मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग २०१ ते २१० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग २०१ ते २१० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग २०१ ते २१० Translation - भाषांतर २०१लाज सांडोनियां जालों शरणागत । ऐसियाचा अंत पाहसी झणीं ॥१॥गुण दोष माझे मनीं गा न धर । पतितपावन जरी म्हणविसी ॥२॥पडावें परदेसीं हे लाज कोणासी । जरी तूं न पावसी पांडुरंगा ॥३॥नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणीं मायबापा ॥२॥नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणी मायबापा ॥४॥२०२तुझें गुणनाम ऐकतां श्रवण नाराध्ये । अवलोकन करित नयन नाराध्ये ।पूजन करितां कर नाराध्ये । ऐसी नाराणुक द्यावी कमळापती ॥धु०॥नरहरि या नामें उदंड । केव्हांही नसावें रिकामें तोंड ।खांदीं सतत करंडा वाहे । मस्तकीं अखंड निर्माल्य राहे ।नेत्रीं आनंदजळ वाहे । यामध्यें देवा झणें कांहीं उणें होय ॥१॥तुझेनि प्रसादें जठर पोसिलें । चरणोदकें तृष्णाहरण केलेंज ।नामें नृत्य करितां मन हें निवालें । दंडवत घालितां श्रम हरले ॥२॥गता शयनीं विसर न द्यावा श्रीरामा । यापरी निश्चित परमात्मा ।तूं आलिया निवारिसी श्रमा । ऐसें केशिराजा विनवितो नामा ॥३॥२०३तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥२०४देवा निढळावरी हात दोन्ही । पाहें चक्रपाणि वाट तुझी ॥१॥धांव गा धांव सख्या पांडुरंगा । जीवीं जिवलगा मायबापा ॥२॥तुजविण ओस दिसती दाही दिशा । आणि धांव जगदीशा मजसाठीं ॥३॥नामा म्हणे काय बैसलों निवांत । धांवतो अनंत भक्तांसाठीं ॥४॥२०५भागलासि देवा धांव धांवणिया । दाखविसी पायां पांडुरंगा ॥१॥गजेंद्र गणिका तुम्हां श्रमविलें । मी काय उगलें परदेशी ॥२॥सोळा सहस्त्र आणि गोपी त्या उद्धरती । माझी कींव चित्तीं कां वा नये ॥३॥नामा म्हणे आम्हां पुरे तुझा संग । वारंवार मगा वारी कोण ॥४॥२०६केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥२०७ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन ॥१॥सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी । आणि अंतरीं नाठवावें ॥२॥आणिकासी गुज न बोले वदन । वदो नारायन सर्वकाळ ॥३॥रामकृष्ण माझ्या शेषाचें स्तवन । शास्त्रेंहि पुराणें भाट ज्यांचीं ॥४॥नामा म्हणे आतां ऐसें करी देवा । ह्रदयीं केशवा राहे माझ्या ॥५॥२०८काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥२०९कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥नामा म्हणे सत्ता करिती निकत । भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥२१०शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी ॥१॥सांगणें नलगे सांगणें नलगे । सांगणें नलगे मायबाप ॥२॥सांगतां समर्थ सवेंचि विसरे । त्याच्या अभ्यंतरीं नव्हे बोल ॥३॥नामा म्हणे तैसा न होसी शहाणा । अठराहि पुराणें वेडावलीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP