मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय ४८ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय ४८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ४८ वा Translation - भाषांतर ५८५पुढती नृपासी निवेदिती मुनि । कृष्ण चिंती मनीं कुब्जावच ॥१॥हेतुपूर्तीस्तव सदनीं तियेच्या । जाई यदुराजा भक्तप्रेमें ॥२॥ध्वज, पताका तैं मौक्तिकांच्या माला । कुब्जेच्या शोभल्या मंदिरांत ॥३॥सदनीं श्रीहरी येई हें पाहूनि । स्वागता धांवूनि पुढती येई ॥४॥अर्घ्यपाद्यादिकें तया स्तकारिलें । प्रेमें बैसविलें सुखासनीं ॥५॥जिवलग मित्र उद्धव सन्निध । पूजी ते सानंद तयातेंही ॥६॥आसना स्पर्शूनि बैसला तो खालीं । वासुदेव कथी पुढती ऐका ॥७॥५८६लोकरुढीस्तव पुढती जाऊन । बैसे भगवान अंतर्गृहीं ॥१॥उत्तम मंचकीं विराजली मूर्ति । कुब्जा त्या स्थळासी प्राप्त होई ॥२॥वस्त्रें, अलंकार लेऊनि पातली । अंतरीं लाजली जवळी जाण्या ॥३॥तदा श्रीहरीनें स्वयेंचि जवळी - । घेऊनियां, केली क्रीडा बहु ॥४॥कौतुक कुब्जेच्या वाटतें भाग्याचें । श्रीहरीच्या स्पर्शे धन्य झाली ॥५॥वासुदेव म्हणे प्रार्थी ती हरीला । जोडूनियां करां कुब्जा, ऐका ॥६॥५८७सहवासें देवा, तृप्ति नसे तव । राहीं कांहीं काल माझ्या घरीं ॥१॥भक्तकाजकल्पद्रुम तैं वनमाळी । राहिला त्या स्थळीं कांहीं दिन ॥२॥तोषवूनि तिज वर बहु अर्पी । सदनीं पुढती गेला सुखें ॥३॥राया, दुष्प्राप्य ते लाभतां चरण । कुब्जा इच्छी काम खेद वाटे ॥४॥अलौकिक संधि लाभतां यापरी । क्षुद्र इच्छा करी मूढचि तो ॥५॥वासुदेव म्हणे प्रारब्ध बलवान । ज्ञात्यांतेंही जाण मोह पाडी ॥६॥५८८पुढती एकदां अक्रूरसदनीं । उद्धवा घेऊनि यदुनाथ- ॥१॥येई, गजपुरीं पाठवावें त्यासी । तोषवूनि चित्तीं हाचि हेतु ॥२॥कृष्ण येई ऐसें पाहूनि अक्रूर । जाहला अधीर स्वागतासी ॥३॥राम-कृष्णोद्धवा आलिंगूनि प्रेमें । सादर वंदिलें सत्कारुनि ॥४॥कृष्णानेंही तया वंदितां तो पूजा । करुनियां तीर्था प्राशी भावें ॥५॥अंकीं पादपद्में घेऊनियां चुरी । पुढती भावें करी स्तवन त्यांचें ॥६॥वासुदेव म्हणे श्रीकृष्णस्तवनें । धन्यता भाग्यानें येईं जीवा ॥७॥५८९राम-कृष्णा, तुम्हीं वधूनि कंसासी । स्वकुळाची सिद्धि साधियेली ॥१॥कार्यकारणही तुम्हींचि जगाचें । रुप श्रीहरीनें मायातीत ॥२॥देवा, सत्वादिक विकारापासूनि । अलिप्त तूं जनीं सर्वकाळ ॥३॥वासनानिबद्ध होई जनीं जीव । वासनाविमुक्त जन्म तव ॥४॥मानूं जरी आम्हीं तुजसी प्राकृत । अज्ञान तें स्पष्ट आमुचेंचि ॥५॥जीवासम तुज नसे पारतंत्र्य । सर्वदा स्वतंत्र तव कर्मे ॥६॥वासुदेव म्हणे भेद हा ध्यानांत । न घेतांचि दोष देती देवा ॥७॥५९०सनातनधर्मा यदा पाखंडानें बाधा ॥अवतार घेऊनि ते हरितोसी पीडा ॥१॥यादवकुलाची कीर्ति व्हावी जगावर ॥तेंवी हराया आलासी देवा, भूमिभार ॥२॥पावन सदन माझें केलेंसी येऊनि ॥असत्याचा लेशही न कदा तुझ्या ठाईं ॥३॥यथार्थत्वें स्वभक्तांची जाणसी तूं भक्ति ॥यास्तव विवेकी तव आश्रय करिती ॥४॥शरणागतांचा होसी नारायणा, दास ॥भक्तजनांच्या दास्याची तुजसी न लाज ॥५॥दुर्लभ ही भेटी तव जाहली मजसी ॥प्रार्थना तुजसी माझी मायापाश तोडीं ॥६॥वासुदेव म्हणे ऐसी ऐकूनियां स्तुति ॥मंदहास्य करुनियां बोले जगजेठी ॥७॥५९१अक्रूरा, आमुचें चिंतिसी तूं हित । वंद्य तूं पितृव्य सेवायोग्य ॥१॥सेविती देवांसी परी देव स्वार्थी । जनांचें इच्छिती हित साधूं ॥२॥तीर्थ-मूर्तींहूनि सज्जन ते श्रेष्ठ । दर्शनेंचि सिद्ध हेतु त्यांच्या ॥३॥सुहृत् आप्तही तूं असूनि सज्जन । समाचार आण पांडवांचा ॥४॥हस्तिनापुरीं ते असती संकटीं । पंडुराज त्यांसी त्यजूनि गेला ॥५॥पुत्रमोहामग्न धृतराष्ट्र मूढ । भेदबुद्धि त्यास म्हणती बहु ॥६॥प्रत्यक्ष पाहूनि येईं ते अक्रूरा । निवेदूनि गेला कृष्ण गृहीं ॥७॥वासुदेव म्हणे अवतारकार्य । ऐसें शारड्गधर योजी मनीं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 28, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP