मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९७

क्रीडा खंड - अध्याय ९७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

व्यासें विधीस पुशिलें, मयुरेश्वर नाम हें गणेशाचें ।

झालें मशीं कथी हें, पूर्वीचें वृत्त जाहलें मधूवाचे ॥१॥

कथितो विधी तयाला,ऐके वृत्तास चित्त देऊन ।

भूपति शेष तलस्थचि, बैसे असनीं सभेंत जाऊन ॥२॥

परिवार वासुकीसह, जमले सारे अही तिथें जेव्हां ।

त्यांची माता कद्रू, तेथें आली कथावया तेव्हां ॥३॥

अवमानिलें मला कीं, विनतेनें सवतभाव जाणून ।

मृत्यूपरीच झालें, दुःख मशीं सांगतां मला ऊन ॥४॥

असल्या पराक्रमासी, जरि करणें सत्य हें तुम्हां उचित ।

तैसा नसेल तुमच्या, आंगीं तरि मी त्यजीन जिव खचित ॥५॥

ऐकुन माता वचना, शेषाला त्वेष येइ बहुसाळ ।

पाठवि विनतासदनीं, सैन्यासह वासुकीस भूपाळ ॥६॥

घेरिति तियेस अहिते, अणिलें शेषासमीप विनतेस ।

स्मरली विनता गरुडा, तों आला धावुनी त्वरें खास ॥७॥

श्येन जटायू आले, संपाती आदिकरुन बहु पक्षी ।

अहिंसी युद्ध कराया, सिद्ध असे थोर थोर ते पक्षी ॥८॥

अहिंनीं पराभवीतां, गरुडानें घेतलें लघू रुप ।

मातेस घेउनी तो, आला सदना त्वरीत खगभूप ॥९॥

विनता पतीस सांगे, घडलेलें वृत्त तेधवां ऐके ।

बोले तियेस देउन, धीर स्वयें तो वदे तिही ऐके ॥१०॥

प्रसवसि आणखि अंडयां, त्यांसी फोडी गजानन प्रभु तो ।

पक्षी जनीत होइल, रव करितां ऐकुनी ध्वनी मग तो ॥११॥

श्रवणीं पडतां ध्वनि कीं, अपयशि अहि ते समस्त होतील ।

ऐकुन मुदीत झाली, विनता तेव्हां सु-अंड घालील ॥१२॥

कांहीं अवधी जातां, अंडें घाली त्वरीत ती विनता ।

रक्षी मातीमाजी, वेष्टण वल्कल तयास हो पुरितां ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP