मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय ४१ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय ४१ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ४१ वा Translation - भाषांतर ४८८शुकमहामुनि बोलले नृपासी । चतुर्भुज मूर्ति श्रीहरीची - ॥१॥पाहूनि, अक्रूर करितां स्तवन । रुप भगवान करी गुप्त ॥२॥अक्रूर तैं करी आन्हिक आपुलें । भेटतां पुशिलें हरीनें तया ॥३॥आश्चर्यचकित मुद्रा कां रे ऐसी । काय पाहिलेंसी नवल कोठें ॥४॥अक्रूर तैं म्हणे भूमि, उदकांत । तैसेचि नभांत खेळ बहु ॥५॥परी ते सकळ त्वद्रूपीं प्रत्यक्ष । अन्य चमत्कार पाहूं काय ॥६॥वासुदेव म्हणे यापरी बोलून । हांकिला स्यंदन अक्रूरानें ॥७॥४८९दोन प्रहर टळले । मथुरा नगर पाहिलें ॥१॥मार्गी राम-कृष्णांप्रति । अवघे निरखूनि पाहती ॥२॥रथ दिसे तावत्काळ । दृष्टि प्रेक्षकांची स्थिर ॥३॥करी आन्हिक अक्रूर । तदा होई बहु वेळ ॥४॥मार्गप्रतिक्षा तयाची । तेणें करिती नंदादि ॥५॥वनीं मथुरेसन्निध । बसले होते सकल गोप ॥६॥वासुदेव म्हणे तेथें । येतां बोले कृष्ण मोदें ॥७॥४९०सुहास्यवदनें अक्रूराचा कर । धरी शारड्गधर करामाजी ॥१॥म्हणे अक्रूरा जा, आगमन माझें । कथीं, पुढती सुखें सदन गांठीं ॥२॥ऐसेचि पुढती येतां, तें अनिष्ट । होऊनियां स्वस्थ पुढती येऊं ॥३॥ऐकूनि अक्रूर होऊनियां खिन्न । म्हणे एकाकी न मन घेई ॥४॥पवित्र सदन होवो पादरजें । आधार जगाचे चरण तव ॥५॥सेवितां हे बळि जाहला कृतार्थ । गंगाही पवित्र चरणस्पर्शे ॥६॥वासुदेव म्हणे दु:खी अक्रूरासी । बोलला हितोक्ति कृष्ण ऐका ॥७॥४९१अक्रूरा, विनम्र प्रार्थना हे तव । ऐकूनि संतोष वाटे मनीं ॥१॥परी दुष्टकंसा वधूनि पुढती । भेटेन आप्तांसी अत्यानंदें ॥२॥सदनीं तैं तुझ्या येईन हर्षानें । कंसवधाविणें उचित न तें ॥३॥नाइलाजें तदा निघाला अक्रूर । गांठूनि नगर कंसा भेटे ॥४॥कृष्णागमनाचें कथूनियां वृत्त । अक्रूर गृहास जाई सौख्यें ॥५॥इकडे विसावा घेऊनियां गोप । पुढील कार्यास सिद्ध झाले ॥६॥वासुदेव म्हणे मथुरा नगरी । अवलोकी हरी गोपांसवें ॥७॥४९२सभोंवार होता खंदक पुरीच्या । उद्यानांची शोभा जागोजागीं ॥१॥महाद्वारें, द्वारें स्फटिक मण्यांची । तेंवी सुवर्णांची उभयविध ॥२॥तांब्या-पितळेचीं कोठारें धान्यार्थ । सुवर्णाचे चौक नगरामाजी ॥३॥धनिकसदनें तींही सुवर्णाचीं । पण्यशोभा अती सौख्यदाई ॥४॥सदनाभोंवती उपवनें रम्य । गवाक्षादि जाण रत्नयुक्त ॥५॥कपोत मयूर शब्द ते मधुर । पुष्पें, धान्यांकुर शोभा देती ॥६॥सडा-संमार्जन त्या रंगवल्लिका । द्वारीं पूर्णकुंभां शोभा बहु ॥७॥वासुदेव म्हणे दधि-चंदनाचा । लेप त्या कलशां भूषा देई ॥८॥४९३पुष्पमाला तेंवी कौशेयपताका । आम्रपल्लवांचा कलशीं डौल ॥१॥कलशांवरी त्या तबकांत दीप । पूगी-कदलीस्तंभ प्रतिद्वारीं ॥२॥ध्वज-तोरणेंही शोभविती गृहें । नगर शोभलें ऐशारीती ॥३॥ऐशा त्या नगरीं गोपांसवें कृष्ण । तेंवी बलराम प्रवेशले ॥४॥दर्शनार्थ त्यांच्या मार्गी होई दाटी । साध्वी स्त्रिया जाती माडयांवरी ॥रुप-पराक्रम ऐकिला जयाचा । दर्शनार्थ त्याच्या धांवाधांव ॥६॥वासुदेव म्हणे राहिलें न भान । ध्यानीं-मनीं कृष्ण नरनारींच्या ॥७॥४९४अलंकारांचेंही भान न स्त्रियांसी । कर्णीचे नासिकीं अलंकार ॥१॥पदर वस्त्राचा उलटाचि घेती । कुंडल एकाचि कर्णी कोणीं ॥२॥कंकण नुपूर कोणी एकेकचि । घालूनियां घेती धांव वेगें ॥३॥एकाचि नयनीं अंजन कोणाच्या । भोजन, स्नानाचा खेळ होई ॥४॥निद्रिस्थही जाग्या होऊनि धांवती । चाले मंदगति कृष्ण तदा ॥५॥वासुदेव म्हणे न्याहाळिती कृष्णा । उत्कंठा ते कोणा वर्णवेल ॥६॥४९५सुंदर स्वरुप सुहास्यवदन । प्रेमावलोकन प्रौढलीला ॥१॥पाहूनि फेडिती पारणें नेत्रांचे । मन वेधें त्याचें कृष्णरुपीं ॥२॥ऐकिलें जें तेंचि पाहुनि प्रत्यक्ष । मावेना आनंद गगनामाजी ॥३॥मानसिक आलिंगनें होती तृप्त । वर्षिती सौधस्थ सुमनें स्त्रिया ॥४॥राम-कृष्णां दधि-अक्षतातिलक । करिताती द्विज द्वारीं येतां ॥५॥धुवूनि चरण चर्चूनि चंदन । करिती अर्पण पुष्पमाला ॥६॥नित्य दर्शनाचा लाभ ज्या गोपींसी । धन्य त्या मानिती स्त्रिया, गोपी ॥७॥वासुदेव म्हणे पूर्वपुण्यें लाभ । होई हा गोपींस म्हणती स्त्रिया ॥८॥४९६ऐशा त्या आनंदीं कंसाचा रजक । भेटला मार्गांत राम-कृष्णां ॥१॥वस्त्रें तयाप्रति मागे भगवान् । होईल कल्याण म्हणे देतां ॥२॥परी उन्मत्त तो रजक कंसाचा । तिरस्कार त्याचा करी मूढ ॥३॥म्हणे हे वन्यहो, ऐसीं राजवस्त्रें । कदा न तुम्हांतें प्राप्त होती ॥४॥पाहिलीं तरी कां ऐसीं कदा सांगा । ऐशा अपराधा न करा पुन्हां ॥५॥क्षमिलें मीं तुम्हां जाणा एकवेळ । कळतां नृपाळ वधिल जाण ॥६॥वासुदेव म्हणे तया उन्मत्तासी । पुरली एकचि थाप तदा ॥७॥४९७पाहूनि तें अन्य दूत रजकाचे । त्यजूनियां वस्त्रें पळूनि जाती ॥१॥तदा राम-कृष्ण आवडीसमान । वस्त्रें निवडून परिधानिती ॥२॥अन्य गोपांतेही अर्पिती तीं वस्त्रें । पीत, नील स्वयें स्वीकारुनि ॥३॥पुढती तयांसी भेटे एक शिंपी । स्वयेंचि तो अर्पी वस्त्रें तयां ॥४॥देती तया वर संतति - संपत्ति । लाभेल, हे उक्ति सत्यरुप ॥५॥लेऊनि तीं वस्त्रें शोभले दिग्गज । कथी वासुदेव पुढती ऐका ॥६॥४९८पुढती सुदामा माळ्यच्या सदनीं । जातां तो येऊनि वंदी प्रेमें ॥१॥अर्पूनि आसन माला तैं तांबूल । मालाकार कर जोडी प्रेमें ॥२॥पवित्र जाहले कुळ म्हणे अद्य । जाहलें सार्थक जन्मूनियां ॥३॥विश्वकंद माझ्या पातले सदनीं । तेणें ऋषि-मुनि तोषतील ॥४॥साधुरक्षणार्थ सांवळी ही मूर्ति । भूतहित चित्तीं चिंतीतसां ॥५॥काय म्यां करावी सेवा प्रभो, सांगा । विनवी जगन्नाथा, माळी ऐसें ॥६॥४९९प्रार्थूनि यापरी आशय मनींचा । जाणूनि यदुनाथा गोपांसवें ॥१॥अर्पी पुष्पमाला सुदामा प्रेमानें । संतुष्ट त्या प्रेमें राम-कृष्ण ॥२॥बोलले इच्छित वर मागें आम्हां । जोडूनि सुदामा हस्त म्हणे ॥३॥सर्वकाल कृष्णप्रेम वसो चित्तीं । सद्भक्तांची मैत्री घडो सदा ॥४॥तेंवी भूतमात्रीं देवा, असो दया । तथास्तु तैं तया वदले दोघे ॥५॥प्रेम वंश, धन, बल, आयुष्कीर्ति । वृद्धि पावो कांति, वदती मोदें ॥६॥वासुदेव म्हणे अमर्याद देणें । ईश्वराचे, उणें काय भक्तां ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 28, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP