मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध| अध्याय २६ वा पूर्वार्ध दशम स्कंधाचा (पूर्वार्ध) सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा स्कंध १० वा - अध्याय २६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय २६ वा Translation - भाषांतर ३०९निवेदिती शुक राया, गोप नंदाप्रति ॥पाहूनि हरीचीं कृत्यें आनंदें बोलती ॥१॥नंदा, कृष्णलीला ऐसी पाहूनि एकेक ॥क्षणोक्षणीचि आमुचें गुंग होई चित्त ॥२॥जन्म गोपांमाजी यातें कैसा हें कळेना सप्त वर्षांचा बालक तोली गोवर्धना ॥३॥गजशुंडेमाजी पद्मगिरी तैं शोभला ॥जन्मापासूनीच याच्या अलौकिक लीला ॥४॥वासुदेव म्हणे ऐसें बोलूनियां गोप ॥आठविती कृष्णलीला एकामागें एक ॥५॥३१०नेत्रही न पूर्ण उघडाया शक्ति । तदा पूतनेसी वधिलें येणें ॥१॥तीन मासांचाचि असतां शकट । वधूनि कौतुक दावियेलें ॥२॥संवत्सरांतचि तृणावर्तवध । दाबूनियां कंठ केला येणें ॥३॥नंदा, उखळीसी बांधितां याप्रति । तुज स्मरतें कीं, घडलें जें तें ॥४॥वनामाजी बक पिंजूनि टाकिला । करील या लीला अन्य कोण ॥५॥वत्सासुराघातें पाडिलीं कपित्थें । तेंवी रामहस्तें गर्दभ तो ॥६॥प्रलंबही रामाकरवीं वधिला । अग्नीही भक्षिला आम्हांस्तव ॥७॥घोर कालियासी दावियेला धाक । कृष्णाचें कौतुक केंवी कथूं ॥८॥कोठें बालकृष्ण, कोठे गोवर्धन । ईश्वरचि कृष्ण खचित वाटे ॥९॥वासुदेव म्हणे ऐशापरी गोप । सद्भाव नंदास निवेदिती ॥१०॥३११गोपांप्रति नंद म्हणे द्यावें लक्ष । वदले जें गर्ग महामुनि ॥१॥ऐकतां तें कृष्ण कोण तें कळेल । लवही नुरेल शंका मनीं ॥२॥आजवरी बहु अवतार याचे । आतां कृष्णरुपें प्रगट झाला ॥३॥गुण-कर्मासम बहु याचीं नामें । नंदा अंतर्ज्ञानें जाणतों मी ॥४॥गोप-गोपींप्रति देईल हा सौख्य । वारील असंख्य घोर विघ्नें ॥५॥प्रत्यक्ष हा ईश आश्चर्य न मानीं । जनांत पाहूनि नवल कर्मे ॥६॥वासुदेव म्हणे गर्गोक्त माहात्म्य । निवेदूनि धन्य होई नंद ॥७॥३१२निवेदिती मुनि राया, हें ऐकूनि । संतोषले मनीं सकल गोप ॥१॥नंद, कृष्णातेंही प्रेमें गौरवून । ईश्वरचि कृष्ण म्हणती स्वयें ॥२॥अशक्य कांहींचि नसे ईश्वरासी । यास्तव तयासी भजणें योग्य ॥३॥देवेंद्राचा दर्प हरिला कृष्णानें । पर्वत लीलेनें धरुनि करीं ॥४॥राया, तोचि कृष्ण कृपा मजवरी । तेंवी तुजवरी करो नित्य ॥५॥वासुदेव म्हणे प्रार्थूनियां शुक । रम्य कथामृत कथिती ऐका ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP