् न होय बंधन । नित्य हेंचि स्नान राचनामीं ॥२॥नामा म्हणे भाव सर्वाभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥३॥८८नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥माझें मज कळलें माझें मज कळलें । माझें मज कळलें प्रेमसुख ॥२॥न करीं तुझें ध्यान नलगे ब्रह्मज्ञान । माझी आहे खूण वेगळीच ॥३॥न करीं तुझी स्तुति न वाखाणीं कीर्ति । धरलसि ते युक्ति वेगळीच ॥४॥नामा म्हणे नाम गाईन विर्विकल्प । येसी आपोआप गिंवसित ॥६॥८९क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥९०अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥विठोबाचें नाम गाईन मनोभावें । चित्त तेणें नांवें सुख पावे ॥२॥इंद्रियांचें कोड सर्वस्वें पुरती । मनाचे मावळती मनोधर्म ॥३॥श्रवणीं श्रवणा नामाचा प्रवंधा । नाइकें स्तुतिनिंदा दुर्जनाची ॥४॥कुंडलें मंडित श्रीमुख निर्मळ । पाहतां हे डोळे निवती माझे ॥५॥विटेसहित चरण धरीन मस्तकीं । तेणें तनु सुखी होईल माझी ॥६॥संतसमागमें नाचेन रंगणीं । तेणें होईल धुणी त्रिविध तापा ॥७॥नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा । न विसंवे दातारा क्षणभरी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP