मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग ९१ ते १०० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग ९१ ते १०० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग ९१ ते १०० Translation - भाषांतर ९१नमन करीन द्वारकानायका । पांडव पालका देवराया ॥१॥आतां मी गाईन गुण नाम कीर्ति । जेणें चारी मुक्ति दासी होती ॥२॥साधक लोकांसी हेंचि पैं साधन । ब्रह्म सनातन वश होय ॥३॥नामा म्हणे सर्व सारांचें हें सार । जेणें निरंतर निरंतर सुख वाटे ॥४॥९२जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥काय उतराई होउं तुज देवा । उदारा केशवा मायवापा ॥२॥अंतरीं देऊन प्रेमाचा जिव्हाळ । मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥नामा म्हणे वेदां न येसी अनुमाना । वर्णितां पुराणां पडियेलें ठक ॥४॥९३मन नेणेंज तुझ्या मनाचा विश्वास । येर तो हव्यास गोड वाटे ॥१॥तुझें प्रेम नेणें तुझें प्रेम नेणें । सांग काय करणें केशिराजा ॥२॥मज घातलें संसारीं पीडिलों कर्मभांडारीं । कृपा नरहरी करी मज ॥३॥नामा म्हणे मी तों ठायींचाचि अपराधी । केशवा कांहीं बुद्धि सांग मज ॥४॥९४येइना अझुनी श्रीकृष्ण सदना । गोंवळा रक्षणा मायबाप ॥१॥लावुनि आशा फिरविशी दिशा । प्रेमभाव कैसा दावीं आतां ॥२॥बाळेभोळे जन करिती विनंती । मोकलिसी अंतीं म्हणे नामा ॥३॥९५अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥येतों काकुळती प्रेम पान्ह्यासाठीं । उभा तो धुर्जटी मागें पुढें ॥३॥नामा म्हणे जीवें करीन लिंबलोण । ओवाळिन चरण विटेसहित ॥४॥९६विठ्ठल माउली कृपेची कोंवळी । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥तुजविण जिवलग दुजें कोण होईल । ते माझे साहिल जड भारी ॥३॥तूं माझी माउली मी वो तुझा वच्छ । परतों परतों वास पाहे तुझी ॥४॥माया मोहें कैसी न विसंबे सर्वथा । अंतरींची व्यथा कोण जाणे ॥५॥नामा म्हणे विठ्ठ्ले कां गे रुसलिसी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥९७डोळुले सिणले पाहता वाटुली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥१॥तूं माझी जननी सखिये सांगातिणी । विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरलीसी ॥३॥तूं माझी कुरंगिणी मी तुझें पाडस । गुंतलें भवपाश सोडी माझा ॥४॥मी तुझें वच्छ तूं माझी गाउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥५॥नामा म्हणे माझी पुरवावी आस । पाजी तान्हुल्यास प्रेमपान्हा ॥६॥९८येई गे विठ्ठले अनाथाचे नाथे । माझे कुळदैवते पंढरीचे ॥१॥पंच प्राणांचा उजळोनि दिपक । सुंदर श्रीमुख ओवाळीन ॥२॥मनाचा प्रसाद तुजलागीं केला । रंगभोग आपुला घेऊनि राहे ॥३॥आनंदाचा भोग घालिल आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्य नांवें ॥४॥आपुलें म्हण्वावें सनाथ करावें । भावें संचारावें ह्रदयांत ॥५॥नामा म्हणे माझे पुरवी मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा ॥६॥९९कृपावंत समर्थ म्हणूनि करी आर्त । येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥मज कां विसंबली विठ्ठल माउली । तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥तूं माझें जीवन नाम जनार्दन । ह्रदयीं भरी पूर्ण प्रेमरस ॥३॥अमृताच्या करेंज कांसवीच्या भरें । कुरवाळीं त्वरें देह माझा ॥४॥पूर्ण पान्हा देई निववीं ह्रदयीं । येई वो कान्हाई सांवळिये ॥५॥नामा म्हणे पावे जीवा शीण न साहे । वेगीं लवलाहे पाजी पान्हा ॥६॥१००तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मत्र पांडुरंगे ॥४॥कासवीची दृष्टी सदा बाळावरी । तैसी दया करीं पांडुरंगे ॥५॥नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळिसी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP