मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १८१ ते १९० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १८१ ते १९० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १८१ ते १९० Translation - भाषांतर १८१माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही ॥१॥पक्षी अवचित अंगणांत आला । घेऊनियां गेला सारा तेणें ॥२॥हाटकरी आम्ही हाटसी पैं गेलों । फिरोनियां आलों गांवामाजीं ॥३॥नामा म्हणे नमूं सर्व जीवजंत । दिसे ते अनंत दृष्टीपुढें ॥४॥१८२मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥झणीं पांडुरंगा उपेक्षिसी मातें । तरी हांसतील तूंतें संतजन ॥२॥नामा म्हणे तुझीं पाउलें समान । तेथें माझें मन स्थिरावलें ॥३॥१८३तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य । तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥१८४तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई मज ॥४॥१८५किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥१८६गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥१८७हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज ॥१॥अन्न उदक सोडिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥स्त्री पुत्र बाप माय । यांचा आठव न होय ॥३॥देह्भाव विसरला । छंद हरीच लागला ॥४॥नामा म्हणे हेंचि देई । तुझे पाय माझे डोयीं ॥५॥१८८पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे ॥१॥झणीं मुक्तिपद देसी पांडुरंगा । मग या संतसंगा कोठें पाहूं ॥२॥मग हे पंढरी आनंद सोहळा । कवणाचे डोळां पाहूं देवा ॥३॥मग हे हरिकथा अमृत संजीवनी । कवणाचे श्रवणीं ऐकों देवा ॥४॥नामा म्हणे मज पंढरीची सोये । अनंत जन्म होये याचिलागीं ॥५॥१८९देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥माझिया अदृष्टीं ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥३॥असतां निरंतर येणें अनुसंधानें । प्रारब्ध भोगणें गोड वाटे ॥४॥ह्रदयीं तुझें रूप वदनीं तुझें नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥नामा म्हणे तुझीं पाउलें चिंतितां । जाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं ॥६॥१९०तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP