मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १०८

क्रीडा खंड - अध्याय १०८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पंचाद्श वर्षांचा, गणपति असतां कमंडलूवरती ।

स्नानार्थ मुलांसंगें, गेला तों पाहिलाच मुर पुढती ॥१॥

व्याघ्रस्वरुप होता, पाहुन त्यातें कुमार ते पळती ।

श्रमले म्हणून निजले, याम्य दिशें चरण सर्व ते करिती ॥२॥

इकडे गणेश वधि तो, राक्षस तत्काळ त्या तिरावरती ।

तिकडे यम कोपुनियां, कुमार नेले धरुन ते हातीं ॥३॥

पाहे अंतरदृष्टीं, कुमार नेलें यमें पुरीं अपुल्या ।

जाणुन गणेश ऐसें, तो गेला मित्र सोडण्या अपुल्या ॥४॥

तेथें जाउन त्यानें, केलें उड्डाण बैसला स्कंदीं ।

अद्‌भुत साहस पाहुन, विक्रम कळला यमास प्रभु वंदी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP