मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८१

क्रीडा खंड - अध्याय ८१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

मिळतां गजाननाचा, इच्छित वर तेधवां उमा तोषे ।

त्यातें नित्य स्तवूनी, ध्यान तिला लागलें असे घोषें ॥१॥

चिंती मनांत निशिंदिनीं, देव गजानन कधीं बरें जनित ।

होई वेड तियेला, लागे ऐसा प्रकार तो घडत ॥२॥

पूजी गजाननाची, मृण्मयमूर्ती करुन ती गिरिजा ।

तद्दिनिं तीथ चतुर्थी, नभ मासांतिला अशी असे ओजा ॥३॥

मृण्मय-मूर्ती झाली, सजिव अशी ती उमेपुढें ठेली ।

नंतर बालक बोले, ज्याच्या स्तवना करुन ती घाली ॥४॥

तो मी गणेश जन्मुनि, झालों अवतीर्ण मी वधीं सिंधू

भाषण ऐकन गिरिजा, युगल-द्वय-दुग्ध-युक्त जणुं सिंधू ॥५॥

उचली सत्वर सूता, अंकीं घेऊन त्या पय प्रासा ।

देती झाली बसुनी, केवळ स्नानास घालिते व्यासां ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP