मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९८

क्रीडा खंड - अध्याय ९८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(उपेंद्रवज्रा)

गजाननाचा व्रतबंध झाला ।

पाहून मित्रां बहु मोद झाला ॥

गजाननासी म्हणतात मित्र ।

पढावयासी कथि वेदमंत्र ॥१॥

ठेवी तयांच्या शिरसीं सु-हस्त ।

त्वरीत वेदां म्हणती समस्त ॥

द्विवेद त्यांना परिपूर्ण आले ।

तृतीय वेदां म्हणतात बाळें ॥२॥

मयूरवाणी श्रवली द्विजांनीं ।

त्वरीत येती सदनीं उडूनी ॥

बहू मुनी ते बहु थक्क झाले ।

गजाननें कौतुक दाखवीलें ॥३॥

असूर आला कपटी स्वरुप ।

सजून तेथें वनिंचे जिराप ॥

त्यजून पाशें वधिला असुर ।

दिसोन आला सकळां प्रकार ॥४॥

समीप अंडया उबवीत होती ।

खगेंद्र माता बसली निगूती ॥

गणेश फोडी चूकवून अंडें ।

प्रचंड पक्षी जनिला सुकोडें ॥५॥

गणेश बाळांसह युद्ध पक्षी ।

करीत तेव्हां बहुसाळ पक्षी ॥

गणेश टाकी अयुधास जेव्हां ।

उडोन गेला गगनांत तेव्हां ॥६॥

तेथून खालीं उतरे मुलांस ।

त्वरित झेंपें धरि तो तयांस ॥

गतीस पाहे गणनाथ जेव्हां ।

पृष्ठीं बसे सत्वर नाथ तेव्हां ॥७॥

खगेंद्र माता वळखे गणेशा ।

तयास बोले वचनांस ऐशा ॥

मदीय अंडें जरि फोडिलेंस ।

वहान होवो खग आपणांस ॥८॥

करील हानी अहि सर्व जात ।

पुत्रांस माझ्या करि बंधमुक्त ॥

असें पतीचें भवितव्य माझें ।

सुतांस देवा करि साह्य माझें ॥९॥

त्वरीत कार्या करि सिद्ध भाव ।

सुता न देवा तव युग्मनांव ॥

मिळून व्हावें सगळें सुनांव ।

वरास देई मम पूर्ण भाव ॥१०॥

इच्छेपरी तो वर देइ तीस ।

गणेश नामें करि पूर्ण आस ॥

तिथून झाला मयुरेश्वराख्य ।

तैसाच बाळां कथि हा वराख्य ॥११॥

म्हणून बैसे मयुरावरी तो ।

त्वरीत आला सदनीं प्रभू तो ॥

कथीत व्यासां विधिही कथा ती ।

नृपास सांगे भृगु आश्रमीं ती ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP