मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ५ वा| अध्याय ७ वा स्कंध ५ वा पंचम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा स्कंध ५ वा - अध्याय ७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ५ वा - अध्याय ७ वा Translation - भाषांतर ४२संकल्पेंचि राज्य अर्पूनि भरता । ऋषभ तो गेला वनामाजी ॥१॥मानूनियां आज्ञा विश्वरुपकन्या । वरिली ते धन्या ‘पंचजनी’ ॥२॥पंचमहाभूतें अहंकारप्रति । पुत्र पंच होती भरता तेंवी ॥३॥सुमति, राष्ट्रभृत् तेंवी सुदर्शन । तैसा ‘आवरण’ धुम्रकेतु ॥४॥‘अजनाभद्वीपा’ भरताच्या नांवें । नाम तें जाणावें भरतवर्ष ॥५॥प्रजावत्सल तो होता महाज्ञानी । रमे यज्ञकर्मी ईश्वरार्थ ॥६॥पुढती हृदयीं प्रगटला हरी । पीतांबरधारी शामवर्ण ॥७॥तदा स्वपुत्रांस अर्पूनियां राज्य । पुलहाश्रमास गेला राव ॥८॥वासुदेव म्हणे भक्तियोग त्याचा । निवेदिती ऐका मुनि आतां ॥९॥४३गंडकीच्या तीरीं पुलहआश्रम । श्रीहरिदर्शन होई तेथें ॥१॥चक्रयुक्त तेथें पाषाण बहुत । चक्रनदी सार्थ नाम तेणें ॥२॥उपवनीं तेथें एकाकी भरत । राही आठवूनि ॥३॥कंदमुळें पुष्पें तुलसी अर्पूनि । श्रीहरिपूजनीं दंग झाला ॥४॥ऐसा कांहीं काळ लोटतां ईश्वर - । प्रेमें, गहिंवर तया येई ॥५॥दर्शनोत्सुका त्या न दिसेचि कांहीं । अश्रुपूर येई नयनीं नित्य ॥६॥ध्यानमग्न ऐशा हृदयर्हदांत । भरुनि आनंद वाहूं लागे ॥७॥बुद्धि त्या आनंदीं मारितांची दडी । पूजेचें न राही भान तया ॥८॥वासुदेव म्हणे पूजक पूजन । पूज्यभानहीन तेचि पूजा ॥९॥४४भक्तिबळें लागे समाधि यापरी । प्रगटे शरीरीं दिव्य तेज ॥१॥मृगचर्म जटा मस्तकीं पिंगट । प्रात:काळीं जप करी राव ॥२॥सूर्यबिंब यदा येई उदयाचळीं । सूर्याची तैं करी आराधना ॥३॥प्रकृतीसी पर शुद्ध सत्त्वात्मक । शरण सूर्यास तया भावें ॥४॥कर्मफलदाई तेज तें संकल्पें । निर्मी जगतातें प्रतिपाळीही ॥५॥उपाधिरुप या बुद्धीसी जे गति । देई, तयाप्रति शरण असों ॥६॥वासुदेव म्हणे ऐसा अर्थ ज्याचा । राव जपे मंत्रा नित्य ऐशा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP