मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९२ - ९३

क्रीडा खंड - अध्याय ९२ - ९३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

होतां पंचम वर्षे, सूत गजानन मुलांसवें युद्ध ।

खेळे बहूत हर्षे, खड्‌गासुर पातला स्वतां सिद्ध ॥१॥

सजला उष्ट्र विशालचि,स्वबळें ताडी गजानना पायीं ।

पाहे गणेश तेव्हां, सजला रुपें प्रचंड त्या ठायीं ॥२॥

मारी बुक्की माथीं, उष्ट्र पडे हृदय भग्न होऊन ।

प्राणान्त मित्र होतां, छायासुर येत तेथ धावून ॥३॥

छाया गजाननाची, ओढी मायें करुन तो असुर ।

पडला गणेश तेव्हां, अंतरसाक्षी बघे स्वयें मूर ॥४॥

पाषाण करीं घेऊन, मारी छायेवरी त्वरें बाळ ।

छायासूर निमाला, गणपति चंचल मुरासवें खेळ ॥५॥

घेऊन कंदुक हातीं, ठरवी डावास तेधवां जोडी ।

झेली कंदुक राक्षस, गणपतिवरि तो करीत कुरघोडी ॥६॥

डावाचें नाम असें, खेळामाजी प्रमूख कुरघोडी ।

भार तयावर घाली, जाणे कपटा गणेश त्याच घडीं ॥७॥

कांहीं अवधी जातां, कंदुक झेली गणेश तत्काळ ।

बैसे राक्षसपृष्ठीं, हिमगिरिसम भार घालि तो बाळ ॥८॥

भारें राक्षस मृत तो, झाला तत्काळ तेधवां व्यासा ।

आणखि गणेशलीला, सखया ऐकें विधी वदे खासा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP