मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १२६

क्रीडा खंड - अध्याय १२६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

मयुरेश-पुरामाजी, मयुरावर बसुन येत मयुरेश ।

सिद्धीबुद्धीसह तो, कार्तिक मानस धरीत मयुरेश ॥१॥

मृत-शिवगणास उठवी, अमृतदृष्टी बघून मयुरेश ।

स्थापी सभागृहासी, वसवी देवालयास मयुरेश ॥२॥

(भुजंगप्रयात)

पुरा पूर्वभागामधें स्थापि यांस ।

रती आणि भर्ता दिलें स्थान खास ।

तिथें स्थापि देवी म्हणे मांजराई ।

असे साक्ष आतां तिथें भक्त जाई ॥३॥

पुरा याम्य-भागामधें स्थापि यांस ।

शिवा-पार्वतीला दिलें स्थान खास ।

तिथें स्थापि देवी म्हणे वीरजाई ।

अए साक्ष आतां तिथें भक्त जाई ॥४॥

प्रतीचे दिशें स्थापि वाराहधर्णी ।

तया संनिधीं दीधलें स्थान वर्णी ।

असे आश्रमा नाम त्या देवतेचें ।

असे साक्ष आतां तिथें जाति साचे ॥५॥

तिथें उत्तरें स्थापि विष्णूस व्यासा ।

तया संनिधीं स्थापि मुक्ताइ खासा ।

प्रभू-मानसा पाहुनी देव सारे ।

तिथें नांदती सांगती भक्त सारे ॥६॥

म्हणूनी करावी पुराचीच यात्रा ।

मनावासना पूर्ण होतील मित्रा ।

मयूरेश्वरानें पुरीं वास केला ।

बहू काळ त्याचा इथें खास गेला ॥७॥

पुढें इष्ट-मित्रां तशा सर्व देवां ।

अणूनी तयांना वदे पूर्ण-भावा ।

अहो देव हो सिंधुदैत्या वधाया ।

जगीं जन्मलों कार्य हेंची कराया ॥८॥

अतां संपलें कार्य हें या युगाचें ।

अधर्मास नाशी स्वतां आवनीचें ।

मला द्यावि आज्ञा स्वधामास जाया ।

नका दुःखि होऊं पुन्हां येई ठायां ॥९॥

(गीति)

सिंधुरहननासाठीं, उदरीं जन्मेन साच गे माये ।

बंधूला स्कंदानें, आलिंगन दीधलें असे मायें ॥१०॥

मयुर्द दिला स्कंदाला, मयुरेश्वर नाम ठेविलें त्याचें ।

एणेपरि स्कंदाला, गणपति करि शांत चित्तसें वाचें ॥११॥

स्मरतां येइन भेटी, वदता झाला तयांस ये रीती ।

संकटहरणासाठीं, अश्वासन देतसे सुरां प्रीती ॥१२॥

गणपति पुसून सर्वां, अंतरधानाप्रती तिथें गेला ।

त्रेतायुगांत जन्मुन, द्वापारींच्या पथास अनुसरला ॥१३॥

विधिनें व्यासां कथिलें, मयुरेशाचें चरित्र परिसाया ।

जे जे परिसति चरिता, वर्धित वयसा सुकीर्ति पसराया ॥१४॥

आणखि इच्छा त्यांच्या, होती त्या पूर्ण कीं हि श्रवणांनीं ।

शूद्रहि पुनीत होतो, साधन सोपें म्हणून विधि वानी ॥१५॥

दुसर्‍या खंडाचा हा, भाग सहावा सुपूर्ण प्रभु करवी ।

कवनें सुमनें गुंफुनि, प्रभुकंठीं हार घाल हें सुचवी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP