मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय २६ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय २६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय २६ वा Translation - भाषांतर १५१राव म्हणे मुने, सकाम कर्माचीं । भिन्न भिन्न कैसीं फलें सांगा ॥१॥मुनि म्हणे श्रद्धा असे भिन्न भिन्न । भिन्न फल कर्म तेणें घडे ॥२॥सात्त्विकासी सुख, दु:ख तामसातें । रजोगुणें द्वंद्वें प्राप्त होती ॥३॥श्रुतिवर्ज्यकर्मे नरकयातना । नरकवर्णना करिती मुनि ॥४॥राव म्हणे कोठें नरक कथावें । एथें कीं वदावें अन्य लोकीं ॥५॥मुनि म्हणे अधोभागीं पातालाच्या । ऊर्ध्व उदकाच्या नरकलोक ॥६॥दक्षिणेसी पितृपति वंशजांचें । नित्य कल्याण तें चिंतिताती ॥७॥वासुदेव म्हणे यमाची ते दिशा । कर्मासम शिक्षा लाभे तेथें ॥८॥१५२तामिस्त्रादि अष्टविंशति नरक । निवेदिती शुक ऐका आतां ॥१॥परद्रव्यादिक हरणें उपवासी - । ठेवूनि, हाणिती लगुड तेथें ॥२॥‘तामिस्त्र’ तो, ‘अंधतामिस्त्र’ पुढती । वंचकां करिती अंध तेथें ॥३॥स्वार्थाहंकारें जे नाडिती अन्यायें । भोगिती ते पाहें ‘रौरवातें’ - ॥४॥रुरु नामें कृमि भक्षिती तयातें । ‘महारौरवीं’ ते द्रोही जाती ॥५॥क्रव्याद मांसाचे लचके तोडिती । असह्यचि होती यातना त्या ॥६॥‘कुंभिपाकीं’ पशु - पक्ष्यांसी जिवंत । शिजविती त्यांस तळिती दूत ॥७॥पिता विप्र वेदद्वेष्टे । ‘कालसूत्र’ । घोर नरकांत पोळताती ॥८॥परितप्त ताम्रपत्र्यांची ते भूमि । क्षुधार्तचि प्राणी लोळविती ॥९॥रोमांच प्रमाण शब्दें ऐशापरी । स्मरे नरहरी वासुदेव ॥१०॥१५३‘असिपत्रवनीं’ मूढ अधार्मिक । भोगिताती दु:ख छिन्न देहें ॥१॥इक्षुदंडासम सत्तांध सेवकां । पिळिती नरका ‘सूकरमुख’ ॥२॥रांघिले जंतु ते भक्षिताती जेथें । ‘अंधकूप’ त्यातें संज्ञा असे ॥३॥पंचयज्ञाविण भोजन करितां । ‘कृमिभोजनाचा’ नरक लाभे ॥४॥‘संदंश’ नरकीं तप्त सांडसानीं । तस्करां भाजूनि काढिताती ॥५॥व्याभिचारें तप्तमूर्तीसी बांधिती । ‘तप्तसूर्मि’ ऐसी संज्ञा तया ॥६॥शाल्मली कंटक जेथ वज्रासम । पश्वादि ओढूनि तयां पाप्यां ॥७॥वासुदेव म्हणे कंटकावरुनि । नेताती ओढूनि तयां पाप्यां ॥८॥१५४पू, विष्ठा, मूत्र, तैं रक्त, केश, अस्थि । चरबी, मांसादि सरितेसम ॥१॥‘वैतरणी’ नाम तया सरितेसी । पापी नृपाळांसी वास तेथें ॥२॥राजे राजदूत जे जे अधार्मिक । जंतु त्या नदींत टोंचिती त्यां ॥३॥शूद्रस्त्रीनिरतां ‘पूयोद’ नरक । विष्ठा मूत्र कफ भरले जेथें ॥४॥कुक्कुटश्वानादि पाळिती जे विप्र । तयां ‘प्राणरोध’ नरक लाभे ॥५॥अधर्म्यहिंसा वा करिती तयांतें । गांजिती यमाचे दूत तेथें ॥६॥ढोंगी याज्ञिकांसी लाभे ‘विशसन’ । क्रूरपणें यम कापी तयां ॥७॥बलात्कारी विप्रां ‘लालाभक्ष’ रेत - । प्राशन, त्यां प्राप्त कामांधांसी ॥८॥राजे, राजदूत, गरद, दाहक । श्वानभक्ष्य नीच यमलोकीं ते ॥९॥वासुदेव म्हणे ‘सारमेयादन’ । सत्तांध जे जन लुटिती तयां ॥१०॥१५५व्यापारव्यवहारीं असन्मार्गे जातां । पाषाणाघात त्यां ‘अवीचि’ तो ॥१॥विप्र, विप्रस्त्री वा करी मद्यपान । अथवा सोमपान क्षत्रियादि ॥२॥करिती तयांसी तप्तलोहरस । ‘अय:पान’ तोच नरक असे ॥३॥विद्वान तापसी सच्छीलावमानें । ‘क्षारकर्दमानें’ क्लेश होती ॥४॥नरनारी कोणी नरमांस भोजी । तयांसी तोडिती कुर्हाडीनें ॥५॥नरक तो ‘रक्षोगणभोजन’ ही । विश्वास घातेंचि ‘शूलप्रोत’ ॥६॥निष्कारण जीवां छळितां ‘दंदशूक’ । भयंकर सर्पदंश तेथें ॥७॥वासुदेव म्हणे अतिथिपीडनें । ‘पर्यावर्तन’ जाणे नेत्रभंग ॥८॥१५६अंधारीं वा कोठें कोंडूनि मारितां । विषारी धूम्राचा लोट जेथें ॥१॥नाम हें ‘अवटनिरोधन’ त्याचें । गुदमरे तेथें जीव बहु ॥२॥‘सूचिमुख’ अंत्य नरक जाणावा । कृपणांचा ठेवा अंती हाचि ॥३॥माता, पिता, गुरु यांस्तवहि धन । वेंचिती न, प्राण मानूनियां ॥४॥पिशाच्चासम जे रक्षिती द्रव्यासी । द्रव्यार्थ पातकीं मग्न होती ॥५॥अनंत यातना भोगिती ते येथें । असंख्यचि ऐसे नरक राया ॥६॥चतुर्दश ऐसीं जाणितां भुवनें । होई सहजपणें सूक्ष्म ज्ञान ॥७॥वासुदेव म्हणे स्कंध हा पंचम । पूर्ण, नारायण, तोषो येणें ॥८॥इतिवासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंद ५ वा समाप्त.॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ N/A References : N/A Last Updated : November 08, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP