मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
श्रीगणेशपुराणाचा समारोप

क्रीडा खंड - श्रीगणेशपुराणाचा समारोप

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

व्यासें विधीस पुशिलें, कोणी म्हणती गणेशअवतार ।

झाला वरेण्यसदनीं, गज-मुर याचें तयास प्राप्‍त शिर ॥

आपण कथितां मजला, पार्वति उदरीं गणेश अवतरला ।

आहे प्रकार साचा, उकलुन कैसी असे कथा मजला ॥२॥

गणपतिचरितें पुष्कळ, नानायुगिं जाहलींच अवतारीं ।

त्याच्या अनंत शक्‍ती, कर्में घडलीं अनंत अवतारीं ॥३॥

मंत्रांशास्त्रांमाजी, ध्यानें असती अनंत वर्णियलीं ।

यास्तव संशय न धरीं, वदले विधि व्यास यांस जीं पुशिलीं ॥४॥

कलियुगिं गणेश केव्हां, घेई अवतार सांगतों व्यासा ।

आचारभ्रष्ट लोकचि, होती तेव्हां स्वधर्म हो लयसा ॥५॥

येणेंकरुन कर्में, यज्ञादी ते समस्त विधि बंद ।

जनपीडाकर जन्मति, असुर तया तो प्रभूच दे बंद ॥६॥

पूर्वी गणपति याचे, झाले अवतार ते युगीं तीन ।

आतां कलियुगिं प्रभु तो, अवतारें धूम्रवर्ण कीं म्हणुन ॥७॥

बैसे सुनीळ वाजीं, असि घेई तो करांत करि आजी ।

निर्मी अनंत सेना, म्लेच्छांचा वध करील तो सहजीं ॥८॥

गिरिकंदरांत बसती, पुनित असे विप्र त्यांस आणून ।

देई तयांस भू ही, पुनरपि कृतयुग जनील सांगून ॥९॥

ऐसें पुराण सांगुन, व्यासा सांगे गणेशदेवाची ।

तपसा करुन मिळवी, व्यासा वरदीं प्रभूकृपा साची ॥१०॥

ऐसें सांगुन विधि तो, जाई अपुल्या करावया विधिला ।

इकडे व्यासहि गेला, करिता झाला त्वरीत तपसेला ॥११॥

बारा वर्षे व्यासें, केली तपसा बहूत तीव्र अशी ।

गणपति प्रसन्न झाला, प्रकटे व्यासासमीप वर-राशी ॥१२॥

(भुजंगप्रयात)

नृपा सोमकांता भृगू सांगतात ।

विधि व्यास यासी करीं कीं पुनीत ।

प्रभूंपूजना सांगुनी ब्रह्मदेवें ।

स्वयें उद्यमा लागला तो स्वभावें ॥१३॥

करी व्यास भावें प्रभूच्या तपाला ।

करी सूर्यवर्षें प्रभू प्राप्त झाला ।

असे कांति त्याची बहू सूर्यदीप्ती ।

प्रभू पाहुनी व्यास हे त्यास भीती ॥१४॥

प्रभू त्यासि बोले करिसी तपास ।

दिवा राति तूं पाहिलें मीं वरास ।

तपें तृप्त झालों त्वरें पातलों कीं ।

तुझ्या संशयासी हरीं मी वरें कीं ॥१५॥

तुला ज्ञान होई मशीं जाणण्याचें ।

तुझें नाम नारायण ठेवि साचें ।

असें नाम व्यासा बहूमान युक्‍त ।

प्रभूअ त्यांस देईअ वराही प्रयुक्‍त ॥१६॥

(गीति)

मुख्य पुराणें अठरा, आठरा आणखि पुराण उप करिसी ।

देउन वरास शिरला, व्यासोदरिं तो गणेश भक्‍तीसी ॥१७॥

व्यासें तिथेंच मंदिर, केलें निर्मित सुरेख रमणीय ।

स्थापी गजाननासी, पूजन केलें सदैव स्मरणीय ॥१८॥

त्या मंदिरांत व्यासें, विधिमुखिं जें ऐकिलें प्रभूचरित ।

वैशंपायन यांसी, कथिलें तें अपुल्या मुखें त्वरित ॥१९॥

वैशंपायन यांनीं, भूलोकीं तें प्रसिद्धसें केलें ।

भृगुंनीं भूपति याला, अपुल्या सदनीं सुपूर्ण तें कथिलें ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP