मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १११ ते १२० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १११ ते १२० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १११ ते १२० Translation - भाषांतर १११आम्ही तुझे असों एकचि त्या बोधें । नित्य परमानंदें वोसंडित ॥१॥विठ्ठलचि घ्यावा विठ्ठचि गावा । विठ्ठचि पहावा सर्वाभूतीं ॥२॥या परतें सुख न दिसे सर्वथा । कल्पकोटि येतां गर्भवास ॥३॥नामा म्हणे चित्तीं विठठलांचें रूप । संकल्प विकल्प मावळले ॥४॥११२तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥११३नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं ॥१॥केशव तोचि नामा तोचि केशव । प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥विष्णुदास नामा उभा केशवद्वारीं । प्रेमाची शिदोरी मागतसे ॥३॥११४प्रेमफांसा घालुनियां गळां । जितें धरिलें गोपाळा ॥१॥एक्या मनाची करूनि जोडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥२॥ह्रदय करूनि बंदिखाना । विठ्ठल कोंडुनी ठेविला जाणा ॥३॥सोहं शब्दें मार केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥नामा म्हणे विठ्ठलासी । जीवें न सोडी सायासी ॥५॥११५विठ्ठल आमुचें सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥११६व्यापकारीस मन केलें वाड । सांपडलें गोड प्रेममुख ॥१॥जिकडे पाहें तिकडे विठ्ठल अवघा । भीमा चंद्रभागा पुंडलिक ॥२॥सर्व निरंतरीं सबाह्य अंतरीं । हें ब्रह्यांड पंढरी जाली मज ॥३॥महुरलें तरुवर पुष्पीं फलीं भार । तेंचि निर्विकार सनकादिक ॥४॥आवडीचा आनंदु तोचि विष्णुनादु । अनुभव तो गोविंदु गोपवेषें ॥५॥नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळित ॥६॥११७तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका ।तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी ।तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी ।तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी ।तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता ।तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा ।मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥११८जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥काये उतराई होऊं तुज देवा । उदारा केशवा मायबापा ॥२॥अंतरीं देऊनि प्रेमाचा जिव्हाळा । मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥नामा म्हणे वेदां न येसी अनुमाना । वर्णितां पुराणां पडलें टक ॥४॥११९वारंवार काय विनवावें आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥१॥तूं काय म्हणसी कंटाळेल हाची । जाईल उगाचि उठोनियां ॥२॥मजलागीं देव जासी चुकवोनी । आणिन धरूनि तुजलागीं ॥३॥दृढ भक्तिभाव प्रेमाचा ह दोरा । बांधीन सत्वर तुझे पायीं ॥४॥नामा म्हणे विठो बोल काय आतां । भेटावया सर्वथा यावें बरें ॥५॥१२०संसारषडचक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥माझी चित्तवृत्ती अज्ञान हे गाई । व्याघ्रें धरिली आहे अहंकारें ॥३॥पंचाननीं मज घेतलें वेढोनि । नेताति काढोनि प्राण माझा ॥४॥गजेंद्राकारणें घातली त्वां उडी । तैसा लवडसवडी पावें मज ॥५॥नामा म्हणे मज तुझाचि आधारा । पोसणा डिंगर जन्मोजन्मीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP