मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १५१ ते १६० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १५१ ते १६० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १५१ ते १६० Translation - भाषांतर १५१पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥जाईजुई पुष्पें गुंफोनियां माळां । घालूं घननीळा आवडीनें ॥३॥नामा म्हणे विठो पंढरीचे राणे । डोळियां पारणें होत असे ॥४॥१५२तपें केलीं दाटोदाटीं । थोर पुण्याचिया साठीं ॥१॥जन्मोजन्मींचा संकटीं । विठो तुझी जाली भेटी ॥२॥दोन्हीं चरण लल्लाटीं । नामा म्हणे न सोडीं मिठी ॥३॥१५३महिमा अगाध यात्रा कार्तिकीये । आला पंढरीये नामदेव ॥१॥भक्त शिरोमणी पंढरीच्या नाथा । कृपाळुवा माता बाळकासी ॥२॥धन्य नामदेव धन्य नामदेव । जिवीं तुझे पाव न विसंबे ॥३॥भक्त सप्रेम मिळाले अपार । करिती गजर हरिनामीं ॥४॥नटे महाद्वारीं झळके पताका । करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥नामघोष कानीं समस्त ऐकती । पाषान द्रवती तेणें प्रेमें ॥६॥नामा म्हणे जीव निवालासे येथें । पाहतां विठोबातें श्रमु नेला ॥७॥१५४ऐसी चाल नाहीं कोठें । नमस्कारा आधीं भेटे ॥१॥मायबापा निर्विकारीं । सखा नांदतो पंढरीं ॥२॥देव भक्तपण । नाहीं नाहीं त्यासी आण ॥३॥नामा म्हणे आधीं भेटी । मग चरणां घालीन मिठी ॥४॥१५५बहुत जन्माशेवटीं तुजशीं जाली भेटी । बहु मी हिंपुटी जालों थोर ॥१॥बहु कीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥२॥बहुतां आसक्त बहुतां ओळगणा । बहुत विटंबना जाली माझी ॥३॥बहु फेरे पाहिले बहु दुःख साहिलें । बहु चित्त वाहिलें दुर्भरची ॥४॥बहुत काळ गेले बहु अन्याय केले । बहु नाहीं जोडिलें नाम तुझें ॥५॥नामा म्हणे केशवा एक उरली वासना । घ्यावी नारायणा चरणसेवा ॥६॥१५६तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥तैसी परि मज जहाली जाण देवा । नामा उभा केशवा विनवितो ॥३॥१५७धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥सर्व आचरण दाविसी प्रकार । कल्पना अंधार निमित्याचा ॥३॥नामा म्हणे होसी चतुर आपण । आमुचें निर्वान पाहूं नको ॥४॥१५८बुद्धिहीन अति करितों हव्यास । उठती दद्देश नाना मतें ॥१॥एकापुढें एक नासोनियां जाती । सोशिली विपत्ति जन्ममरण ॥२॥वासनेचें संगें बुडालों मी वायां । चुकवूं नको पायासवें भेटी ॥३॥नामा म्हणे ऐसे गेले बहुतेक । वैकुंठनायका तारीं मज ॥४॥१५९अठ्ठाविस युगें उभा विटेवरी । मुद्रा अगोचरीं लावूनियां ॥१॥ध्यान विसर्जन केधवां करिसी । नेणवे कोणासी ब्रह्मादिकां ॥२॥पहातां तुजकडे माझें मीपण उडे । भेदाचें सांकडें हारपलें ॥३॥तुजपाशीं असतां मुकिजे जीवित्वा । ठकले तत्त्वतां नेणों किती ॥४॥नामा म्हणे स्वामी कृपादृष्टि पाहें । मन पायीं राहे ऐसें कीजे ॥५॥१६०माझी कोण गति सांग पंढरिनाथा । तारिसी अनाथ कीं बुडविसी ॥१॥मनापासोनियां सांग मजप्रती । पुसें काकुळती जीवाचिये ॥२॥न बोलसी कां रे धरिला अबोला । कोणासी विठ्ठला शरण जाऊं ॥३॥कोणासी सांकडें घालावें हें सांग । नको करूं राग दीनावरी ॥४॥बाळकासी जैसी एकचि वो माये । तैसे तुझे पाये आम्हांलागीं ॥५॥नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । कृपाळुवा कांता रखुमाईच्या ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP