मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय २७ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय २७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय २७ वा Translation - भाषांतर ३१३वृत्त निवेदिती शुक । स्वर्गांतूनि येई इंद्र ॥१॥कामधेनु गोलोकींची । येई कृष्णाच्या भेटीसी ॥२॥सूर्यासम तेज:पुंज । होतां इंद्राचा किरीट ॥३॥कृष्णचरणीं एकांतीं । ठेवी शिर शचीपति ॥४॥दर्परहित होऊनि । वदे सुविनम्र वाणी ॥५॥देवा, ऐकिला लौकिक । आजवरी मी बहुत ॥६॥अनुभव परी आजी । आला प्रत्यक्ष मजसी ॥७॥वासुदेव म्हणे इंद्र । स्तवी होऊनी विनम्र ॥८॥३१४अद्वितीय रुप असे तव देवा । त्रिगुणांचा गोंवा नसे तुज ॥१॥धर्मरक्षणार्थ परी अवतार - । घेऊनि, अपूर्व करिसी लीला ॥२॥भाससी तूं गोप परी असामान्य-। सामर्थ्य, हें ज्ञान नसे कोणा ॥३॥ज्ञानद तूं सर्वां सकल नियंता । नियंतृत्व दंडाविण नसे ॥४॥सर्वश्रेष्ठ तव सामर्थ्य या जगीं । दर्प हरितोसी सकलांचा ॥५॥दर्पहरणार्थ लीला ज्या करिसीं । हितप्रद होती आम्हांसी त्या ॥६॥दंडकाचें बल अगाध असावें । तदा अपेक्षावें दंडकार्य ॥७॥वासुदेव म्हणे श्रेष्ठत्व कृष्णाचें । इंद्र वर्णितो तें परिसा प्रेमें ॥८॥३१५मूढपणें आम्हीं आणितांही विघ्नें । लवही न त्याचें दु:ख तुज ॥१॥प्रतिबंध कांहीं होईनाचि तुज । तदा बल तुच्छ आमुचें वाटे ॥२॥तदा आम्हीं सर्व त्यागूनियां गर्व । चरणीं विनम्र होतों तुझ्या ॥३॥तात्पर्य, दुष्टांही हितप्रद लीला । होती करुणाकरा सकल तव ॥४॥देवा, अतिवृष्टि करुनियां तुज । छळिलें बहुत अहंभावें ॥५॥मूढकर्माची त्या क्षमा करीं मज । पुनरपि दुष्ट नुपजो भाव ॥६॥वासुदेव म्हणे मज क्षमापात्र । जाणें म्हणे इंद्र हे गोविंदा ॥७॥३१६दुष्टनिर्दालन सज्जनरक्षण । हेतु हा धरुन अवतरलासी ॥१॥शिक्षापात्र परी सेवक जाणूनि । मजसी क्षमूनि कृपा करीं ॥२॥त्रिभुवनीं तव वास हे अनंता । प्रणाम घे आतां माझा नम्र ॥३॥विफल प्रयत्न हेचि तव शिक्षा । जाहले अच्युता, उपकार ते ॥४॥अपराध माझे क्षमूनि प्रसन्न । होवो दयाघन प्रार्थना हे ॥५॥वासुदेव म्हणे ऐकूनियां कृष्ण । बोलला वचन ऐका काय ॥६॥३१७प्रसादार्थचि हा इंद्रा । होता प्रयत्न सर्वथा ॥१॥राज्यमदानें तूं धुंद । झाला होतासी स्वर्गांत ॥२॥परिहार त्या मदाचा । इंद्रा, आवश्यक होता ॥३॥करितों प्रसाद मी जेथें । हरितों प्रथम भाग्य त्याचें ॥४॥ऐश्वर्याची असतां धुंदी । गर्व न त्यागी कोणासी ॥५॥तेणें ज्ञान न त्या माझें । ऐसें ऐश्वर्य त्या बाधे ॥६॥आतां सुखें जा सदनीं । मत्त होऊं नका कोणी ॥७॥स्वस्वकर्म दक्षतेनें । आचरी, त्या श्रेष्ठ जाणें ॥८॥वासुदेव म्हणे बोध । कृष्ण करी हा इंद्रास ॥९॥३१८ऐकूनि तो बोध कामधेनु हर्षे । वदली कृष्णातें ईश्वर तूं ॥१॥विश्वोत्पत्ति तूंचि करुनि त्यामाजी । वास अभेदेंचि करिसी देवा ॥२॥इच्छिला इंद्रानें विनाश आमुचा । देवा, तूं असतां संरक्षक ॥३॥धेनु-विप्र-देव-साधुसंरक्षण । सदय होऊन तूंचि करीं ॥४॥इंद्राधिकार घे तूंचि आतां देवा । हेंचि ब्रह्मदेवा रुचे मनीं ॥५॥भूमिभार हरावया तूं आलासी । वासुदेव कथी धेनुवच ॥६॥३१९रायाप्रति शुक निवेदिती ऐसें । विनवूनि हर्षे कामधेनु ॥१॥कृष्णावरी धरी प्रेमें दुग्धधारा । अदित्यादि आल्या देवमाता ॥२॥इंद्रादि देवांनीं आकाशगंगेचें । जल अभिषिंचिलें कृष्णावरी ॥३॥ऐरावत शुंडाद्वारा तें अर्पिलें । आधिपत्य दिलें धेनूंचें त्या ॥४॥‘गोविंद’ हें नाम ठेविलें कृष्णासी । गान नारदादि करिती प्रेमें ॥५॥अप्सरांचें नृत्य, सुमनवर्षाव । करुनियां देव तुष्ट होती ॥६॥धेनुदुग्धें आर्द्र जाहली भूमाता । वाहती सरिता दिव्यरसें ॥७॥वृक्ष मधुवृष्टि करिती आनंदें । श्रमाविण पिके भूमि तदा ॥८॥वर्षताती गिरि रत्नें, व्याघ्र सौम्य । इंद्रादि वंदून जाती कृष्णा ॥९॥वासुदेव म्हणे गोवर्धनोद्धार । कथा हे अपूर्व नित्य गावी ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : December 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP