मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग २११ ते २२० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग २११ ते २२० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २११ ते २२० Translation - भाषांतर २११काय अपराध पाहसी कोणाचे । धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥काय केशिराजा वाणूंज मी दुबळें । शरणागता लळे पुरविशी ॥२॥पतितपावन ब्रीद चराचरीं । तेथें मी भिकारी कोणीकडे ॥३॥नामा म्हणे तूंचि करिशी उद्धार । मज भ्याग्या पार नाहीं देवा ॥४॥२१२जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥२१३आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥चतुरा शिरोमणी अहो केशिराजा । अंगीकार तुझा केला आम्हीं ॥३॥सहस्त्र नामें जरी जालासि संपन्न । तरी हेंहि भूषन आमुचेंचि ॥४॥येर्हवीं त्या नामाची कवण जाणे सीमा । पाहें मेघश्यामा विचारोनि ॥५॥होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी । लक्ष्मी तेथें करी चरणसेवा ॥६॥तेहि तंव जाण आमुची जननी । तूं तियेवांचोनि शोभसी कैसा ॥७॥तुज नाहींज नाम रूप जाति कूळ । अनादीचें मूळ म्हणती तुज ॥८॥आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल । ऐसा प्रगट बोल जगामाजीं ॥९॥ऐसि आमुचेनि भोगिसी थोरीव । अमुचा जीवभाव तुझे पायीं ॥१०॥नामा म्हणे केशवा जरि होसी जाणता । या बोला उचिता प्रेम देई ॥११॥२१४विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥पिंगळेची आख्या पुराणीं ऐकिली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥३॥गौतमाचें शापें अहल्या शिळा जाली । ते तुवाम तारिली काय म्हणुनि ॥४॥नामा म्हणे केशवा अकळ तुझी करणी । विसंबसी झणीं तूंचि मज ॥५॥२१५आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥अज्ञान बाळकु ठकविला धुरू । तैसा मी अधिरू नव्हे जाण ॥३॥लंकापति केला तुवां बिभीषण । झालासी उत्तीर्ण वाचाऋणें ॥४॥उपमन्यें घेतला दुधाचाचि छंद । तैसा बुद्धिभेद नव्हे जाण ॥५॥नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञा । माग तुज देईन शरीर अवघें ॥६॥२१६आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥आम्हां ऐसें चित्त तुम्हां कैचें देव । हा बडिवा केशवा न बोलावा ॥३॥सत्वाचा सुभट बळि चक्रवर्तित । पहा केवढी ख्याति केली तेणें ॥४॥त्रिभुवनीचें बैभव जोडिलें ज्या लागुनि । तें शरीर तुझ्या चरणीं समर्पियेलें ॥५॥रावणा ऐसा बंधु सांडूनि सधर । ओळंगति परिवारा ब्रह्मादिकां ॥६॥तें सांडोनि एकसरा आलासे धांवत । जाला शरणागत बिभीषण ॥७॥हिरण्यकश्यपें तुझ्या वैर संबंधें । पाहे त्या प्रल्हादा गांजियेलें ॥८॥अजगर कुंजर करितां विषपाना । परि तुझें स्मारण न संडीच ॥९॥पति पुत्र स्नेह सांडोनि गोपिका । रासक्रीडे देखा भाळलिया ॥१०॥एकीं तुझें ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसें निर्वाण कवणें केलें ॥११॥ऐसे मागें पुढें जाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥१२॥त्यांचिनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनीं पांडुरंगे ॥१३॥केलें उच्चारणें बोलतां लाजिरवाणें । हांसती पिसुणें संसारींची ॥१४॥नामा म्हणे केशवा अहो विरोमणी । निकुरा जाला झणीं मायबापा ॥१५॥२१७कागदीचें वित्त वेश्येसी दिधलें । तैसें आम्हां केलें नारायणें ॥१॥जोडोनियां हस्त केलें मढयापाशीं । तैसें तूं मजशीं केलेंज देवा ॥२॥कडू भोपळयाचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगें केलें जाण ॥३॥नामा म्हणे ऐसें करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवें ॥४॥२१८दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥भार खांद्यावरी घेऊनी हिंडवी । होसी मजविशि पाठमोरा ॥३॥श्रांत सावकाश गाती इतिहास । काय कासाविस होय तुम्हां ॥४॥नामा म्हणे नको वाउगे उदीम । न सोडीं मी नाम केल्या कांहीं ॥५॥२१९तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥आम्हीं देवा तुझी केली होती आशा । बरवें ह्रषिकेशा कळों आलें ॥३॥नामा म्हणे देवा करा माझी कींव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा ॥४॥२२०सकळ वैभव निजकर्म भोग । ते तुज उद्वेग दावी काई ॥१॥मीतूंपण असे तेथें मग कैचें । निर्माण ठायिंचें तोडीं वेल ॥२॥आपुला करूनि ठेवीं तुझें पायीं । थोरपण कांहीं नको मज ॥३॥नामा म्हणे तुझें सोलीन ढोंपर । कासया विचार देखों आतां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP