मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मसुख| अभंग १२१ ते १३० आत्मसुख अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० अभंग १५१ ते १६० अभंग १६१ ते १७० अभंग १७१ ते १८० अभंग १८१ ते १९० अभंग १९१ ते २०० अभंग २०१ ते २१० अभंग २११ ते २२० अभंग २२१ ते २३० अभंग २३१ ते २४० अभंग २४१ ते २५० अभंग २५१ ते २६० अभंग २६१ ते २७३ आत्मसुख - अभंग १२१ ते १३० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १२१ ते १३० Translation - भाषांतर १२१येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥नामा म्हणे तूं विश्वाची जननी । क्षिराब्धिनिवासनी जगदंबे ॥३॥१२२येई वो विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढी मज ॥१॥आकांत आवसरी स्मरलीसे गजेंद्रें । दीनानाथ ब्रीदें साच केलीं ॥२॥स्मरलीसे संकटीं द्रौपदी वनवासी । धांवोनि आलीसी लवडसवडी ॥३॥प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें ॥४॥नामा म्हणे थोर पीडिलों भर्भवासें । अखंड पाह्तुसे वाट तुझी ॥५॥१२३जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥नामा म्हणे आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥१२४भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥कृपेचा सागर विठो लोभपर । माझा कां विसर पडिला त्यासि ॥३॥माहेरींची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥मखे वारकरी पंढरीस जाती । निरोप त्या हातीं पाठवीन ॥५॥निर्बुजला नामा कंठीं धरिला प्राण । करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥१२५भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥चित्त निरंतरीं तुझे महाद्वारीं । अखंड पंढरी ह्रदयीं वसे ॥२॥श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं । तेथें माझी दृष्टी बैसलीसे ॥३॥भेटिचें आरत उत्कंठित चित्त । तुजविन माझें हित कोण करी ॥४॥कटीं कर विटे समचरण साजिरे । देखावया झुरे मन माझें ॥५॥असुवें दाटलीं उभारोनि बाहे । नामा वाट पाहे रात्रंदिवस ॥६॥१२६तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥१२७मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥खाय भिल्लिणीचीं फळें आवडतीं । काय त्याचे चित्तीं दुजा भाव ॥३॥भावापाशीं देव उभा सर्वकाळ । खेचरानें बळें दाखविला ॥४॥नामा म्हणे मज सद्गुरुची सत्ता । आम्हासि मुक्तता नको बापा ॥५॥१२८तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥१२९भवव्याघ्र देखोनि भ्याले माझे डोळे । जालेसें व्याकुळ चित्त माझें ॥१॥पाव गा पाव गा पाव गा विठोबा । पाव गा विठोबा मायबापा ॥२॥तूं भक्ता कैवारी कृपाळुवा हरी । येईं गा झडकरी देवराया ॥३॥नामा म्हणे नेणें आन तुजवांचूनि । जनक जननी केशिराजा ॥४॥१३०कां गा मोकलिलें माझिया विठ्ठला । धांवा तुझा केला मायबापा ॥१॥त्रितापें तापलों बहुत पोळलों । चिखलीं पडिलों दीनानाथा ॥२॥यालागीं तुजला भाकितों करुणा । धांवसी निर्वाणा पांडुरंगा ॥३॥नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । रुक्माईच्या कांता घाली उडी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP