मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १२५

क्रीडा खंड - अध्याय १२५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

चक्रपाणीचा भाव पूर्ण-कारी ।

जाइ सत्वर तो असनिं सभागारीं ।

तया बैसवि भूप यथाभावें ।

करी पूजन तो काय वर्णनावें ॥१॥

विधी देवादि वैशम्य मनीं झालें ।

तया ज्ञानानें मनिश कळों आलें ।

ध्वनी झाला तो ब्रह्माण्ड फुटे ऐसा ।

श्रवुन देवांचा संघ चकित व्यासा ॥२॥

बघति सारे ते देव गणाधीपा ।

मूर्ति सुंदर ती पंचदेवरुपा ।

दिसे त्यांना ती गणपती रवी देवी ।

हरी शंभूही एकरुप व्हावी ॥३॥

सर्व देवांहुन श्रेष्ठ परब्रह्म ।

सत्य वाटे त्या प्रत्यक्ष हेंच ब्रह्म ।

नित्य पूजावें एक गणेशाला ।

घडे पूजन तें सकल देवतेला ॥४॥

धरिति कोणी हा भेदभाव खासा ।

जाति नरकासी त्वरित सत्य वासा ।

निघे आकाशीं पूर्ण उघड वाणी ।

पूजि गणपतिला साच सुघड वाणी ॥५॥

(गीति)

विधिला नारद सांगे, सिद्धी बुद्धी तुझ्या वधू असती ।

त्यांना वरण्यासाठीं, आला वर गणपती बहू प्रीती ॥६॥

तरि तूं अपुल्या दुहिता, गणपतिला दे यथाविधी म्हणतों ।

ऐकुन नारदवाणी, असलेला देवसंघ ओरडतो ॥७॥

आम्हां द्यावी कन्या, ऐकुनि दिधल्या वधूकरीं माळा ।

वर शोधण्यास आज्ञा, दिधली त्यांना म्हणून त्या वेळा ॥८॥

गेल्या सिद्धी बुद्धी, शीघ्र गती त्या समीप गणपतिच्या ।

माळा गळ्यांत घालिति, लक्ष न देतां सुरांकडे स्वतां सिद्ध ।

सिद्धिविनायक यासी, सिद्धी बुद्धीस योग्य वर सिद्ध ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP