मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १३३

क्रीडा खंड - अध्याय १३३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(साकी)

वरेण्यराणी नाम पुष्पिका जागी झाली व्यासा ।

विचित्ररुपी बाळ देखिलें विचार झाला कैसा ॥१॥

धृ० ॥सुन सुन हें व्यासा । दैवयोग हा कैसा ।

त्या बाळासी वनीं ठेविलें सदनीं गेलीं सारीं ।

तेथें संनिध पाराशर हे वसती हे अवधारीं ॥२॥

हिंडत हिंडत बाळासंनिध अवचित ते आले ।

पाहुन बालक वनवासी तें घेउन सदनीं गेले ॥३॥

अपुल्याला कीं पुत्र नसे हा दैवीं विचार केला ।

यास्तव दिधला पुत्र आपणां वदले हें कांतेला ॥४॥

त्या बाळाचें रुप पाहुनी शंका मनांत आली ।

इतुक्यामध्यें ईशकृपेनें ज्ञानदृष्टि त्या दिधली ॥५॥

परमात्मा हा या रुपानें अवनीवरि अवतरला ।

दुष्टांचा हा नाश करिल कीं ऐसें कळलें मुनिला ॥६॥

मुनिची कांता पाहे बाळा सत्वर ती पान्हवली ।

हृदयीं धरुनी स्तनीं लाविलें पुत्रवती ती झाली ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP